स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
29 November 2020
पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती
पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी
पृथ्वीचा आकार - जिऑइड
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.
पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.
पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.
पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.
पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.
पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.
पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.
🎯पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याचे परिणाम :
पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.
५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
केशवानंद भारती खटला
संपुर्ण नक्की वाचा...
🔘 राज्यशास्त्र Imp घटक
🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.
🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.
🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.
🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?
🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.
🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*
🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.
🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.
🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.
🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.
🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.
🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.
🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*
आझाद हिंद सेना -
◾️ जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.
◾️ नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
◾️ नताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.
◾️ आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
◾️ 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.
◾️ आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.
◾️ लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
भारतातली जागतिक वारसा स्थळे
🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,
🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे,
🍀 7 नैसर्गिक ठिकाणे
🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.
🎇 ♻️सांस्कृतिक♻️ 🎇
💐आग्रा किल्ला 🏰, आग्रा( उत्तरप्रदेश)
💐अजिंठा लेणी, महाराष्ट्र
💐 नालंदा विद्यापीठ 🏢 , बिहार
💐 बौद्ध स्मारक , सांची, मध्यप्रदेश (1989)
💐 चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
💐 छत्रपती शिवाजी टर्मिनस
🚂🚃🚃, मुंबई, महाराष्ट्र
💐 गोव्याचे चर्च 🏥आणि कॉन्व्हेंट
💐 एलिफंटा लेणी/ 🗿 घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
💐 वल्लोर/ 🗿वरूळ लेणी, महाराष्ट्र
💐 फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
💐 चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
💐 हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
💐 महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
💐 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
💐राजस्थानामधील 🏔पर्वतीय किल्ले
💐 अहमदाबाद 🛣ह ऐतिहासिक शहर
💐 हुमायूनची कबर, दिल्ली
💐 खजुराहो, मध्यप्रदेश
💐महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
💐 भारतातली पर्वतीय रेल्वे🚂🚃 (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
💐 कुतुब मिनार🕌, दिल्ली
💐 राणी की वाव🏟, पटना, गुजरात
💐 लाल किल्ला 🏰🗼, दिल्ली
💐 दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
💐 कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
💐 ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
💐 ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
💐 जंतर मंतर, जयपूर
💐 मबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत
🎇♻️ नैसर्गिक ♻️🎇
💐 ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान 🦌🐕 , कुल्लू, हिमाचल प्रदेश
💐 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान🦏🦏, आसाम
💐 मानस राष्ट्रीय उद्यान 🐘 , आसाम
💐 केवलदेव राष्ट्रीय उद्यान 🦢🦌, राजस्थान
💐 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 🐅🏝, पश्चिम बंगाल
💐 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान🌻, उत्तराखंड
💐 पश्चिम घाट⛰⛰ (सह्याद्री पर्वतरांगा)
🎇♻️ मिश्र ♻️🎇
💐 खांगचेंडझोंगा 🐼 🐆राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....
🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो.
🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती (President) हे लोकांद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात.
🔸राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते.
🔸गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग (priviledged class) नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात.
🔸 “भारत आणि अमेरिका” हे दोन Republic देशांची प्रमुख उदाहरणे आहेत.
🔸२६ जानेवारी १९५० ला भारत हा प्रजासत्ताक झाला.
🔸 महत्वाचे म्हणजे, भारताचे राष्ट्रपती आपल्या दस्तऐवजावर “PRESIDENT REPUBLIC OF INDIA” असेच लिहतात.
महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे
🔸परवरा नदी व मुला नदी - नेवासे,
अहमदनगर
🔸मळा व मुठा नदी - पुणे
🔸गोदावरी व प्राणहिता - सिंगेचा,
गडचिरोली
🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
तिर्थक्षेत्र, जळगाव
🔸कष्णा व वेष्णानदी - माहुली,
सातारा
🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे
🔸कष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
सांगली
🔸कष्णा व कोयना - कराड, सातारा
🔸गोदावरी व प्रवरा - टोके,
अहमदनगर
🔸कष्णा व येरळ - ब्रम्हनाळ, सांगली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 November 2020
वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स.
🔰भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून कामाच्या अनेक ऑफर येत आहेत. कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.
🔰इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जगभरातील अनेक कंपन्या भारतातील हायप्रोफाईल टेक्निकल टॅलेंटच्या शोधात आहेत. करोनाचा काळ सुरु होण्यापूर्वी या प्रोफेशनल्सना जेवढी मागणी होती त्यापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त मागणी सध्या या लोकांना मिळत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.
🔰या हायप्रोफाईल टेकीजना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियातील Instahyre, Interviewbit, Rocket, Techfynder, CIEL HR Services and Pesto Tech यांसारख्या कंपन्या कामावर रुजू करुन घेण्यास उत्सुक आहेत.
