24 October 2021

Forward Bloc : फॉर्वर्ड ब्लाॕक

सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की,

"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."

या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.

पक्षाचे उद्दीष्ट -

कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते.

अध्यक्ष -उपाध्यक्ष

बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.

जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला.

जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.

त्यात
अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,
उपाध्यक्ष- एस.एस. कविशर
सरचिटणीस- लाल शंकरलाल
सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .

आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना
मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते.

मुखपत्र-फार्वड ब्लॉक

"नागपुर-पहिली परिषद "

२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.
परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली.

ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.


🅾1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.

🅾1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.

🅾संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.

🅾या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

🅾1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.

🅾भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.

🅾मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.

🅾1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.

🅾1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

दुसरे कर्नाटक युद्ध (१७४८-१७५४)

◆ युद्धाचे कारणः

√ डुप्लेची महत्वकांक्षा आणि हैद्राबाद व कर्नाटक राज्यातील वारसाहक्काच्या विवादामुळे (disputed succession) प्राप्त झालेली संधी, ही या युद्धाची महत्वाची करणे सांगता येतील.

√ सन १७४८ मध्ये निजाम-उल-मुल्कच्या निधनानंतर वारसापदासाठी त्याचा मुलगा नासीरजंग व त्याच्या मुलीचा मुलगा मुजफ्फरजंग यांच्यात कलह सुरू झाला. याच वेळी कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याची गादी आपणास मिळावी म्हणून चंदासाहेबदेखील प्रयत्नशील होता.

√ या विवादांचा फायदा डुप्लेने करून घेतला. त्याने मुजफ्फरजंग व चंदासाहेब यांची बाजू घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

√ त्यामुळे इंग्रजांनी देखील नासिरजंगला निझामपद मिळवून देण्याची व अन्वरूद्दीनचे कर्नाटकचे नवाबपद सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली.

√ यातूनच इंग्रज व फ्रेंचांचे दुसरे कर्नाटक युद्ध घडून आले.

◆ महत्वाच्या घटना:

√ या युद्धात फ्रेंचांना सुरुवातीला यश मिळत गेले. ऑगस्ट १७४९ मध्ये अंबूरच्या लढाईत अन्वरूद्दीन मारला गेला व १७५० मध्ये नासीरजंग मारला गेला. फ्रेंचांच्या मदतीने मुजफ्फरजंग निझाम बनला. हैद्राबादच्या दरबारात फ्रेंचांचे हितसंबंध जपण्यासाठी जनरल बसी (General Bussy) याच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवण्यात आले....

√ मात्र हा विजय अल्पकाळच ठरला. अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अली याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात शरण घेतली होती. त्याला पकडण्यासाठी चंदा साहेब व फ्रेंच यांच्या सैन्यांनी त्रिचनापल्लीला वेढा घातला.

√ हा वेढा ढिला करण्याच्या उद्देशाने रॉबर्ट क्लाईव्हने कर्नाटकच्या राजधानीवर म्हणजे अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती केली.

√ त्यानुसार क्लाईव्हने ऑगस्ट १७५१ मध्ये केवळ २१० सैनिकांच्या साहाय्याने अरकॉट जिंकून घेतले. आपल्या राजधानीचे संरक्षण करण्यासाठी चंदासाहेबने त्रिचनापल्लीहून ४००० सैनिक अरकॉटकडे पाठविले. मात्र ते अरकॉट पुन्हा प्राप्त करूं शकले. पुढे जून १७५२ मध्ये त्रिचनापल्ली येथून फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. चंदासाहेब तंजावरला पळून गेला, मात्र तंजावरच्या राज्याने चंदासाहेबचा खून घडवून आणला.

√ रॉबर्ट क्लाईव्हच्या अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती या युद्धाचा एक प्रकारे अॅन्टी-क्लायमॅक्स ठरला. मात्र त्रिचनापल्लीच्या पराभवाचे खापर फ्रेंच कंपनीने डुप्लेवर फोडले.

√ १७५४ मध्ये त्याला फ्रान्सला परत बोलविण्यात आले व त्याच्याजागी गॉडेव्हू (Godehu) यास नवीन गर्व्हनर म्हणून पाठविण्यात' आले.

√ गॉडेव्हूने १७५४ मध्ये इंग्रजांशी पाँडिचेरीचा तह करून युद्धबंदी केली.

√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबपदी मुहम्मद अली यास बसविले. मात्र, हैद्राबाद दरबारात फ्रेंच जनरल बसी याचा प्रभाव अजूनही प्रबळ होताच. त्याने १७५१ मध्ये मुजफ्फरजंग च्या मृत्यूनंतर सलबतजंग यास निझाम बनविले.

√ पाँडिचेरीच्या तहाने इंग्रजांनी फ्रेंचांवर राजकीय विजय मिळविला, तसेच बंगालमध्ये आपले साम्राज्यवादी धोरण राबवायला त्यांना भरपूर अवधी मिळाला.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

महाराष्ट्रातील अभयारण्ये

नरनाळा - अकोला
टिपेश्वर -यवतमाळ 
येडशी रामलिंग - उस्मानाबाद
अनेर - धुळे, नंदुरबार
अंधेरी - चंद्रपूर

औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - नांदेड,यवतमाळ

कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चपराला - गडचिरोली

जायकवाडी - औरंगाबाद
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर

पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे

मालवण - सिंधुदुर्ग
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती

यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली

वातावरणाचे थर

● पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात.

◆ वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

◆ भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो.

◆ या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.

◆ समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.

