Saturday 9 April 2022

लक्षात ठेवा◾️रशियाची राजधानी मॉस्को येथील अलाबीनो रेंजमध्ये सुरु असलेल्या, 'आंतरराष्ट्रीय टँक बॅथलॉन २०१७' या सैन्याच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेले भारताचे दोन टी-९०एस रणगाडे ऐनवेळी खराब झाल्याने भारतीय सेनेला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

▪️रशियात निर्माण केलेले रणगाडे हे मजबूत आणि सक्षम असल्याचे मानले जाते. पण, रशियातूनच आयात करण्यात आलेल्या या रणगाड्यांमध्ये तांत्रिक दृष्ट्या बिघाड झाला. सुरुवातीला या रणगाड्यांनी स्पर्धेत शानदार प्रदर्शने केले. मात्र, या रणगाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भारतीय सैन्य आपली क्षमता दाखवण्यात मागे पडले. रशिया, चीन, बेलारूस आणि कझाकिस्तान यांचे रणगाडे मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य स्पर्धेत वापरलेल्या रणगाड्यांपैकी पहिल्या रणगाड्याच्या फॅनचा बेल्ट तुटला. यामुळे दुसऱ्या राखीव रणगाड्याचा वापर करण्यात आला. मात्र, हा रणगाडा केवळ दोन किलोमीटरवर पोहोचल्यावर यातील इंजिनऑइलची गळती सुरु झाली. परिणामी भारत या स्पर्धेतून बाहेर पडला.

भारतात २००१ पासून सुमारे ८ हजार ५२५ कोटी रुपयांत ६५७ टी-९० एस 'भीष्म' रणगाड्यांची आयात करण्यात आली आहे. सद्या या प्रकारचे रणगाडे भारतातच बनवले जात आहेत.

भारताला युद्धाची धमकी देत असलेला चीन या स्पर्धेत टाइप-९६ बी रणगाडे घेऊन उतरला आहे. या रणगाड्यांमध्ये शत्रूवर फायरिंग करण्यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. रशिया, चीन, बेलारूस आणि कझाकिस्तान या देशांकडे असणाऱ्या आधुनिक रणगाड्यांच्या जोरावर हे देश अंतिम फेरीत एकमेकासमोर भिडतील.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...