२३ मार्च २०२०

अरुणाचल प्रदेशात “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” याची स्थापना

- बौद्ध तत्वज्ञान, संस्कृती आणि कला यांचे शिक्षण आणि बौद्ध धर्माच्या विविध पैलूंवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अरुणाचल प्रदेशाच्या दाहुंग या शहरात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies -CIHCS) याची स्थापना केली.

- आधुनिक विद्यापीठाच्या प्रणालीद्वारे तिबेटी, चिनी, पाली, संस्कृत, जापानी आणि इतर आशियाई भाषांमध्ये जतन केलेल्या प्राचीन बौद्ध हस्तलिपी आणि ग्रंथांचे जतन करणे आणि ते डिजिटल करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.

- संस्थेच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून वित्तपूरवठा केला जाणार आहे. तसेच संस्कृती मंत्रालयाच्या योजनांच्या माध्यमातून संशोधनासाठी निधी पुरवला जाणार आहे.

- वर्तमानात, तिबेट हाऊस, नवी दिल्ली; लायब्ररी ऑफ तिबेटियन वर्क्स अ‍ॅन्ड आर्चीव्ह, धर्मशाला; नामग्याल तिबेटोलॉजी संस्था, सिक्कीम; बौद्ध सांस्कृतिक शिक्षण केंद्र, तवांग मठ, अरुणाचल प्रदेश; आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ; आणि GRL मोनास्टिक स्कूल, बोमडिला, अरुणाचल प्रदेश या सहा संस्थांना बौद्ध संस्कृती आणि कलेच्या संवर्धनासाठी संस्कृती मंत्रालय वार्षिक अनुदान देखील देत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...