14 October 2025

चालू घडामोडी :- 13 ऑक्टोबर 2025

◆ डॉ. अलेक्झांडर स्मिथ यांना 2025 सालचा शास्त्र रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ भेसळयुक्त आणि बनावट औषधांना रोखण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकारने औषध निरीक्षकांना औषध रसायनांची तपासणी करण्याचे अधिकार दिले आहेत.

◆ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंजाबमध्ये 'सरदार@150 - युनिटी मार्च' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

◆ नवी दिल्ली शहरात रोबोट-सहाय्यित मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) भारतातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे.

◆ दिल्लीमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'जागतिक वन्यजीव मेळा' आयोजित करण्यात आला आहे.

◆ Global Fintech Fest 2025 मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ बंगळूरु येथील बन्नेरघट्टा जैविक उद्यानात भारतातील पहिले पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे प्राणीसंग्रहालय उभारले जात आहे. [कर्नाटक]

◆ गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी आसाम राज्यात ओरुनोडोई 3.0 योजना सुरू करण्यात आली आहे.

◆ तैवानने चीनच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी 'टी-डोम' नावाची नवीन बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली आहे.

◆ आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन 2025 ची थीम "निधीची लवचिकता, आपत्ती नाही" ही आहे.

◆ आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिनाच्या 2024 ची थीम "पुढील पिढीला लवचिक भविष्यासाठी सक्षम करणे" ही होती.

◆ 2025 चे "स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार" अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोएल मोकिर, फिलिप एघियन आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे.

No comments:

Post a Comment