Monday 23 March 2020

महाराष्ट्र लॉकडाऊन : काय सुरु राहणार आणि काय बंद?

🔰कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तूर्तास 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आाहे.

🔰 काय बंद असेल?

● परदेशातून येणारी वाहतूक बंद.
● मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद.
● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद.
● अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद.
● शाळा, महाविद्यालयं बंद.
● मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद.
● मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा पुरवण्यात याव्यात.
● शासकीय कार्यालयांमध्य फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

🔰काय सुरु असेल?

● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु.
● धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु.
● भाजीपाला वाहतूक सुरु.
● औषधांची दुकानं सुरु.
● बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु.
● वीजपुरवठा कार्यालयं सुरु.

🔰आजपासून 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

18 एप्रिल 2024 चालू घडामोडी

प्रश्न – WEF च्या 2024 च्या वर्गात अलीकडेच कोणाला यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले? उत्तर - अद्वैत नायर प्रश्न – जागतिक आवाज दिवस न...