💎 नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP) घटनादुरुस्त्यांद्वारे जोडलेली
🔹 1976 – 42 वी घटनादुरुस्ती
1.मुलांच्या निरोगी विकासाच्या संधी सुरक्षित करणे (अनुच्छेद 39)
2.समान न्यायाचा प्रचार करणे व गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणे (अनुच्छेद 39A)
3.उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करणे (अनुच्छेद 43A)
4.पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, तसेच जंगले व वन्यजीवांचे रक्षण करणे (अनुच्छेद 48A)
🔹 1978 – 44 वी घटनादुरुस्ती
➤ राज्याने उत्पन्न, स्थिती, सुविधा व संधी यांतील असमानता कमी करणे आवश्यक (अनुच्छेद 38)
🔹 2002 – 86 वी घटनादुरुस्ती
➤ अनुच्छेद 45 मध्ये बदल: सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचे संगोपन व शिक्षण राज्याने करणे.
➤ कलम 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार घोषित.
🔹 2011 – 97 वी घटनादुरुस्ती
➤ सहकारी संस्थांशी संबंधित नवीन तत्त्व (अनुच्छेद 43B) —
✅️ ➤ सहकारी संस्थांची निर्मिती प्रोत्साहित करणे
✅️ ➤ त्यांचे स्वायत्त कामकाज व लोकशाही नियंत्रण सुनिश्चित करणे
✅️ ➤ व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देणे
No comments:
Post a Comment