Thursday 29 September 2022

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात लागू करण्यासाठी समितीची स्थापना.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे.

यासंदर्भातला ठराव उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं सोमवारी जारी केला आहे.

या समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री, कृषी मंत्री आणि शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच वैद्यकीय शिक्षण या तीन मुख्य शिक्षण क्षेत्रातल्या  मंत्र्यांचा समावेश असेल.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सचिव असतील.

या समितीची बैठक दर तीन महिन्यांतून एकदा होईल.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...