Friday 12 May 2023

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023__ 20 दिवसांवर येवून ठेपली आहे. M

शेवटच्या 20 दिवसांचे नियोजन कसे करावे? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल.

1. या शेवटच्या 20 दिवसात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision.
जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा.

बर्‍याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे.

2.अजून एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाच्या पाठीमागे आलेल्या प्रश्नचा भरपूर सराव करणे. एक लक्षात घ्या जो जास्तीत जास्त प्रश्न Solve करतो त्याला आयोग काय विचारणार आहे हे ऑटोमॅटिक समजत जात आणि त्या दृष्टीने आपला अभ्यास आपोआप होत जातो.

तुम्हांला गेल्या पुर्व परीक्षेत 90 च्या पेक्षा कमी मार्क्स जरी मिळाले असतील तरी तुम्ही syallbus आणि pyq व्यवस्थित टार्गेट केले तरी तुम्ही सहज 120+ जाऊ शकतात.. त्यामुळे आयोगाचा syllabus आणि PYQ समोर ठेऊनच अभ्यास करा.

3. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा.

4. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा..

विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल..

5. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. (रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, किमान 7 तास झोप घ्या )  जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.

6. परीक्षा तोंडावर येत असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा..

7. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्‍याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते..

ज्यांनी प्रामाणिक, योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत, त्यांना नक्कीच यश मिळणार, यात शंका नाही.. ✌️

स्वप्नपूर्तीसाठी झगडणार्‍या सर्वांना मनापासून शुभेच्छा...👍😍

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...