Thursday 16 February 2023

लक्षात ठेवा



🔸१)पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास .... असे म्हणतात.

-तपांबर


🔹२)तापस्तब्धीच्या वर असलेल्या १३ ते ५० कि. मी. जाडीच्या थरात हवेची हालचाल होत नाही.या थरास कोणते नाव आहे?

-स्थितांबर


🔸३)तपांबराच्या वरच्या भागातील सुमारे ३ कि. मी. जाडीच्या थरात तापमान स्थिर असते. या थरास कोणती संज्ञा आहे ?

- तापस्तब्धी


🔹४) स्थितांबर व आयनांबर यांच्या दरम्यान असलेल्या वातावरणाच्या थरास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- मध्यांबर


🔸५) मध्यांबराच्या वर असलेल्या ८० ते ५०० कि. मी. जाडीच्या .... या थराचा संदेशवहनासाठी उपयोग होतो.

- आयनांबर


🔸१) वातावरणातील सर्वांत उंचीवरील .... या थरात हायड्रोजनसारखे हलके वायू आढळतात. 

- बाह्यांवर


🔹२) .... या ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलिअम नायट्रोजन व मिथेन हे वायू आढळून आले आहेत.

- गुरू


🔸३) .... या ग्रहांभोवती असलेल्या वातावरणाच्या विरळ थरात कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे.

- मंगळ व शुक्र


🔹४) सूर्यमालेतील ज्ञात ग्रहांपैकी .... हा सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह होय. 

- नेपच्यून (वरुण)


🔸५) जर्मन शास्त्रज्ञ.... यांनी 'युरेनस' किंवा 'प्रजापती' या ग्रहाचा शोध लावला.

- सर विल्यम हर्शल


🔸१) २९ मार्च, १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने मेजर ह्यूसनवर झाडलेल्या पहिल्या गोळीने क्रांतीची ठिणगी पडली. ही घटना कोठे घडली?

- बराकपूरच्या छावणीत


🔹२) 'बराकपूर' हे ठिकाण सध्याच्या .... या राज्यात येते.

- पश्चिम बंगाल


🔸३) १८ एप्रिल, १८५९ रोजी तात्या टोपेंना .... येथे जाहीररीत्या फाशी दिली गेली.

- शिप्री


🔹४) “If the 'Sindhia' joins the Mutiny, I shall have to pack off tomorrow. " हे उद्गार कोणी काढले होते ?

- लॉर्ड कॅनिंग


🔸५) इस्लाम धर्मतत्त्वात गुलामगिरीला थारा नाही हे स्पष्ट करून देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'वहाबी' चळवळीचे प्रणेते म्हणजे ....

- सय्यद अहमदवरेलवी


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...