Wednesday 10 April 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

◾️भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने सलग सातव्यांदा Repo Rate 6.5% कायम ठेवला


◾️भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे 

⭐️रेमिटन्स म्हणजे परदेशातून पाठवलेले पैसे

⭐️2023 मध्ये

🔥भारत ($125 अब्ज)

🔥मेक्सिको ($67 अब्ज)

🔥चीन ($50 अब्ज)

🔥फिलिपिन्स ($40 अब्ज)


◾️ ग्रीन जीडीपी सध्या चर्चेतील विषय आहे

⭐️ आपल्या जीडीपी मधून पर्यावरणाचे हानी वजा केल्यानंतर येणारा आकडा म्हणजे ग्रीन GDP

⭐️चीनने 2006 मध्ये ग्रीन जीडीपीच्या आकडेवारी जाहीर केली होती त्याच्यानंतर पुन्हा जाहीर केले नाही

⭐️भारताने ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी 2013 मध्ये पार्थ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती

⭐️ग्रीन जीडीपीला विरोध होतो कारण विकसनशील देशांना अडथळा देण्यासाठी विकसित देश Green GDP काढयला सांगतात हे एक कारण आहे


◾️लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी शाईचा महापुरवठा करण्यासाठी कर्नाटकच्या बंगलोर मधील "मैसूर पेटंट्स व व्हार्निश" कंपनीला काम देण्यात आलेले आहेत

⭐️हीच कंपनी जगभरातील 25 देशांना मतदानासाठी शाईचा पुरवठा करतो

⭐️कर्नाटक सरकार ही काम 1962 सालापासून करत आहे


◾️एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनोलॉजी नुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो


⭐️पहिला : बांगलादेश 

⭐️दुसरा : पाकिस्तान 

⭐️तिसरा : भारत 

⭐️चौथा : तजाकिस्तान 

⭐️भारताच्या हवेची सरासरी गुणवत्ता 147 इतकी आहे


◾️भाग्यश्री फंड डबल महाराष्ट्र केसरी

⭐️वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फंड ही विजेती ठरली

⭐️भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकाविला 

⭐️भाग्यश्री ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे


◾️पंतप्रधान सूर्यघर योजना

⭐️सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी

⭐️या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे

⭐️केंद्र सरकारकडून 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे

⭐️योजनेला राज्य सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला


◾️आतापर्यंत च्या लोकसभा निवडणुकीत 1984 काँग्रेसच्या 404 जागा निवडणूक आल्या होत्या

⭐️राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले

⭐️इंदिरा गांधी हत्येच्या नंतर

⭐️याच निवडणुकीत भाजपा ला 2 जागा भेटल्या होत्या


◾️झारखंड मधील नक्षलग्रस्त जिल्हा सिंह भूम मध्ये पहिल्यांदाच म्हणजे दशकांच्या नंतर मतदान होणार आहे

मतदान साहित्य हेलिकॉप्टरमधून आणले जाणार आहे

⭐️ मतदानासाठी एकूण 118 मतदान केंद्रांची उभारणी केली आहे


◾️ऑपरेशन ॲनाकोंडा हे झारखंड मधील नक्षलवाद कमी करण्याचे संबंधित आहे


◾️इक्वेडोरच्या पर्यावरणवादी मूळनिवासी नेमोन्ते नेन्किमो यांना 'टाइम अर्थ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

⭐️2020 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण अभियानात प्रेरणादायी कार्याबद्दल 'चौम्पयन्स आफ द अर्थ' या सन्मानाने गौरविण्यात आले.

त्या स्वयंसेवी संस्था 'सेईबो अलायन्स' आणि 'अॅमेझॉन फ्रंटलाइन्स'च्या संस्थापक आहेत


◾️जागतिक बँक समूहाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांची आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

⭐️जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944, ब्रेटन वुड्स, न्यू हॅम्पशायर, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेचे अध्यक्ष : अजय बंगा


◾️प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण 

⭐️8 एप्रिल 2015 ला योजनेची सुरवात ( नवी दिल्ली)

⭐️या योजनेंतर्गत बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर कृषी, लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते.


◾️8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन ' नावाची पहिली त्रि-सेवा सशस्त्र दल नियोजन परिषद आयोजित करण्यात आली होती.

⭐️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक

⭐️या बैठकीला 

◾️भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे

◾️ भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल विवेक राम चौधरी आणि 

◾️भारतीय नौदलाचे ॲडमिरल आर. हरी कुमार

हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबाई        1646 नाशिक            स...