23 March 2020

गुजरातच्या कंपनीला करोना व्हायरसचे टेस्ट किट बनविण्याचा परवाना

अहमदाबाद येथील कोसारा डायग्नोस्टिक या कंपनीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून करोनाव्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळाला आहे. भारतात करोना व्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. या किटवद्वारे अडीच तासामध्ये करोना व्हायरस संबधित चाचणी होवू शकते असा दावा या कंपनीने केला आहे. कोसारा डायग्नोस्टिक्स ही कंपनी अमेरिकेच्या को-डायग्नोस्टिक्स इंक आणि भारतीय अंबालाल साराभाई एंटरप्रायजेस या अन्य कंपन्यासोबत काम करते.

कोसारा डायग्नोस्टिक्सने परवाना मिळवण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे एका महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांना याचा परवाना मिळाला. अहमदाबाद मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे.

कोविड १९ वर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने त्याचे निदान करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या किटची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आमच्य़ाकडे आहे अशी माहिती को. डायग्नोस्टिक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्वेइट इगन यांनी दिली आहे.

भारतात १९५ जणांना आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून एकूण पाच जणांनी प्राण गमावला आहे. तसेच राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी येत्या रविवारी २२ मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

General Knowledge

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था

22 March 2020

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

1. सत्व – अ  

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌷3. सत्व – ब2

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

🌷4. सत्व – ब3

शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🌷5. सत्व – ब6  

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

🌷6. सत्व – ब10  

शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत

🌷7. सत्व – क  

शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

🌷8. सत्व – ड  

शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

🌷9. सत्व – इ  

शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

🌷10. सत्व – के  

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

अकबर : सुरुवातीचा काळ

अकबरने राज्यावर आल्याआल्या ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूँला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा. शेरशाहची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्ये चालवित होती. अकबरने त्यातील सगळ्या बलाढ्य अशा सिकंदरशाह सुरी वर चाल केली. दिल्लीची सल्तनत तर्दी बेग खानच्या हातात सोपवून अकबर स्वतः पंजाबकडे चालून गेला.

सिकंदरशाहने अकबरचा सामना न करता त्याला हुलकावण्या देणे पसंत केले. अकबर त्याचा पाठलाग करीत असताना दिल्लीवर सिकंदरशाहचा भाऊ आदिलशाह सुरीच्या हेमचंद्र विक्रमादित्य नावाच्या हिंदू सेनापतीने चाल केली. तर्दी खानने दिल्लीची तटबंदी केलेली नव्हती व हेमूचा हल्ला होताच तो शहर सोडून पळून गेला. हेमूने दिल्ली जिंकल्यावर आदिलशाहची सत्ता झुगारून दिली व स्वतःला राजा विक्रमादित्य या नावाने राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे हेमू दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू सम्राट झाला.

दिल्लीने अशाप्रकारे नांगी टाकल्याची खबर अकबरला मिळाल्यावर त्याच्या सल्लागारांनी त्याला आल्यावाटेने काबूलला पळ काढण्याचा सल्ला दिला. राजधानी गमावलेली असताना व सम्राट होउन अवघे काही महिने झालेले असताना राज्य परत मिळवण्याऐवजी काबूलमधील आपल्या नातेवाईकांचा आसरा घेणे जास्त हितावह असल्याचा तो सल्ला होता. अकबरच्या सेनानींपैकी एक बयराम खानने याचा विरोध केला व दिल्लीतून घूसखोरांना हाकलून देउन आपले राज्य परत घेण्यास अकबरला उद्युक्त केले. अकबरने आपले असलेले सगळे सैन्य घेउन दिल्लीवर चाल केली. दिल्लीतून पळालेला तर्दी बेग खान आता परत अकबरला येउन मिळाला व त्यानेही दिल्लीकडे न जाता परस्पर काबूलला जाण्याचा सल्ला दिला. काही काळानंतर बयरामखानने तर्दी बेग खानवर पळपुटेपणाचा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला. अबुल फझल व जहांगीरच्या मते बयरामखानने हे निमित्त काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला.

