२८ मार्च २०२३

30 April साठी स्वतः तपासून पाहिलेल्या Balanced Approach ची गरज


संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी नियोजित आहे. खूपदा पुरेशी तयारी असून देखील कट ऑफ गाठता येत नाही. त्याची कारणे बहुतांश वेळा या परीक्षेपूर्वी महिना दीड महिन्यात सदर परीक्षे बाबत तुम्ही बाळगलेला विशिष्ट दृष्टिकोन खूपदा कारणीभूत ठरल्याचे दिसते.

यातील सर्वात मोठी चूक ही असते की, विद्यार्थी स्वतःच्या दृष्टिकोनावर वाटचाल न करता बाजारातील या परीक्षा पास झालेले उमेदवार यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात, किंवा एक दोन व्हिडिओ किंवा अन्य मार्ग. धक्कादायक बाब ही असते की अनेकांचे या परीक्षेसाठी स्वतः चे स्वतः  सूक्ष्म विश्लेषण करून तयार झालेले आकलनच नसते. अमुक एक सांगतो इतकेच topics करा, अमुक पुस्तक विशिष्ट प्रकारे वाचा....वगैरे. पण हे असेच का? देत असलेल्या परीक्षेत संबंधित विषयात मागील परीक्षांत नेमके काय आणि कसे विचारले आहे? याचे आकलन स्वतःचे हवे.  खरे तर  कशातून काय विचारणार हे जास्त महत्त्वाचे नसते. महत्वाची असते ती या प्रक्रियेतून मिळणारी दृष्टी. ती मिळाली की मग history असो बा current तुम्ही योग्य जागीच मेहनत लावता. हे खूप खूप महत्त्वाचे.

दुसरा मुद्दा असा की, अनेक जण अमुक विषयात अमुक गुणांचे टार्गेट ठेवतात. या विद्यार्थ्यांचा भूतकाळ performance बाबतीत सपाट असतो. मला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटते. ते कसे काय 55 आणि 60 गुणांची परीक्षेपूर्वीच चर्चा झोडतात/ तजवीज करतात? कधी Polity बरा येईल तर कधी घाम फोडेल? मग 10 गुणांचे गणित कसे? म्हणूनच सुरुवातीला Balanced Approach  बाबत बोललो आहे.  स्पर्धा तीव्र असताना परीक्षेतील प्रत्येक विषय ब त्यातील टॉपिक महत्वाचा असतो. तयारीच्या सुरुवातीच्या वर्षांत कमी जास्त होणे स्वाभाविक आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने सामोरे जावे लागते. मात्र तयारीचे हे दुसरे किंवा त्याहून जास्त कालावधीचे वर्ष असेल तर सर्व  विषयांना समान वागणूक आणि संतुलित तयारी अपेक्षित  आहे.  60 मिनिट आणि 100 प्रश्न अशा प्रकारच्या परीक्षेत तर हे फारच महत्त्वाचे असते. दोन तीन प्रश्न पण खूप मोठा फरक करू शकतात. यावर खूप लिहिता बोलता येईल मात्र मुद्दा लक्षात घेणे महत्त्वाचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

28 एप्रिल TOP १० चालू घडामोडी MCQ

१. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची व्यापार तूट कोणत्या देशासोबत वाढली आहे? अ. अमेरिका B. फ्रान्स सी. चीन D. रशिया उत्तर: C. चीन २. 'जाग...