Monday 23 March 2020

आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष अभियानामध्ये समावेश करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

◾️केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत योजनेचा एक घटक असलेल्या आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष आयभियानामध्ये समावेश करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

◾️आर्थिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या कालावधीसाठी आयुष केंद्रांच्या कारभारासाठी  3399.35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे, ज्यात 2209.58 कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा आणि 1189.77 कोटी रुपये राज्य सरकारचा वाटा असणार.

◾️अभियानाच्या अंतर्गत आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी खालील उद्दिष्टे साध्य करावी लागणार -

◾️विद्यमान सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीसह एकत्रीकरणातून प्रतिबंधात्मक प्रोत्साहन, रोगनिवारक, पुनर्वसन आणि उपशामक आरोग्य सेवा यावर लक्ष केंद्रित करून आयुष तत्वे आणि पद्धतींवर आधारित समग्र निरोगीकरण आदर्श स्थापित करणे.

◾️गरजू लोकांना आयुष सेवा उपलब्ध करून माहितीही उपलब्ध करून देणे.

◾️आयुष सेवांमध्ये जीवनशैली, मृत्यू, योग, औषधी वनस्पती आणि आयुष प्रणालीच्या सामर्थ्यानुसार निवडलेल्या परिस्थितीसाठी औषधांची तरतूद याविषयी जनजागृती समाविष्ट आहे.

🔰पार्श्वभूमी

◾️आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी / AYUSH) मंत्रालय आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत उप-आरोग्य केंद्रांपैकी 10 टक्के म्हणजेच 12,500 केंद्रे आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रे म्हणून चालविणार असा निर्णय घेण्यात आला असून, ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये एकात्मिक आरोग्य सेवांच्या बहुलवादी प्रणालीत आयुष प्रणालीच्या संभावित शक्यतांना मुख्य प्रवाहात नेण्याचे समर्थन केले आहे.

◾️भारत सरकारने फेब्रुवारी 2018 या महिन्यात निर्णय घेतला आहे की सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी विद्यमान उप-आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर करून दीड लक्ष आरोग्य व निरोगीकरण कल्याण केंद्रांची स्थापना केली जाणार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 14 एप्रिल 2024

◆ उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत. ◆ विंग कमांडर राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भ...