Monday 15 May 2023

राज्यसेवा पूर्व 4 June 2023 बाबतीतत थोडक्यात...

Geography, polity,History, Science, Economics, Environment...हे विषय राज्यसेवा पूर्व साठी (GS Paper _1 )साठी आहेत.

1. काही लोकांना Science थोडासा अवघड वाटतो किंवा काही लोकांना Economics अवघड वाटतो ...प्रत्येकाचा अवघड विषय  वेगवेगळा आहे ...पण एक गोष्ट लक्षात घ्या इथून पुढे तुम्ही एखाद्या विषयास बगल देण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडलाच म्हणून समजा ...त्याच्यामुळे सर्वप्रथम सर्वच विषयांकडे लक्ष द्यायचे आहे.

2. कसरतीवरचा डाव __ इथून पुढे अभ्यास करताना काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावेच लागेल कारण CSAT Qualify आहे ..त्याच्यामुळे कसरत ही Full Focus GS असणार आहे ...त्यामध्ये GS च्या प्रत्येक विषयांवर मजबूत पकड असणे आवश्यक.

3. अभ्यास पद्धत_ अभ्यास करताना काही गोष्टींवर काम करावेच लागणार आहे .आयोगाच्या मागील 2020 पासूनच्या फक्त राज्यसेवेच्या प्रश्नपञिका .प्रश्नपञिकांवर काम करायचे आहे कारण आपण केलेला अभ्यास आणि आयोग विचारत असलेले प्रश्न यांचा ताळमेळ जुळवून पुढे आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल या सर्वाचेच आकलन होत असते.

4. Positive/negative विचार _ दिवसभरात सर्वात जास्त Positive विचार पाहीजेत पण Negative विचार हाल सोडत नाहीत..कोणत्या गोष्टींवर किती वेळ खर्च करायचा हे पटकन समजले पाहीजेत कारण आपण भावी अधिकारी आहोत ...थोडेफार Negative विचार हे महाराष्ट्रात Topper येणाऱ्याला सुद्धा येतात पण अशा व्यक्ती लगेच Positive होतात ...जबरदस्त विचारसरणी पाहीजेत...दिवसभर Positive राहण्यासाठी भरपूर गोष्टींवर प्रत्येक व्यक्ती काम करू शकते eg. केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवणे, नेहमी mains देणाऱ्या लोकांमध्ये राहणे,चांगल्या गोष्टींवर चर्चा करणे,तुमचे मन प्रसन्न होईल अशी कामे करणे ...etc

5. Focus 4 June  _ नुसतं पाट्या टाकण्याचे काम नकोच ..अंतिम यादीत नाव पाहीजे...प्रत्येक विषयाचं micro planning करा ...व्यवस्थित स्वतःच Timetable तयार करा ..हे सर्व स्वतः करा ...माझा मिञ आज पासून polity चा अभ्यास चालू करत आहे मग मी पण आजपासून Polity चा अभ्यास चालू करतो हे असले Planning नको ....Zero पासून Hero बनता आलं पाहीजेत..जे काही करायचं ते स्वतः करायचं मार्गदर्शन करायला भरपूर आहेत...सत्यात उतरवण्यासाठी स्वतःलाच Ground level काम करावे लागते ..हे लिहून ठेवा.

6. अभ्यासावर विश्वास _ केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवणे म्हणजे निम्मी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा ..

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...