🔰इन्स्टाहायरचे सहसंस्थापक सरबोजित मलिक बिझनेस लाईनशी बोलताना म्हणाले, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कंपन्या नवी भरती करण्यास उत्सुक नव्हत्या. त्यांचा व्यवसाय थंड पडला होता. मात्र, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या काळात भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. इन्स्टाहायर सध्या ८,७०० कंपन्यांसोबत काम करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,३०० इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बहुतकरुन त्यांचे क्लायन्ट्स हे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहेत.
संविधान लोकांना समजले पाहिजे.
🔰अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़ुशन’ म्हणजे आपले संविधान समजून घ्या असा घेता येईल. देशातील नागरिकांना संविधानाची माहिती असली पाहिजे, त्याची जाण व्यापक झाली पाहिजे. त्यासाठी लोकांना संविधान समजावून सांगणेही गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत व्यक्त केले.
🔰नव्या पिढीला संविधानामध्ये नेमके काय आहे हे समजले पाहिजे, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये सातत्याने जागरूकता मोहीम राबवली पाहिजे. संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते तरुण पिढीत अधिक लोकप्रिय केले पाहिजे, त्यासाठी अभिनव मोहीम राबवण्याचा सल्ला मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांना दिला.
🔰आपल्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याला महत्त्व दिले गेले आहे. महात्मा गांधीही त्याबद्दल आग्रही असत. नागरिकांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे एकमेकांशी जोडलेले असतात. नागरिक आपले कर्तव्य पार पाडतात तेव्हा त्यांच्या हक्कांचेही रक्षण होते यावर गांधीजींचा विश्वास होता. नागरिकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल अशी अपेक्षा संविधानातही व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वानी आपल्या संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षांपासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभरा साजरा केला जातो.
वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो
➡️भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पाणबुडी किंवा जहाज नष्ट करण्यासाठी टॉरपीडो हे सर्वात अचूक शस्त्र आहे.
💎ठळक वैशिष्ट्ये ..
‘➡️वरुणास्त्र’ हा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी टॉरपीडो आहे.वरुणास्त्र 40 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही पाणबुडी नष्ट करण्यास सक्षम आहे. ते ताशी 74 किलोमीटर वेगाने हल्ला करते.वरुणास्त्र टॉरपीडोचे वजन सुमारे दीड टन आहे. ते पाणबुडीभेदी टॉरपीडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
➡️खोल आणि उथळ पाण्यातल्या पाणबुड्यांनाही या टॉरपीडोने लक्ष्य करता येणार. त्यात जोडलेल्या ‘GPS’ यंत्रणेमुळे लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणे या टॉरपीडोला सहज शक्य आहे.
इतर बाबी
➡️वरुणास्त्राने भारतीय युद्धनौका आणि सिंधू श्रेणीतली पाणबुडी सुसज्ज असणार.संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) विशाखापट्टणम येथील ‘नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी’ने (NSTL) वरुणास्त्र विकसित केले आहे. तर ‘भारत डायनॉमिक्स लिमिटेड’ने (BDL) त्याचे उत्पादन सुरू केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट
१८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म (१४ एप्रिल)
१९०७ मँट्रीक परीक्षा पास
१९०७ रमाबाई वलंगकर सोबत मंगल परिणय
१९१० इन्टरमीडिएट परीक्षा पास
१९१२ BA परीक्षा पास
१९१३ उच्च शिक्षणाकरिता न्युयॉर्क ला रवाना
१९१५ अँन्शंट इंडियन काँमर्स या प्रबंधावर MA ची उपाधी
१९१६ Ph d पदवी बहाल
१९१८ सिडेनहँम काँलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती (११ नोव्हेंबर)
१९२० राजश्री शाहू यांच्या साहाय्याने 'मुकनायक'चा पहिला अंक (३१ जानेवारी)
१९२२ बॅरिस्टरची परीक्षा पास
१९२३ डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल
१९२४ बहिष्कृत हितकारणी सभा ची स्थापन मुंबई (२० जुलै)
१९२७ बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन (३ एप्रिल)
१९२७ मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती
१९२७ महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर)
१९२८ समता पाक्षिकाचा आरंभ (२९ जून)
१९३० काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह प्रारंभ (३ मार्च)
१९३० लंडन येथे गोलमेज परिषदे साठी मुंबईहून रवाना (२ ऑक्टोबर)
१९३० जनता साप्ताहिकाचा आरंभ (२४ नोव्हेंबर)
१९३१ मनीभवण मुंबई येथे गांधी सोबत पहिली भेट (१४ ऑगस्ट)
१९३१ अल्पसंख्याकाच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध (८ ऑक्टोबर)
१९३१ गांधी-आंबेडकर-पंचम जाँर्ज यांची भेट (२६ नोव्हेंबर)
१९३२ पुणे करारावर स्वाक्षरी (२५ सप्टेंबर)
१९३५ मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती (२ जून)
१९३५"हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" डाँ आंबेडकराची धर्मातराची घोषणा, येवला (१३ ऑक्टोबर)
१९३६ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना (१५ ऑगस्ट)
१९३७ मुंबई असेंब्ली निवडणूक डाँ आंबेडकर विजयी (१७ फेब्रुवारी)
१९४२ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना (१७ एप्रिल)
१९४२ मजूर मंत्री म्हणून नियुक्ती
१९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना (२० जून)
१९४७ भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून नियुक्ती (२९ ऑगस्ट)
