Saturday 9 April 2022

दुसर्‍या महायुध्दातील स्वातंत्र्य चळवळ

दुसर्‍या महायुध्दातील स्वातंत्र्य चळवळ

ऑगस्ट घोषणा (1940) :-

दुसर्‍या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने 8 ऑगस्ट 1940 रोजी घोषण केली. त्यानुसार
(1) भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे,

(2) कार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे

(3) राज्यघटनेसाठी घटना परिषद स्थापन करणे

(4) अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.

वैयक्तिक सत्साग्रह (1940) :-

कॉग्रसने 1940 च्या मुंबई अधिवेशानात ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला. कारण, त्यामध्ये भेदनीतीचा उपयोग आणि स्वातंत्र्याची मागणी नाकारली होती.
गांधीजींनी ऑक्टो 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरु करुन युध्दविरोधी प्रचार केला पाहिजे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.
दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. डिसेंबर 1941 पर्यत 22 हजार सत्याग्रहींनी कारावास स्वीकारला.
क्रिप्स् योजना (2 मार्च 1942) :-

1939 ला दुसरे महायूध्द सुरु झाले. प्रारंभीच्या काळात जर्मनी जपान सैन्याने विजय प्राप्त केले होते.
चीनचे चॅग काई शेक यांनी भारतीयांना इंग्रज लवकरच स्वातंत्र्य देतील, त्यासाठी आपण प्रयत्न करू असा सल्ला दिला होता.
युध्दात भारताचे सहकार्य मिळविण्यासाठी रुझवेल्टचे प्रयत्न आणि राष्ट्रीय सभेची आक्रमक भूमिका यामुळे भारतीयांशी चर्चा करण्यासाठी चर्चिलने क्रिप्स मिशन पाठविले.
सर स्टॅफर्ड, क्रिप्स र्लॉड ऑफ ब्रिव्हर्व, र्लॉड ऑफ प्रिव्हीपर्स इ. 1942 रोजी भारतात आले. त्यांनी जी योजना तयार केली तिला क्रिप्स योजना म्हणतात.
तरतुदी-
(1) वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा असलेले संघराज्य.

(2) युध्दसमाप्तींनतर राज्यघटना बनविण्यासाठी घटना समिती स्थापन केली जाईल.

(3) कॉग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा या सर्वानी ही योजना फेटाळली, बुडत्या बॅकेवरील पुढच्या तारखेचा धनादेश असे गांधीजींनी वर्णन केले.

1942 ची चळवळ :-

क्रिप्स मिशन परत गेल्यानंतर भारतात इंग्रजांच्या विरोधी नाराजी पसरली. 8 ऑगस्ट 1942 च्या चळवळीला प्रारंभ झाला.
चलेजाव चळवळ कारणे पुढीलप्रमाणे
(1) क्रिप्स योजनेने कोणाचेही समाधान झाले नाही.

(2) भारतीय व मंत्रिमंडळाशी चर्चा न करता भारत युध्दात सहभागी असल्याची घोषणा ग.ज. ने केली.

(3) भारतीय स्वातंत्र्य व राज्यघटना या संदर्भात युध्द समाप्तीनंतर निर्णय घेण्यात येईल.

(4) इंग्रजांविरूध्द सुभाषचंद्र बोस यांनी चळवळ सुरु केली. जपानच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने चलेजाव चळवळ सुरु केली.

8 ऑगस्ट 1942 चा ठराव :-

वर्धा येथे कॉग्रेस वर्किगं कमिटिने चलेजाव ठराव 14 जूलै 1942 ला मंजूर केला.
त्याच आधारे मुंबईच्या गवालिया टंक मैदानावर कॉग्रेस अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर केला.
त्यातील तरतुद-
(1) ब्रिटिश राजवट असणे भारताला अपमानास्पद आहे.

(2) भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश व संयुक्त राष्ट्राची परिषद होणार आहे.

(3) स्वतंत्र भारत आपली सर्व शक्ती खर्च करुन हुकूमशाहीविरुध्द लढा देईल.

