Monday 23 March 2020

सामान्यता आढळणाऱ्या ‘चिमणी’चा ‘IUCN रेड लिस्ट’मध्ये समावेश


आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) यांच्या धोक्यात असलेल्या प्रजातीच्या (endangered species) यादीत म्हणजेच ‘रेड लिस्ट’मध्ये सामान्यता सर्वत्र आढळणाऱ्या ‘चिमणी’चा समावेश करण्यात आला आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे, तपमानामुळे तसेच रासायनिक खते, ध्वनी प्रदूषण अश्या अनेक कारणांमुळे चिमणीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

20 मार्च 2020 रोजी “आय लव स्पॅरोज” या संकल्पनेखाली जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला.

IUCN विषयी

1948 साली स्थापना झालेली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय ग्लॅंड (स्विर्त्झलँड) या शहरात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...