◆ ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ला भारतीय सैन्याकडून लेफ्टिनेंट कर्नल हे पद देण्यात आले आहे.
◆ भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे वैज्ञानिक डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे निधन झाले आहे.
◆ रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
◆ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
◆ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन 2024 ची थीम "भविष्यातील पिढ्यांसाठी हिम बिबट्याच्या अधिवासांचे रक्षण करणे" ही होती.
◆ सरकारने उच्च उत्पादन देणाऱ्या, लांब-स्टेपल कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 'कापूस उत्पादकता अभियान' सुरू केले आहे.
◆ मासाको नोझावा यांना जपानच्या 2025 च्या 'पर्सन ऑफ कल्चरल मेरिट' पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
◆ जागतिक वन संसाधन मूल्यांकन (GFRA) 2025 च्या अहवालानुसार, एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर नववा आहे.
◆ आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) चा 90 वा सदस्य देश म्हणून तुवालू सरकार अधिकृतपणे सामील झाले आहे.
◆ मोरक्कोने अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवून चिली येथे झालेला फिफा अंडर-20 विश्वचषक 2025 जिंकला आहे.
◆ युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये मॅक्स व्हर्स्टापेनने लँडो नॉरिस आणि चार्ल्स लेक्लेर्क यांच्यावर विजय मिळवला.
◆ भारत आणि युनायटेड किंग्डमने रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे.
◆ JAIMEX 2025 हे भारत आणि जपान यांच्यातील एक सागरी सराव आहे, ज्यात भारतीय नौदलाचे युद्धपोत INS सह्याद्री सहभागी झाले आहे.
No comments:
Post a Comment