22 October 2025

मुळशी सत्याग्रह



🔹️स्थान व कालावधी

➤ ठिकाण: पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसर

➤ कालावधी: 1920 – 1921


🔹️नेतृत्व

➤ या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले.


🔹️कारण

➤ टाटा वीज कंपनीने वीज निर्मितीसाठी धरण बांधण्याची योजना आखली होती.

➤ या योजनेमुळे सुमारे 54 गावे धरणाखाली जाणार होती.

➤ शेतकऱ्यांची जमीन बुडणार असल्याने त्यांनी विरोध सुरू केला.


🔹️घटना व पार्श्वभूमी

➤ शेतकऱ्यांनी जमिनींच्या अन्यायकारक संपादनाविरोधात आंदोलन केले.

➤ सेनापती बापट यांनी या संघर्षाचे नेतृत्व करत जनजागृती केली.

➤ हे आंदोलन औपनिवेशिक शासन व भांडवलदारांच्या संयोगाविरोधातील ग्रामीण असंतोषाचे प्रतीक ठरले.


🔹️परिणाम व व्यापक प्रभाव

➤ मुळशी सत्याग्रहामुळे जमिनींचे हक्क, विकास प्रकल्पांतील पुनर्वसन, आणि शेतकऱ्यांच्या हितांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले.

➤ पुढील काळात (1926-27) बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब व आंध्र प्रदेशात किसान सभा व इतर शेतकरी संघटना स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळाले.

No comments:

Post a Comment