जन्म -21 एप्रिल 1896 (पुणे)
• "शिवाजी आमचा राणा आणि मराठी आमचा बाणा" या ध्येयाने वाटचाल करणारा सत्यशोधक म्हणून केशवरावांची ओळख
• शिवाजी महाराजांच्या मर्जीतील कान्होजी जेधे हे केशवरावांचे पूर्वज होते. केशवरावांच्या वडिलांचा पुण्यात भांड्याचा कारखाना होता.
• 1928 मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे सचिव होते. (पुणे)
• 1929 - सातारा जिल्हा मराठा परिषदेचे अध्यक्ष
• पुणे येथे ब्राह्मणेत्तरांनी स्थापन केलेल्या "छत्रपती शिवाजी मेळ्यासाठी" 1923-30 पर्यंत पद्यरचना केली. गाणी गायली.
• 1925 मध्ये सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या "देशाचे दुश्मन" पुस्तिकेला लिहिलेल्या प्रस्तावनासाठी न्या.फ्लेमिंग यांनी सहा महिन्याची शिक्षा सुनावली. पुढे न्या.लॉरेन्स यांच्या कोर्टात निर्दोष सुटका
• काही दिवस श्री शिवस्मारक हे पत्र चालवले. महाड व पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रहात सहभागी
• 1925 रोजी पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना बुधवार पेठेत महात्मा फुलेंचा पुतळा उभारावा असा ठराव मांडला परंतु सनातन्यांनी बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष ल. ज.आपटे यांनी जोरावर तो फेटाळून लावला. केशवराव जेधे, वायाळ, सणस, विठ्ठलराव झेंडे यांनी सभात्याग केला.
• गांधीजींच्या प्रभावाखाली आलेल्या केशवरावांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
No comments:
Post a Comment