Wednesday 13 March 2024

चालू घडामोडी :- 13 मार्च 2024

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

◆ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे.

◆ दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी "No smoking day" साजरा करण्यात येतो.

◆ गोरासम कोरा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो.

◆ महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे.

◆ हिमाचल प्रदेश राज्यात स्पायडर (कोळी) च्या नविन प्रजातीचा शोध लागला आहे.

◆ रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा मुशीर खान हा सर्वात युवा मुंबईकर ठरला आहे.

◆ ‘नायब सिंग सैनी’ हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.

◆ जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 मिळाला आहे.

◆ स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) या जागतिक संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'दिल्ली ग्रामोदय अभियान' प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे ‘कोचरब आश्रमा’चे उद्घाटन केले.

◆ 12 मार्च 2024 रोजी 'स्वामी रामकृष्ण परमहंस' यांची जयंती साजरी करण्यात आली.

◆ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनितपूरमध्ये 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ 'ॲनाबेल सदरलँड' आणि 'यशस्वी जैस्वाल' यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब पटकावला आहे.

◆ भारतीय लेखक अमिताव घोष यांना हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकल्याबद्दल नेदरलँड्सच्या प्रीमियम इरास्मियनम फाउंडेशनने 'इरास्मस पुरस्कार' 2024 ने सन्मानित केले आहे.

◆ जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिले 'सरकारी होमिओपॅथिक कॉलेज' स्थापन केले जाणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...