ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌

               मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या.

या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश या घटकांवर प्रश्न विचारताना पॅटर्न काय होता?

तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षांसाठी आयबीपीएस(IBPS) चा काय पॅटर्न आहे, हे लक्षात यावं म्हणून हा अट्टहास .

📌📌 English 📌📌

1)  Error detection.( यामध्ये Tense, articles, prepositions, homophones या घटकांवर प्रामुख्याने विचार करायचा.)

2) Para-jumbles / Sentence Rearrangement ( 6 jumbled sentences देऊन त्यांचा योग्य क्रम लावून त्यावर 5 questions असतात.)

3) TCS विचारते तसे सोपे -सोपे One Word Substitutions / idioms IBPS विचारत नाही; पण vocab चा भाग म्हणून आपण हे घटक करत चला.

4)  Fill in the blanks  / Cloze text
( ज्यामध्ये एक छोटासा पॅसेज देऊन त्यामध्ये काही ब्लँक दिले जातात आणि त्यामध्ये आपल्याला words भरावायचे असतात.)

5) Spelling error

6) Prepositions

7) Articles

8) Word interchange / swapping
( वाक्यामधील कुठलातरी एक शब्द बोल्ड करून त्या शब्दाला कोणता शब्द रिप्लेस करेल हे विचारलं जातं.)

9) Fill appropriate word ( दिलेल्या वाक्याच्या सेन्सनुसार आपल्याला एक शब्द निवडायचा असतो.)

📌📌मराठी 📌📌

मराठीचे प्रश्न attempt करताना कधी कधी असं वाटतं वाळंबे-  शिंदे हे सगळं साईडला ठेवून द्यावं की काय😄 पण असं नाही आपले स्रोत वापरून अभ्यास सुरू ठेवा.

1) मराठी पॅराजेम्बल जे की वेळ घेते .

2) लिंग ओळखा

3) योग्य -अयोग्य शब्द

4) योग्य वाक्यरचना ओळखा

5) शुद्धलेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा

6) वाक्प्रचार व म्हणी यांचा वाक्यात उपयोग करून विचारले जातात.

7) उतारा

8) काळ या घटकावर सुद्धा प्रश्न होते.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ZP पद भरतीसाठी परीक्षा होत आहेत. परीक्षांसाठी मार्गदर्शक ठरावी म्हणून ही पोस्ट.

तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा 💐

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...