22 October 2025

महत्वाचे समाजसुधारक व राष्ट्रीय चळवळीशी संबंधित प्रश्नोत्तरं

१) आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक — महात्मा ज्योतिराव फुले


२) इ.स. १९०२ मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गासाठी ५०% आरक्षणाचा निर्णय घेणारे संस्थानिक — राजर्षी शाहू महाराज (कोल्हापूर)


३) जे. एस. मिल व स्पेन्सर यांच्या विचारांनी प्रभावित समाजसुधारक — गोपाळ गणेश आगरकर


४) पुणे व नगर जिल्ह्यातील इ.स. 1875 मधील ‘दख्खन उठाव’ कोणाच्या विरोधात होता — सावकारांच्या विरोधात


५) असहकार ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला — नागपूर अधिवेशन, इ.स. १९२०


६) ‘चले जाव’ ठराव कोणत्या दिवशी पारित झाला — ८ ऑगस्ट १९४२


७) गांधीजींचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ मूळतः कोणत्या भाषेत लिहिले आहे — गुजराती


८) ‘दीनबंधू’ वृत्तपत्र व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली — नारायण मेघाजी लोखंडे


९) ‘हिंदू लेडी’ या नावाने लेखन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती — डॉ. रखमाबाई राऊत


१०) सत्यशोधक समाजाची स्थापना — इ.स. १८७३, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली

No comments:

Post a Comment