22 October 2025

राज्य पुनर्रचना संदर्भातील आयोग व समित्या



1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1948

🔸️ अध्यक्ष: एस. के. धार

🔸️ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा

 ✔️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली

 ✔️ मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत व्यक्त


2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1949

🔸️ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या

🔸️ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक तत्त्वास विरोध केला

 ✔️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही


3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)

🔸️ स्थापना: 1953

🔸️ अहवाल: 1955

🔸️ अध्यक्ष व सदस्य:

 ✔️ फाजल अली (अध्यक्ष)

 ✔️ के. एम. पण्णीकर

 ✔️ हृदयनाथ कुंझरू


🔸️ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन

 ✔️ ‘एक राज्य - एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार

 ✔️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले

No comments:

Post a Comment