ऑपरेशन

 📌 ऑपरेशन सतर्क :-

◆ रेल्वे पोलीस दलाने 5 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान ट्रेनमधून होणारी तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन 'सतर्क' राबवले आहे. 

◆ या ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात दारू, तंबाखूजन्य पदार्थ, सोने, चांदी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 

◆ या संपूर्ण कारवाईत 3.18 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन गरुड :-

◆ ऑपरेशन गरुड अंतर्गत, सीबीआयने आठ - राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करांच्या आवारात छापे टाकले. 

◆ इंटरपोलची शाखा म्हणून पहिल्यांदाच सीबीआयने चाईल्ड पोर्नोग्राफी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात दोन कारवाईचे नेतृत्व केले.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन मेघचक्र :-

◆ केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी मोठी कारवाई करताना 19 राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशातील 56 ठिकाणांवर छापे घातले. 

◆ CBI ने या कारवाईला 'ऑपरेशन मेघचक्र' असे नाव दिले होते. 

◆ मध्यंतरी चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले होते, याची गंभीर दखल घेत CBI कडून कारवाई करण्यात आली.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन आहट (AAHT) :-

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. 

◆ 'ऑपरेशन आहट'चा एक भाग म्हणून, सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या/मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आले होते आणि तस्करांच्या तावडीतून पीडितांना, विशेषतः स्त्रिया आणि मुलांची सुटका करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...