१९४७ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती (२९ ऑगस्ट)
१९४८ बाबासाहेब यांचा दुसरा परिणय (१५ एप्रिल)
१९४९ घटना समितीने घटना स्विकार केली (२६ नोव्हेंबर)
१९५० औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना (१९ जून)
१९५१ हीन्दु कोड बिल व मागास वर्गीयाच्या आरक्षणा बाबत मंत्री परिषदेचा राजीनामा (२७ सप्टेंबर)
१९५२ प्रथम सार्वत्रिक निवडणूक मध्ये पराभव (जानेवारी)
१९५२ राज्य सभेसाठी निवड (मार्च)
१९५२ कोलंबिया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लाँ पदवी बहाल (५ जून)
१९५३ हैद्राबाद उस्मानीया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लीटरेचर पदवी बहाल (१२ जानेवारी)
१९५४ भंडारा पोट निवडणूकी मध्ये पराभव (मे)
१९५५ भारतीय बौद्ध महासभेची स्थापना (४ मे)
१९५६ नरेपार्क येथे आँक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा (२४ मे)
१९५६ नागपुरात पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमनी यांच्या हस्ते पत्नी सोबत धम्म दीक्षा घेतली व नंतर ५ लाख अस्पृश बांधवाना बौद्ध धम्माची दीक्षा दिली (१४ ऑक्टोबर)
१९५६ चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश बांधवाना धम्म दीक्षा दिली (१६ ऑक्टोबर)
१९५६ दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (६ डिसेंबर)
१९५६ मुंबई येथे दादर चौपाटीवर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार (७ डिसेंबर)
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
🔴 महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग
1]. कोकण किनारपट्टी
2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी
1]. कोकण किनारपट्टी :
🔶 स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
🔸 लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
🔸क्षेत्रफळ: 30,394 चौ.कि
2] सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :
🔸 स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
🔶 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
🔶 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :
🔸 स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
🔸लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.
🔸 ऊंची: 450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
▪️महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्यांनी व्यापले आहे
हृदयाचे ठोके
हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट
झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
▪️हदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
▪️हदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
▪️ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
▪️ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार
🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
🔰 देश : सौदी अरेबिया
🏆 स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान
🔰 देश : अफगाणिस्तान
🏆 ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
🔰 देश : पॅलेस्टाईन
🏆 ऑर्डर ऑफ झायेद
🔰 देश : संयुक्त अरब अमिरात
🏆 सियोल शांती पुरस्कार
🔰 देश : दक्षिण कोरिया
🏆 यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ
🔰 संस्था : संयुक्त राष्ट्र
🏆 ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
🔰 संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन
🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां
🔰 देश : बहरीन
🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार
🔰 देश : मालदीव
🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू
🔰 दश : रशिया
🏆 टाईम्स पर्सन ऑफ द ईयर : २०१६ .
बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा.
🔶अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
🔶कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, अमेरिकेशी कॅनडाचे निकटचे संबंध आहेतच, भौगौलिक स्थिती व व्यक्तिगत संबंध यामुळे दोन्ही देशांत आर्थिक संबंध मजबूत आहेत. कोविड १९ साथीचा मुकाबला, शांतता व सर्वसमावेशकता, आर्थिक भरभराट, हवामान बदल या मुद्दय़ांवर नवीन प्रशासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हे दोन्ही देश एकत्रितपणे जागतिक आव्हानांना तोंड देतील.
🔶ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, अमेरिका हा आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. सामुदायिक अग्रक्रमांच्या मुद्दय़ांवर आम्ही काम करू. त्यात हवामान बदल, व्यापार व सुरक्षा यांचा समावेश आहे.
🔶ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बायडेन यांच्याकडून नव्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली असून नवीन अध्यक्षांची निवड ही अमेरिकेसाठीच नव्हे तर आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले
1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष
2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर
3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस
4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस
5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन
6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे
7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद
8) चितगाव कट:- 1930
🔶 सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
🔴 टीप:- इतिहासात कटावर प्रश्न आला तर या बाहेरचा प्रश्नच बनू शकत नाही.
