◆ ब्राझीलने कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीमध्ये कोलंबियाचा पराभव करून विजेतेपद जिंकले.
◆ कोपा अमेरिका फेमेनिना महिला फुटबॉल स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. [ही स्पर्धा दक्षिण अमेरिकन फुटबॉल फेडरेशन (CONMEBOL) द्वारे आयोजित केली जाते.]
◆ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे.
◆ गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्र अनंत अंबानी चालवतात.
◆ आशिया रग्बी अंडर-20 (Sevens) चॅम्पियनशिप 2025 चे यजमानपद भारतातील बिहार राज्याला मिळाले आहे.
◆ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीर येथे होणाऱ्या आशिया रग्बी अंडर 20 (सेव्हन्स) चॅम्पियनशिपच्या शुभंकराचे अनावरण केले.
◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी 'मातृ वन' उपक्रम सुरू केला आहे.
◆ हिमाचल प्रदेश सरकारने 'हिम बस प्लस' योजना सुरू केली आहे.
◆ लांब प्रवासादरम्यान ट्रक चालकांना मदत करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 'अपना घर' उपक्रम सुरू केला आहे.
◆ ओडिशा राज्य सरकारने लँडरेस प्रजातींच्या संवर्धनासाठी श्री अन्न अभियान (SAA) अंतर्गत मानक कार्यप्रणाली (SOP) सुरू केली आहे.
◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी येथे "नो युवर विव्हज कॅम्पेन 2025" सुरू केले.
◆ तेलंगणा पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान-इलेव्हन' राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत 7,600 हून अधिक मुलांची सुटका केली.
◆ अरुणाचल प्रदेश राज्यात अर्ध-पाळीव गोवंशीय प्रजाती असलेल्या मिथुन (बॉस फ्रंटालिस) ची सर्वाधिक संख्या आढळते.
4 ऑगस्ट - चालू घडामोडी ♦️
1) सशस्त्र सीमा बल (SSB) चे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ संजय सिंघल
2) 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (VSSC) चे नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ डॉ. ए. राजराजन
3) भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ खालिद जमील
4) AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे ?
✅ भारत
5) 17 वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला आहे ?
✅ UAE
6) AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
✅ उत्तर प्रदेश
7) भारतीय सैन्याने दिव्य- दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे ?
✅ सिक्कीम
8) Policing and Trends in India हे कोणी लिहिले आहे ?
✅ दिनेशकुमार गुप्ता
9) अलिकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे ?
✅ रशिया
10) जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो ?
✅ 1 ऑगस्ट
━━━━━━━━━━━
No comments:
Post a Comment