Saturday 9 April 2022

पूर्णांक व त्याचे प्रकार – मराठी अंकगणित

पूर्णांक व त्याचे प्रकार – मराठी अंकगणित


पूर्णांक किंवा पूर्ण संख्या मराठी: पूर्णांक संख्या म्हणजे शून्य , सकारत्मक व नकारत्मक संख्या यांचा एकत्र गटाला पूर्णांक संख्या असे म्हणतात

पूर्णांक किंवा पूर्ण संख्या म्हणजे सकारात्मक नैसर्गिक संख्या (Positive Integers) शून्यासह ( ०, १, २, ३, ४, …), तसेच, नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे (नकारत्मक संख्या Negative Integers)( −१, −२, −३, ..) या पूर्ण सामूहिक गटाला पूर्णांक संख्या म्हणतात. या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात – म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांशचिन्हाशिवाय मांडता येतात. उदाहरणार्थ, २१, ४ व −२०४८ या पूर्ण संख्या होत. मात्र ९.७५, ५१/२ या पूर्ण संख्या नव्हेत.


पूर्णांक संख्याचे प्रकार
शून्य
सकारात्मक पूर्णांक (Natural/positive Integers)
नकारात्मक पूर्णांक (Negatives of Natural Number)
शून्य
शून्य एक सकारात्मक किंवा नकारात्मक पूर्णांक नाही. ही एक तटस्थ संख्या आहे म्हणजे शून्यास कोणतेही चिन्ह नाही (+ किंवा -).

सकारात्मक पूर्णांक
सकारात्मक संख्या ही अशी संख्या आहे ज्यात अधिक चिन्हे (+) असतात. बहुतेक वेळा सकारात्मक पूर्णांक संख्या पूर्ण संख्येने प्लस चिन्हाशिवाय दर्शविली जातात (+). प्रत्येक सकारात्मक संख्या शून्य तसेच नकारात्मक संख्येपेक्षा मोठी असते. संख्या रेषेवर , सकारात्मक संख्या शून्याच्या उजवीकडे दर्शविली जातात.

सकारात्मक पूर्णांक संख्या उदाहरणः 1,2,3 400, 5663,99999998, इ.

नकारात्मक पूर्णांक
सकारात्मक संख्येच्या उलट, नकारात्मक संख्या ही एक वजा चिन्ह (-) सह दर्शविलेले संख्या असते. नकारात्मक संख्या, संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे दर्शविल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...