Friday 17 March 2023

एकाच घरातल्या दोन बहिणी झाल्या IAS, एकच नोट्स वापरून केलं अभ्यास, महिलासाठी बनलेत प्रेरणा !


भारतात घेतल्या जाणाऱ्या युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा या सगळ्यात कठिण परीक्षा मानल्या जातात. अभ्यास आणि मेहनतीसोबतच भाग्य असेल तर या परीक्षा क्लिअर होणे शक्य असते. त्यामुळे एखादा विद्य़ार्थी जर त्यात पास झालाच आणि तोही आपल्या शहरातील असेल तर सर्वत्र त्याचे कौतुक आणि अभिनंदन करणारे फलक लावले जातात. त्याचे कौडकौतुक केले जाते. पण एक भलतीच घटना समोर आली आहे. ती म्हणजे एकाच घरातील दोघंजण एकाचवर्षी यूपी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच यूपीएससीने सिव्हिल सेवा परीक्षेचा निकाल जाहिर केला. त्या परीक्षेत बिहारचा शुभम कुमार टॉपर होता तर दिल्लीची अंकिता जैन हिने ऑल इंडिया थर्ड रॅंक मिळवला. त्यामुळे तिचा संपूर्ण परिवार खूप खुश आहे. पण जैन कुटुंबात हा आनंद केवळ अंकितासाठीच नसून तिची बहिण वैशाली जैनसाठीसुद्धा झाला आहे. कारण वैशालीनेसुद्धा आपल्या बहिणीप्रमाणेच ऑल इंडिया 21वा रॅंक मिळवला आहे. या यशामुळे एकाच घरातील दोघी बहिणी आयएएस ऑफिसर झाल्या आहेत. या बहिणींची खास गोष्ट म्हणजे दोघींनी एकाच नोट्समधून परीक्षेचा अभ्यास केला होता. दोघांची रॅंक वेगवेगळी आली असली तरी दोघींनीही मेहनत सारखीच केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता जैन आणि वैशाली जैन यांचे वडील सुशील जैन हे बिझनेसमन आहेत आणि त्यांची आई गृहिणी आहे. दोघी बहिणींच्या अभ्यासासाठी त्यांच्या पालकांनी खूप तयारी करुन घेतली होती. अंकिताने 12 वी झाल्यावर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले.
त्यानंतर तिला एका खाजगी कंपनीत जॉब मिळाला. पुढे तिने युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली. अंकिताने 2017 पासून या परीक्षेची तयारी सुरु केली होती. पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले नाही. म्हणून तिने दुसऱ्यांदा परीक्षा दिली. त्यात ती पास तर झाली मात्र आयएएस होण्यासाठी मुबलक गुण तिला मिळाले नाहीत.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...