1942 च्या चळवळीचे स्वरूप :-

चळवळीची घोषणा करताच प्रमुख नेत्यांना कैद झाली. त्यामुळे समाजवादी गटांनी भूमिगत राहून आंदोलन सुरु केले.
संप मोर्चे हरताळ, निदर्शन, सरकारी, मालमतेचे नुकसार तसेच प्रतिसरकार स्थापन करणे इ. मार्गाने चळवळ सूरू होती.
अनेक शहरांमधील कामगारांनी कारखाने बंद केले. सरकारने आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार, केला.
त्यामध्ये नंदुबारचा विद्यार्थी शिरीषकुमार आणि त्याचे चार मित्र ठार झाले.
10 हजारांहून अधिक लोक ठार झाले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्यूत;राव पटवर्धन, अरूणा असफअली इ. नेत्यांनी महत्वाची कामगिरी केली.
सी. आर. फॉम्र्युला (30 जून 1944) :-

हिंदु मुसलमान यांच्यातील मतभेद मिटल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे व्हॉइसरॉय र्लॉड वेव्हेल यांनी सांगितले, तेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी गांधीजींच्या संमतीने बॅ. जिनासमोर योजना मांडली.
तिलाच सी. आर. फॉम्र्युला किंवा राजगोपालाचारी योजना म्हणतात. त्यातील तरतुदी-
(1) हिंदुस्थानची घटना निर्माण होईपर्यंत हिंदु मुसलमान यांनी हंगामी सरकार स्थापन करावे.

(2) युध्द संपल्यानंतर मुस्लीम बहुसंख्य असलेल्या प्रांताच्या सीमा ठरविण्यासाठी कमिशन नेमावे

(3) भारतातून फुटून निघण्याच्या प्रश्नावर सार्वमत घ्यावे.

ही योजना गांधीजींना मान्य होती. परंतु बॅ. जिनांनी नाकारली.

वेव्हेल योजना (9 जून 1945) :-

युरोपमध्ये युध्दाची समाप्ती झाली. तरीपण जपानच्या आक्रमणाची भीती होती.
भारताच्या स्वातंत्र्यसंदर्भात मित्र राष्ट्रांचा चर्चिल यांच्यावर दबाब येत होता.
आगामी निवडणुकीत मजूर पक्ष सत्तेवर आला. तर आपली राजवट बदनाम करतील. यामुळे भारतीयांसाठी योजना जाहिर केली.
त्यातील तरतुद-
(1) हिंदी लोकांनी नवी राज्यघटना करावी.

(2) जपान बरोबरच्या युध्दात भारतीयांनी सहकार्य करावे.

(3) हिंदी गृहलोकांकडे परराष्ट्रीय खाते असेल सिमला संमेलन 25 जून ते 14 जूलै 1945 वेव्हेल योजना व जागा वाटप याची चर्चा करण्यासाठी सिमला येथे संमेलन आयोजित केले.

वेगवेगळया पक्षांचे 22 प्रतिनिधी हजर होते. कार्यकारी मंडळाच्या रचनेबाबत मतभेद झाल्याने संमेलन बरखास्त केले.
वेव्हेलची सप्टेंबर घोषणा इ.स. 1945 :-

इंग्लंडमध्ये जुलै 1945 ला मजूर पक्ष सत्तेवर आला.
पंतप्रधान अ‍ॅटलीने घोषणा केली की, भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्यात येईल.
त्यानुसार वेव्हेल यांनी घोषणा केली की,
(1) सर्व पक्षांची घटना समिती स्थापन करण्यात येईल.

(2) 1945 च्या हिवाळयात केंदि्रय व प्रांतिय कायदेमंडळाच्या निवडणूका घेण्यात येतील

(3) घटना समितीच्या कामकाजासाठी संस्थानिकांशी चर्चा करण्यात येईल.

सैनिकांचे बंड :-

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलात इंग्रजांबदल विरोध होता.
जानेवारी 1946 मध्ये कराचीच्या विमानदलाने संप पुकारला त्याचा प्रसार लाहोर, मुंबई, दिल्ली येथे झाला. फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबईच्या नाविक दलाने उठाव केला.
अंबालाच्या विमानदलाने संप केला जबलपूरच्या लष्करात संप झाला. सर्व लष्करी दलात उठाव झाला.
कॅबिनेट मिशन त्रमंत्री योजना (6 में 1946) :-

पंतप्रधान अ‍ॅटलीने जाहिर केले की, भारताला स्वातंत्र्य दिले जाईल.
यासाठी सर पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर अलेक्झांडर या तीन कॅबिनेट मंत्र्यांचे मिशन नियूक्त केले, ते 20 मार्च 1946 कराची येथे आले.
देशातील 472 नेत्यांशी चर्चा करुन 16 मे 1946 योजना जाहीर केली.
त्यातील तरतुदी-
(अ) भारताला लवकर स्वातंत्र्य दिले जाईल.