English grammar :- SYNONYMS

🔹Inherit - Bequeath (वारसाने मिळणे)

🔹Innocent - Sinless (निष्पाप)

🔹Insane - Abnormal (वेडा , भ्रमिष्ट)

🔹Insolent - Rude (उर्मट)

🔹Intensify - Aggravate ( तीव्र करणे)

🔹 Jealous - Envious ( मत्सर)

🔹Loyal , faithful , devoted - एकनिष्ठ , इमानदार

🔹Lucrative , Profitable - फायदेशीर , किफायतशीर

🔹Mature , Adult - परिपक्व , प्रगल्भ

🔹Meagre , Small - अत्यल्प , तोकडा

🔹Lucky , Fortunate - नशीबवान , भाग्यवान

🔹Loathsome , Abominable - किळसवाणा

🔹Lament , Mourn - शोक करणे

मराठी व्याकरण :- विरामचिन्हे

विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात.       

जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.           

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.          

आपण संभाषण करताना/बोलताना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो ज्या चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.           

विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.        

🟤विरामचिन्हचे प्रकार पुढीलप्रमाणे🟤        

१) पूर्णविराम (.)

२) अर्धविराम (;)

३) स्वल्पविराम (,)

४) अपूर्णविराम (:)

५) प्रश्नचिन्ह (?)

६) उद्गारवाचक (!)

७) अवतरणचिन्ह ("-")

८) संयोगचिन्ह (-)

९) अपसरणचिन्ह (_)

१०) विकल्प चिन्ह (/)      

भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग)

 इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर   चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले,  त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अहवाल  असे संबोधले जाते. 

हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात आला. हा खलिता  इतका सर्वसमावेशक होता की, भारतातील शैक्षणिक धोरणावर त्याचा पुढील पन्नास वर्षे प्रभाव टिकला.

प्राथमिक शिक्षणाची प्रगती इ. स. १८५४ ते १८८२ या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला. वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते. या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या. प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे. तसेच इंग्लंडमधील १८७० आणि १८७६ च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

याशिवाय प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय करावी आणि प्राथमिक शिक्षणासाठी शासनाच्या निधीपैकी निश्चित निधी राखून ठेवावा इत्यादी प्राथमिक शिक्षणविषयक प्रमुख शिफारशी होत्या. मात्र आयोगाने प्राथमिक शिक्षणासाठी निश्चितपणे किती निधी उपलब्ध करावा, याविषयी ठोस शिफारस न केल्यामुळे पुढील काळातही या शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही. आयोगाच्या इतर शिफारशींमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श माध्यमिक शाळा उघडावी, माध्यमिक शाळांच्या वरच्या वर्गात विदयापीठातील शिक्षणासाठी तयारी करणारे विषय व ज्यांचा व्यवहारामध्ये उपयोग होईल, असे व्यावसायिक विषय अशी विभागणी असावी. तसेच महाविदयालयांना अनुदान देताना ते विदयार्थी व प्राध्यापकांच्या संख्येवर आणि व्यवस्थापन खर्चावर अवलंबून ठेवावे, मुलींच्या शिक्षणासाठी स्थानिक आणि शासकीय निधींपैकी निश्चित निधी राखून ठेवावा, मिशनऱ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग कमी करावा आणि कोणत्याही धर्माचे प्रत्यक्ष शिक्षण शाळातून देऊ नये अशा शिफारशी होत्या.