★ या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

■ हवेतील घटक  घटकाचे  प्रमाण

◆ नायट्रोजन 78.03%

◆ ऑक्सीजन 20.99%

◆ कार्बडायक्साईड 00.03%

◆ ऑरगॉन वायु 00.94%

◆ हॅड्रोजनवायु 00.01%

◆ पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

◆ एकूण हवा 100.00%.

2. तपस्तब्धी

◆ भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते.

◆ त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

◆ तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे.

◆ या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते.

★ स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

◆ मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

◆ मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे.

◆ सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.

◆ इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो.

◆ या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.

◆ एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो.

◆ या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर

◆ आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात.

◆ या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

मातीचे प्रकार व स्थान

1) गाळाची मृदा

◆ सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

2) काळी मृदा

◆ दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

3) तांबडी मृदा

◆ तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

4) वाळवंटी मृदा

◆ राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

5) गाळाची मृदा

◆ नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

राज्यतील सर्व प्रदेशिक परिवहन कार्यालय क्रमांक

◾️आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.

◾️ या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो.

◾️उदाहर्णार्थ रायगडमधील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या गाड्यांचा क्रमांक MH-06 ने सुरु होतो. या क्रमांकाने सुरु होणारी गाडी ही महाराष्ट्रातील (MH) सहाव्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे असा अर्थ होतो.

◾️दिवसोंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याने अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्रमांकाची यादी आता ५६ वर जाऊन पोहचली आहे.

◾️अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात आता MH-56 पर्यंतच्या गाड्या पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शहरातील गाड्यांसाठी कोणता क्रमांक वापरला जातो…

MH-01 – मुंबई (दक्षिण)
MH-02 – मुंबई (पश्चिम)
MH-03 – मुंबई (पूर्व)
MH-04 – ठाणे
MH-05 – कल्याण
MH-06 – रायगड
MH-07 – सिंधुदूर्ग
MH-08 – रत्नागिरी
MH-09 – कोल्हापूर
MH-10 – सांगली
MH-11 – सातारा
MH-12 – पुणे
MH-13 – सोलापूर
MH-14 – पिंपरी चिंचवड
MH-15 – नाशिक
MH-16 – अहमदनगर
MH-17 – श्रीरामपूर (अहमदनगर)
MH-18 – धुळे
MH-19 – जळगाव
MH-20 – औरंगाबाद
MH-21 – जालना
MH-22 – परभणी
MH-23 – बीड
MH-24 – लातूर
MH-25 – उस्मानाबाद
MH-26 – नांदेड
MH-27 – अमरावती
MH-28 – बुलढाणा
MH-29 – यवतमाळ
MH-30 – अकोला
MH-31 – नागपूर
MH-32 – वर्धा
MH-33 – गडचिरोली
MH-34 – चंद्रपूर
MH-35 – गोंदिया
MH-36 – बुलढाणा
MH-37 – वाशिम
MH-38 – हिंगोली
MH-39 – नंदूरबार
MH-40 – वाडी (नागपूर)
MH-41 – मालेगाव (नाशिक)
MH-42 – बारामती (पुणे)
MH-43 – वाशी (सानपाडा)
MH-44 – अंबेजोगाई (बीड)
MH-45 – आकलूज (सोलापूर)
MH-46 – पनवेल
MH-47 – बोरिवली
MH-48 – वसई
MH-49 – नागपूर (पूर्व) भंडारा रोड
MH-50 – कराड
MH-51 – संगमनेर (अहमदनगर)
MH-52 – परभणी (ग्रामीण)
MH-53 – पुणे (दक्षिण)
MH-54 – पुणे (उत्तर)
MH-55 – मुंबई (मध्य)
MH-56 – ठाणे (ग्रामीण)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)

🍁मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर

🍁नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान

🍁कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत

🍁वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड

🍁कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर

🍁चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे

🍁सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर

🍁बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा

🍁मांजरसुभा घाट बीड बीड – नगर

🍁अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर

🍁ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण

🍁धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई

🍁बोर घाट पुणे पुणे – मुंबई

🍁ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा

🍁दिवा घाट पुणे पुणे – बारामती

🍁कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण

🍁आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी

🍁आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव

🍁फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

🍁पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर.
_______________________

भारताचा भूगोल

भारताचा भौगोलिक नकाशा.

🍀भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात

🍀 भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

🍀भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता.

🍀पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. 

🍀भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला.

🍀आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.  गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.

अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.

अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. 

 पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते

. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. 

दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.

दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी
वर्षांपेक्षाही अधिक आहे.

 भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

♦️बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. 

♦️गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते.

♦️दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्.

♦️ मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात.

♦️ गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात.

♦️ दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. 

🍂भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे.

⭐️हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत.

⭐️थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात.

🍂जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैरुत्य मोसमी वार्‍यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. 

🍂हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते.

🍂अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. 

 🍂ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान. 

♦️भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.

♦️भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो. 

♦️भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.

♦️भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे. 

♦️भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.

♦️भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.

♦️भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.

♦️जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.

♦️21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.

♦️जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.

♦️के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.

♦️कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळच्या
सीमेवार आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.

♦️देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.

♦️भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.

♦️क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.

♦️लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

♦️चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.

♦️देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे. 

♦️भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील

♦️राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.

♦️भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.

♦️भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.

♦️भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.

♦️भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.

♦️देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.

♦️देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.

♦️देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.

♦️सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.