1️⃣ नागरी क्षेत्राची व्याख्या (Census Definition)
➤ जनगणनेनुसार दोन प्रकारची शहरे नागरी क्षेत्रात समाविष्ट केली जातात:
अ) वैधानिक शहरे (Statutory Towns)
⮞ जिथे महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे अस्तित्वात आहेत.
⮞ किंवा जी शहरे शहर क्षेत्र समितीने सूचीकृत केली आहेत.
ब) जनगणना शहरे (Census Towns)
⮞ लोकसंख्या किमान 5000 असणे आवश्यक.
⮞ पुरुषांपैकी किमान 75% कामगार गैरकृषी व्यवसायात असावेत.
⮞ लोकसंख्या घनता (density) प्रती चौ.कि.मी. 400 पेक्षा जास्त असावी.
2️⃣ भारताची नागरी लोकसंख्या (2011)
➤ नागरी लोकसंख्या = 37,71,06,125
➤ भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 31.14% ही नागरी आहे.
3️⃣ वर्ग-1 शहरे (Class I Towns)
➤ परिभाषा : ज्या शहरी भागाची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे.
◉ 2001 मध्ये – वर्ग-1 शहरे = 394
◉ 2011 मध्ये – वर्ग-1 शहरे = 468
4️⃣ दशलक्षी शहरे (Million Plus Cities)
➤ परिभाषा : लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त
◉ 2001 मध्ये – अशी शहरे = 35
◉ 2011 मध्ये – अशी शहरे = 53 (468 वर्ग-1 शहरांपैकी)
📝 टीप: दशलक्षी शहरे म्हणजे मेगा सिटीज नव्हेत. मेगा सिटीज = 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या (उदा. मुंबई, दिल्ली, कोलकाता).
No comments:
Post a Comment