23 October 2025

चालू घडामोडी :- 21 & 22 ऑक्टोबर 2025


◆ गोवा येथे 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान FIDE Chess World Cup 2025 होणार आहे. 

◆ मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे.

◆ छत्तीसगड राज्य सरकारने काळवीटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्यासाठी पाच वर्षांचा (2021-2026) पुनरुत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे.

◆ भारतामध्ये दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ 125 व्या इंडियन फुटबॉल असोसिएशन (IFA) शिल्ड 2025 "मोहन बागान सुपर जायंट" फुटबॉल संघाने जिंकली.

◆ महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन फायर ट्रेल' राबवले आहे.

◆ Graded Response Action Plan (GRAP) हा दिल्ली-NCR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेला आराखडा आहे.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) दरवर्षी 20 ऑक्टोबर रोजी ऑस्टिओपोरोसिसविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) 2025 ची थीम "हे अस्वीकार्य आहे!" (It's unacceptable!) ही आहे.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) 2024 ची थीम "नाजूक हाडांना नाही म्हणा" (Say No to Fragile Bones) ही होती.

◆ मशीनद्वारे गटार स्वच्छता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'मॅनहोल ते मशीन होल' ही योजना सुरू केली आहे.

◆ Wildlife Institute of India (WII) ने "Status of Elephants in India" हा अहवाल प्रसिद्ध केला.

◆ चौथी दक्षिण आशियाई (SAAF) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025, 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान झारखंडमधील रांची येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल.

No comments:

Post a Comment