(ब) काँग्रेस लीग यांच्यात एकमत होत नाही,

तोपर्यत पुढील योजना सादर करण्यात येत आहे.
(1) ब्रिटिश प्रांत व संस्थाचे यांचे संघराज्य तयार करावे,

(2) लोकायुक्त संसद त्याचा कारभार करेल.

(3) संघराज्याची व गटराज्याची घटना बनवून दर 10 वर्षाने गरजेनुसार बदल करावे

(4) प्रशासनाच्या कामासाठी तीन विभाग

(अ) मद्रास, मुंबई, संयुक्त प्रांत बिहार, मध्ये प्रांत, ओरिसा यांचे एकूण प्रतिनिधी 187

(आ) पंजाब, सरहद्द,प्रांत, सिंधचे प्रतिनिधी 35,

(इ) बंगाल, आसामचे 70 प्रतिनिधी असावेत .

या योजनेत पाकिस्तानचे चित्र दिसत असल्याने लीगने मान्य केली तर कॉंग्रेसने नाकारली.
हंगामी सरकार :-

घटना समितीसाठी निवडणूक घेण्यात आली.
292 पैकी 212 जागा कॉंग्रेसला मिळाल्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत भरले घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसार याची निवड करण्यात आली.
हंगामी सरकारची स्थापना 2 सप्टेंबर 1946 रोजी केली.
तो दिवस लीगने शोकदिन म्हणून पाळला 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून लीेगने पाळला.
र्लॉड माऊंटबॅटन योजना जून 1947 :-

प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी जाहीर केले की जून 1948 पूर्वी इंग्रज आपली सज्ञ्ल्त्;ाा सोडेल.
र्लॉड माऊंटबॅटन याने काँग्रेस लीगच्या नेत्यांशी चर्चा करून आपली योजना जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे.
(1) हिंदुस्थानची फाळणी करुन मुसलमानांसाठी स्वतंत्र घटना समिती स्थापन करावी.

(2) बंगाल, आसाम, पंजाबाचे, विभाजन केले.

(3) आसामच्या सिल्हेट जिल्हयात सर्वमत घ्यावे,

(4) इंग्रज सरकार 15 ऑगस्ट 1947 राजी हिंदुस्थान सोडून जातील या योजनेला काँग्रेस व लीगनेही मान्यता दिली.

स्वातंत्र्याचा कायदा आणि हिंदुस्थानची फाळणी :-

र्लॉड बॅटन योजनेच्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटने 16 जूलैला कायदा मंजूर केली. तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. त्यातील तरतुदी :
(1) 15 ऑगस्ट 1947 रोजी हिदुस्थानची फाळणी करुन भारत पाकिस्तान दोन देश निर्माण करणे

(2) स्वत:च्या देशाचे कायदे करण्याचा अधिकार त्यांच्या कायदेमंडळाला असेल.

(3) 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज सरकारचे सर्व अधिकार रद्द होतील.

(4) नवीन राज्यघटना तयार होईपर्यत सध्या असलेली घटना समिती दोन्ही देशांसाठी कायदे करील.

(5) संस्थानांनी कोठे सामील व्हायचे त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.

(6) पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, संधि, वायव्य, सरहद्द प्रांत, बलुचिस्थान आसामचा सिल्हेट जिल्हा यांचा समावेश पाकिस्तानमध्ये करण्यात येईल. उरलेला प्रदेश भारतात असेल.भारतीय स्वातंत्र्याचा कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान वेगळा झाला. त्याच रात्री 12 वाजता भारतीय पारतंत्र्य नष्ट झाले. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. हिंदुस्थानची फाळणी होऊन दोन राष्ट्र निर्माण झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...