Monday 22 April 2024

Prelims की Mains?


परीक्षेच्या तारखेच्या या अनिश्चिततेच्या काळात अनेक जण मला हा प्रश्न विचारत आहेत. मुळात हा प्रश्नच बदलून विचारायला हवा. 

Prelims किती वेळ आणि Mains किती वेळ? हा योग्य प्रश्न आहे. कसं, पाहूया.


अशा प्रश्नाचं कुठलंही एक असं उत्तर देता येत नाही. ते प्रत्येकाने आपापलं शोधायचं असतं. फक्त ते कसं शोधायचं याची दिशा तुम्हाला पुढे मिळेल.


दिवसातील किती वेळ Prelims आणि किती वेळ Mains, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला Prelims किती मार्काधिक्याने पास होण्याचा confidence आहे यावर अवलंबून आहे. मार्काधिक्य म्हणजे expected cutoff पेक्षा किती मार्क्स अधिक. Thumb rule असा आहे की पहिल्या key ने हे मार्काधिक्य 20 च्या घरात हवे, जेणेकरून दुसऱ्या key चे दडपण न घेता Mains चा अभ्यास जोरदार सुरू करता येईल. Prelims ला 'खजूर मे अटके' असे काठावरचे मार्क्स असतील तर दुसरी key येईपर्यंत पूर्ण ताकद लागत नाही आणि आपण Mains ची निम्मी लढाई तिथेच हरतो. त्यामुळे Prelims ला दमदार Lead घेणे महत्त्वाचे!


Prelims पास होण्याच्या आत्मविश्वासाच्या पातळीनुसार चर्चेच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे 3 गट करू.


1. पहिला गट : पहिल्यांदा Prelims देणारे, आधी दिलेली मात्र Cutoff पासून खूप दूर राहिलेले, एकंदरीत Prelims ची भीती वाटणारे.

या गटाने Mains चा विचार न करता, पूर्णपणे Prelims वरती लक्ष केंद्रित करावे. कच्चे दुवे ओळखून त्यावर विशेष मेहनत घ्यावी. शेवटच्या आठवड्यात उजळणी साठी short notes आधीच बनवून ठेवाव्यात, या नोट्स निदान 5 वेळा वाचून होतील याची काळजी घ्यावी. Prelims PYQ साठी निदान 2 तास रोज द्यावेत. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका नियमितपणे सोडवून त्याचे विश्लेषण करावे. हमखास मार्क्स घेण्याच्या कोणत्या विषयात कमी पडतो आहोत याचे Micro-analysis करावे. GS पक्के मात्र CSAT मध्ये विकेट जाणाऱ्यांनी निदान 4 तास CSAT च्या सरावासाठी द्यावेत. हे 4 तास आपापल्या तयारीनुसार कमी-जास्त करावेत. 


2. दुसरा गट : याआधी दिलेल्या Prelims मध्ये Cutoff च्या आसपास (±5 range मध्ये) तरंगणारे. 

या गटाने Prelims आणि Mains च्या syllabus मध्ये common असणारे घटक (Core Polity, समाजसुधारक, महाराष्ट्र भूगोल, Core Economy, etc) ओळखून त्यांची Mains च्या दृष्टीने तयारी (Mains PYQ, पाठांतर, नोट्स) पक्की करावी. असे करताना Prelims चा यावेळचा score Cutoff +20 न्यायचा आहे याचा विसर पडू देऊ नये. Prelims PYQ, CSAT यांचा नियमित सराव करण्याला इतर पर्याय नाही.


3. तिसरा गट : Prelims नेहमी दहा गडी राखून पास होणारे, core content वर झोपेतून उठवले तरी जबरदस्त command असणारे Mains चे महारथी. Hamstring injury असूनही 201 runs चोपणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल सारखे! 

या गटाने सकाळच्या सत्रात मराठी-इंग्लिश व्याकरण वगैरे Mains चे topics करायला हरकत नाही. आत्ताच व्याकरणाच्या प्रत्येकी 15 पानांच्या नोट्स बनवून ठेवल्या तर Prelims ते Mains दरम्यान त्यांची पारायणे करता येतील. त्याच बरोबर कायद्यासारखे कमी मेहनतीत हमखास भरघोस मार्क्स मिळवून देणाऱ्या Topics चे handy material आत्ताच बनवून ठेवले तर पुढे नक्की फायदा होईल. 

"कायदे पढोगे तो फायदे में रहोगे!" 

पुन्हा तेच, GS ला Cutoff +20 आणि CSAT ला हलक्यात घ्यायचे नाही. कारण ग्लेन मॅक्सवेल पण स्वस्तात out होऊ शकतो!


सगळं पुराण सांगून झाल्यावर पुन्हा तेच, यातील आपल्याला काय लागू होते ते आपले डोळे उघडे ठेवूनच शोधायचे आणि अंगिकारायचे. 

ऐकावे जनाचे करावे मनाचे!

कारण एकाला लागू झाले ते दुसऱ्याला लागू होईलच असे नाही. एकाला जे आज लागू झाले ते त्याला उद्या लागू होईलच असे नाही. एका विषयाला जे लागू झाले ते दुसऱ्या विषयाला लागू होईलच असे नाही. त्यामुळे क्षणोक्षणी सतर्क राहणे आणि मार्गक्रमण करणे गरजेचे. नेहमी स्वतःला Reinvent करत राहणे ही या प्रक्रियेची गरज आहे. लक्षात ठेवा, वर चर्चा केलेल्या कोणत्याही गटात तुम्ही असला तरी Prelims च्या दुसऱ्या दिवशी Mains चा अभ्यास जोमाने सुरू करायचा असेल तर Prelims मध्ये दमदार Lead घेणं क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टीने पुढील वाटचालीचे नियोजन आणि त्यानुसार अंमलबजावणी करा. 20 ओव्हर्स मध्ये 288 runs चा पाठलाग करायचा असेल तर पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी करावी लागते, म्हणजे शेवटी RRR (Required Run Rate) हाताबाहेर जात नाही. 


खूप खूप शुभेच्छा. 💐

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...