Current Affairs - 22/03/2020

1)कोरोना विषाणूसंबंधी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्हाट्सअॅप सेवासाठी भारत सरकारने तयार केलेल्या चॅटबॉटचे नाव काय आहे?
(A) मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क.  √
(B) कोरोना इन्फो
(C) चॅटबोट-19
(D) कोरोना हेल्पडेस्क

2)______ ही ‘जागतिक चिमणी दिन 2020’ याची संकल्पना आहे.
(A) स्पॅरो अँड मॅन
(B) आय लव्ह स्पॅरोज.  √
(C) वर्ल्ड ऑफ स्पॅरोज
(D) स्पॅरोज हाऊसहोल्ड हॅप्पीनेस

3)भारताने लाइट मशीन गन या बंदुकींच्या खरेदीसाठी कोणत्या देशासोबत 880 कोटी रुपयांचा करार केला?
(A) इस्त्राएल.  √
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) संयुक्त अरब अमिरात
(D) रशिया

4)कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2020 सालाच्या जागतिक आनंद अहवालामध्ये प्रथम स्थान पटकवले?
(A) भारत
(B) नॉर्वे
(C) भुटान
(D) फिनलँड.  √

5)“टेक फॉर ट्राइबल” उपक्रम _ कडून सुरू करण्यात आला आहे.
(A) भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED).  √
(B) आदिवासी संशोधन संस्था (TRI)
(C) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST)
(D) राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ (NSTFDC)

6)21 मार्च 2020 रोजी पाळण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना काय आहे?
(A) फॉरेस्ट अँड एज्यूकेशन
(B) फॉरेस्ट अँड बायोडायव्हरसिटी.  √
(C) फॉरेस्ट अँड सस्टेनेबल सिटीज
(D) फॉरेस्ट अँड वॉटर

7)_____ याच्या जीवाश्माचे परीक्षण केल्यानंतर कॅनेडाच्या शास्त्रज्ञांना मत्स्य पंखाचा मानवी हाताशी असलेला संबंध दिसून आला आहे.
(A) एल्पिस्टोस्टेज.  √
(B) कॅलिप्ट्राफोरस वेलाटस
(C) व्हेनेरीकार्डिया प्लॅनिकोस्टा
(D) बांबीराप्टर फेनबर्जी

8)वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाने एक समिती नेमली. आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) अनूप सिंग
(B) अशोक लाहिरी
(C) एन. के. सिंग.  √
(D) अरविंद मेहता

9)कोणत्या संस्थेकडून नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वावलंबन एक्सप्रेस’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली?
(A) भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI). √
(B) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)
(C) भारतीय निर्यात-आयात (EXIM) बँक
(D) रेल्वे मंत्रालय

10)कोणती पेमेंट बँक त्यांच्या ग्राहकांना ‘व्हिसा डेबिट कार्ड’ प्रदान करणार आहे?
(A) एअरटेल पेमेंट्स बँक
(B) आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक
(C) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
(D) पेटीएम पेमेंट्स बँक.  √

कोकण प्राकृतिक विभागाबद्दल माहिती

🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :

[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट

🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

आयएमएफ आणि जागतिकीकरण

जागतिकीकरणात तीन संस्था आहेत . जागतिक वित्तीय बाजारपेठ आणि ट्रान्सनेशनल कंपन्या , अमेरिकेच्या नेतृत्वात आर्थिक आणि लष्करी आघाड्यांमध्ये एकमेकांशी जोडलेली राष्ट्रीय सरकारे आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ), आयएमएफ आणि वर्ल्ड बँक यासारख्या वाढत्या “जागतिक सरकार” . [1990] चार्ल्स डर्बर यांनी आपल्या पीपल्स बर्फ प्रॉफिट या पुस्तकात युक्तिवाद केला आहे की , "या परस्पर संवाद करणार्‍या संस्था एक नवीन जागतिक सत्ता प्रणाली निर्माण करतात जिथे सार्वभौमत्वाचे वैश्वीकरण केले जाते, सत्ता आणि घटनात्मक अधिकार राष्ट्रांपासून दूर नेऊन जागतिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देतात".  टायटस अलेक्झांडर असा युक्तिवाद करतात की ही प्रणाली पाश्चात्य देशांमध्ये आणि बहुसंख्य वर्ल्डमधील जागतिक असमानता जागतिक वर्णभेदाच्या रूपात संस्थाभूत करते , ज्यामध्ये आयएमएफ एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

