Thursday 26 September 2024

राज्य पुनर्रचना आयोग -1953


सदस्य - 

1) फझल अली ( अध्यक्ष)

2) के एम पन्नीकर

3) हच. कुंझरू 


➡️अहवाल - 30 सप्टेंबर 1955 सादर 


➡️या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.


✅आयोगाच्या शिफारशी


1. यात मुख्यतः भाषावार पुनर्रचनेला पाठिंबा. त्या आधारावर 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे.


2. उत्तर भारत-बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे चार भाग करावे.


3. थोडे बदल करून पूर्वेकडील राज्ये आहे तशीच राहू दिली. बिहार आणि आसाम मधून 'ट्रायबल' राज्ये बनवावीत, ही मागणी आयोगाने फेटाळून लावली.


4. मुंबई व पंजाब यांच्या विभाजनाला आयोगाचा विरोध, गुजरात व महाराष्ट्र मिळून मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे.


5. एकभाषी राज्यातील अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रत्येकाला मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावे.


6. राष्ट्रऐक्यासाठी अखिल भारतीय सेवांमध्ये निम्मे (अर्धे) उमेदवार राज्याबाहेरील असावेत. त्यांच्या केंद्रातून प्रांतात व प्रांतातून केंद्रात बदल्या व्हाव्यात.


7. उच्च न्यायालयातील 1/3 न्यायाधीश राज्याबाहेरील असावेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...