प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
🔶मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
🌱कर्तरी प्रयोग
🌱कर्मणी प्रयोग
🌱भावे प्रयोग
1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
उदा .
👉तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)
👉ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
👉त चित्र काढतात. (कर्ता- वचन)
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग
2. अकर्मक कर्तरी प्रयोग
1. सकर्मक कर्तरी प्रयोग :
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
राम आंबा खातो.
सीता आंबा खाते.
ते आंबा खातात. (वचन)
2. अकर्मक कर्तरी प्रयोग :
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
राम पडला
सिता पडली (लिंग)
ते पडले (वचन)
2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :
क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
उदा .
राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)
प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न
❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?
१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही
❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?
१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात
❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?
१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया
❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?
१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही
❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?
१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे
❇️परश्न 6️⃣:- ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅
❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?
१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही
❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?
१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही
❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?
१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅
❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?
१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅
मानवधर्म सभा
◾️सथापना:-22 जून 1844
◾️ठिकाण:-सुरत
◾️पढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम
🔺सहभाग:-
◾️दिनमनी शंकर
◾️दामोदरदास
◾️दलपत राम भागूबाई
🔺प्रार्थना दिवस:-रविवार
🔺तत्वे:-
◾️ईश्वर एकच असून पूज्य व निराकार आहे
◾️जातिभेद पाळू नये
◾️परत्येकाला विचार करण्याचे स्वंतत्र आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव
🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?
१) शाहू महाराज ✅✅
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही
🔹परश्न २:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?
१) कलम ३४०✅✅
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३
🔹परश्न ३:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?
१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅
४) भंते सद्दतिस्स
🔹परश्न ४:- विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?
१) १९९२
२) १९८९
३) १९९०✅✅
४) १९९१
🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?
१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅
३) हू वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स
🔹परश्न ६ :- १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?
१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी✅✅
४) डी.एस सी
🔹परश्न ७ :- महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?
१) ५१ फूट ✅✅
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट
🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?
१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर ✅✅
४) यापैकी नाही
🔹 परश्र ९ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?
१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅
🔹 परश्न १० :- जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?
१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅✅
भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती
🔶भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे.
🔶बरिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे.
🔶 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली.
🔴भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे.
🔶शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.
🔰सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
🔴 रचना :
1. न्यायाधीशांची संख्या :
🔶सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात.
🔶नयायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.
2. न्यायाधिशांची नेमणूक :
🔶सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो.
🔶इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.
🔴 न्यायाधीशांची पात्रता :
🔶तो भारताचा नागरिक असावा.
🔶तयाने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.
🔶कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.
🔶राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.
🔴 कार्यकाल :
🔶वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.
🔴 शपथविधी :
🔶घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.
🔴 पदमुक्ती :
🔶कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे .
🔶परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.
🔶निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :
🔶सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही.
🔶 कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.
🔴सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी क्षेत्र :
🔶कायदातज्ज्ञांच्या मतानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार प्राप्त झाले आहे ते पुढीलप्रमाणे आहेत.
1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :
🔶जया खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात.
🔰पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात.
1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद.
2. घटकराज्यातील वाद.
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न.
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.
🔴 पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :
🔶भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.
🔴 परमार्षदायी अधिकार :
🔶घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
🔴 अभिलेख न्यायालय :
129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे.
त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
🔴मूलभूत अधिकारांचे संरक्षण :
🔶दशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
Q1) कोणता संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशानंतर इस्रायल देशाला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा तिसरा देश ठरला?
------- सुदान
Q2) भारताचे प्रथम आंतरग्रही अभियान आहे?
-------- MOM
Q3) कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग (ZSI) कार्य करते?
------- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
Q4) कोणती आंतरसरकारी संस्था बेकायदेशीर कृत्यांना वित्तीय सहाय्य बंद करण्यासाठी कायदेशीर उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी करते?
------ वित्तीय कृती कार्य दल
Q5) कोणत्या भारतीय राज्यात ‘बम ला’ हे ठिकाण आहे?
--------- अरुणाचल प्रदेश
Q6) कोणत्या राज्यात ‘किसान सूर्योदय योजना’चा आरंभ करण्यात आला?
--------- गुजरात
Q7) कोणता देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या संस्थेच्या 190व्या सदस्याच्या रूपाने सहभागी झाला?
---------- अंडोरा
Q8) कोणत्या जिल्ह्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) याची अंमलबजावणी करण्यात पहिला क्रमांक देण्यात आला?
----------- मंडी ( हिमाचल प्रदेश )
Q9) कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ दिन साजरा केला जातो?
----------- 24 ऑक्टोबर
Q10) गिरनार रोपवे कुठे उभारण्यात आला आहे?
-------- गुजरात