जागतिकीकरण होणारी आर्थिक संस्था स्थापन करणे ही एक लक्षण आणि प्रेरणा दोन्हीही आहे. जागतिक बँक, आयएमएफ क्षेत्रीय विकास बँक जसे की युरोपियन बँक फॉर रीस्ट्रक्शन and ण्ड डेव्हलपमेंट (ईबीआरडी), आणि डब्ल्यूटीओ सारख्या बहुपक्षीय व्यापार संस्थांचा विकास हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राथमिक अभिनेता विश्लेषित झाल्यामुळे राज्याच्या वर्चस्वापासून दूर सरकण्याचे संकेत देतो. घडामोडी. अशा प्रकारे राज्य सार्वभौमत्वाचा पुनर्विचार करण्याच्या दृष्टीने जागतिकीकरण बदलले गेले आहे .

1990  च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या प्रशासनाच्या आक्रमक आर्थिक नोटाबंदी मोहिमेनंतर जागतिकीकरणाच्या नेत्यांनी त्यांच्या बँकांची परकीय मालकी मर्यादित करणार्‍या, चलन विनिमय नियंत्रित करणारे आणि परकीय गुंतवणूकदारांकडून पैसे किती लवकर काढून घेता येतील यावरचे निर्बंध दूर करणारे सरकारचे दीर्घकालीन निर्बंध रद्द केले.

मे 2001  च्या आयएमएफच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की जगातील सरकारे जीवाश्म इंधन कंपन्यांना वर्षाकाठी .3..3 टीएन (£.4 टन) सह अनुदान देतात. मोजमाप म्हणजे कोळसा, तेल आणि वायू पेटवून प्रदूषक सरकारांवर न भरलेल्या खर्चाची भरपाई करतात. लोकसंख्येवर जीवाश्म इंधन अनुदानाचा अंदाज परिणाम - हवामान प्रदूषण, आरोग्य समस्या, पूर, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे चालवलेले वादळ - जागतिक पातळीवरील खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च.

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

• मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

• भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

• दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

• फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

• हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.

• चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

• उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

• कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

• नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

रंगनाथ मिश्रा ex-CJI चीही झाली होती राज्यसभेवर नियुक्ती

📌 न्या बहरुल इस्लाम
📌 न्या रंगनाथ मिश्रा
📌 न्या रंजन गोगोई

◾️ चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामांकित केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

◾️पण माजी सरन्यायाधीशांना राज्यसभेवर पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

◾️ यापूर्वीही काँग्रेसने माजी सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही अशीच घटना घडली होती.

🔰 कोण होते रंगनाथ मिश्रा ?

◾️रंगनाथ मिश्रा हे २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१ या काळात सरन्यायाधीश राहिले

◾️ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

◾️१९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार राहिले.

◾️बहरुल इस्लाम यांच्यानंतर राज्यसभेत जाणारे ते दुसरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ठरले होते. इस्लाम यांनाही काँग्रेसनेच राज्यसभेवर पाठवलं होतं.

🔰 इंदिरा गांधींकडून पहिल्यांदा नियुक्ती

◾️बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती.

◾️कारण, बहरुल इस्लाम हे १९५६ पासून काँग्रेसचे सदस्य होते. १९६२ आणि १९६८ ला दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पण आश्चर्यकारकरित्या त्यांनी १९७२ ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते तत्कालीन आसाम आणि नागालँड (सध्याचे गुवाहटी) हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.

◾️१९८० मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◾️ जस्टिस एम हिदायतुल्ला यांची निवृत्तीनंतर ९ वर्षांनी उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

◾️ माजी सरन्यायाधीश पी सदाशिवम यांची २०१४ मध्ये केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