Monday, 23 March 2020

ISRO पुढच्या वर्षी 10 पृथ्वी निरीक्षक उपग्रहांसह 36 अंतराळ मोहिमा पूर्ण करणार

🔰 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 36 अंतराळ मोहिमांचे नियोजन केले आहे.

🔰 36 अंतराळ मोहिमांमध्ये 10 पृथ्वी निरीक्षक (Earth Observation) उपग्रह, 10 PSLV मोहिमा, 3 दळणवळण उपग्रह, 3 अंतराळ विज्ञान उपग्रह, 2 सुचालन (Navigation) उपग्रह, 1 तंत्रज्ञान प्रदर्शन मोहीम, 1 GSLV MK-III, 3 GSLV MK-II, 2 SSLV मोहिमा, 1 गगनयान (मानवरहित) मोहीम यांचा समावेश आहे.

🔴भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

🔰 ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे.

🔰 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली.

🔰 ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 

🔴संस्थेनी केलेली कार्ये -

🔰 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.

🔰1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

🔰 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.

🔰 ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला .

🔰 पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

🔰फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.

🔰 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.

🔰सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.

🔰 यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

🔴प्रक्षेपक

🔰 ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले.

🔰ह्या कामाचे नेतृत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे दिले गेले होते. अग्निबाणात सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.

🔰 प्रथम प्रक्षेपण वर्ष 1979 मध्ये झाले.

🔰 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) - ISRO चा शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV)’ याचा जागतिक अंतराळ स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे.

🔰 PSLV हे ISRO चे अष्टपैलू प्रक्षेपण वाहक अग्निबाण आहे. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणांनंतर, PSLV हे ISRO चे ‘वर्कहोर्स लाँच व्हेईकल’ म्हणून उदयास आले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले.

🔰 PSLV हे जगातल्या सर्वात विश्वसनीय प्रक्षेपकांपैकी एक आहे. PSLV-C37 ही PSLV-XL ची एक सुधारित संरचना आहे.

🔴PSLV ची वैशिष्ठ्ये - 

🔰 उंची 44 मीटर

🔰 व्यास 2.8 मीटर

🔰 स्टेज ची संख्या 4

🔰 वाहून नेण्याची क्षमता

 320 टन (XL)

🔰प्रकार

 3 (PSLV-G, PSLV - CA, PSLV - XL)

🔰प्रथम उड्डाण

 20 सप्टेंबर 1993

🔰 भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातल्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. 

🔰GSLV हे उपग्रहाच्या GSATमालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV  मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.

🔰 या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.

🔰2017 साली तयार करण्यात आलेले ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हे भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले गेले. त्याचे वजन जवळपास 640 टन आहे.

🔰हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!

दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद...