Sunday 22 March 2020

गुजरातच्या कंपनीला करोना व्हायरसचे टेस्ट किट बनविण्याचा परवाना

अहमदाबाद येथील कोसारा डायग्नोस्टिक या कंपनीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून करोनाव्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळाला आहे. भारतात करोना व्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. या किटवद्वारे अडीच तासामध्ये करोना व्हायरस संबधित चाचणी होवू शकते असा दावा या कंपनीने केला आहे. कोसारा डायग्नोस्टिक्स ही कंपनी अमेरिकेच्या को-डायग्नोस्टिक्स इंक आणि भारतीय अंबालाल साराभाई एंटरप्रायजेस या अन्य कंपन्यासोबत काम करते.

कोसारा डायग्नोस्टिक्सने परवाना मिळवण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे एका महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांना याचा परवाना मिळाला. अहमदाबाद मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे.

कोविड १९ वर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने त्याचे निदान करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या किटची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आमच्य़ाकडे आहे अशी माहिती को. डायग्नोस्टिक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्वेइट इगन यांनी दिली आहे.

भारतात १९५ जणांना आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून एकूण पाच जणांनी प्राण गमावला आहे. तसेच राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी येत्या रविवारी २२ मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...