Ads

14 December 2021

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 22/11/2019

१)  भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द
     विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

   अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व  देशातील कायद्याचा आदर करणे.
   ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
   क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
   ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
   1) अ, क    2) ब      3) ड      4) सर्व

उत्तर :- 4
२)  मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

   1) मंत्रीमंडळ    2) जनता      3) प्रतिनिधी    4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर :- 2

३)   योग्य क्रम निवडा.
   अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे    ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
   क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे    ड) संविधानाचा सन्मान करणे

   1) अ, ड, क, ब    2) ड, अ, क, ब    3) ड, ब, अ, क    4) ड, अ, ब, क

उत्तर :- 2

४)  खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?
   1) देशाचे संरक्षण करणे            
   2) नियमित कर भरणे
   3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे    4) एकही नाही

उत्तर :- 2

५)  राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
   अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
   ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
   क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.
   ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
        वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?
   1) अ   
    2) ब, क 
    3) अ, ब, क
    4) सर्व

उत्तर :- 4

६)  मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.

अ) सार्वभौमत्वाचे रक्षण 

ब) राष्ट्रगीताचा सन्मान

क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण

ड) वैज्ञानिक दृष्टिकोन

    1) अ, ब, क, ड
    2) ब, अ, क, ड  
    3) ब, अ, ड, क  
    4) ड, क, ब, अ

उत्तर :- 3

७)  एका विशिष्ट मुलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवडयांचा उल्लेख मुलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?

   1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रधज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

   3) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे.

   4) 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

उत्तर :- 3

८)  खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

   1) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

   3) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.

   4) पंचायत राजची निर्मिती करणे.

उत्तर :- 4

९)  खालील विधाने लक्ष्यात घ्या :

   अ) स्वर्ण सिंह समितीच्या
मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

   ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

   क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

        वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?

   1) अ, ब
   2) ब, क   
   3) अ, क  
   4) क

उत्तर :- 1

१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

   ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनासबंधनकारक केले गेले.

        वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

   1) अ 
    2) ब  
   3) अ, ब  
   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

"भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक" कॅग (CAG)

- घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 दरम्यान कलम 148 ते 151 दरम्यान या पदाच्या तरतुदी आहेत.
- कलम 148(1) : नुसार भारताला एक कॅग असेल ज्याची नेमणुक राष्ट्रपती(पंतप्रधानांच्या सल्ल्याने)  करतात.
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रमाणे पदावरून बडतर्फ केले जाते त्याच प्रमाणे कॅगला पदावरून दूर केले जाते.
- कलम 148(2) : कॅगला शपथ हे परिशिष्ट 3 मधील शपथेच्या नमुन्यानुसार राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती देते.
- कलम 148(3) : कॅगचे वेतन तसेच निवृत्तीवेतन संसद ठरवील त्याप्रमाणे परिशिष्ट 2 प्रमाणे दिले जातील.
- कलम 148(4) : पदावधी संपल्यावर कॅग पुन्हा केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये कोणत्याही पदास पात्र असत नाही.
- कलम 148(5) : कॅगच्या अधिकारात ते पदावर असताना कोणतेही बदल करायचे असल्यास कॅगशी विचारविनिमय करून राष्ट्रपती करतील.
- कलम 148(6) : कॅग व त्यांचा प्रशासकीय व कार्यालयीन खर्च हा भारताचा संचित निधीतून केला जाईल.
- कॅग राजीनामा ध्यायचा असल्यास राष्ट्रपतीला देतील.

"कॅग" विषयी अन्य घटनात्मक तरतुदी
- कलम 149 : कॅगचे कर्तव्य व अधिकार
- कॅगची कर्तव्ये व अधिकार कायदा, 1971 नुसार कॅगची कामे सांगण्यात आली.
- 1976 साली या कायद्यात बदल करून कॅगची लेखविषयक कामे काढून केवळ लेखा परीक्षण कामे ठेवण्यात आली.
- कलम 150 : कॅग राष्ट्रपतींना केंद्र व राज्यसरकारचे लेखे कोणत्या नमुन्यात ठेवावेत याबाबत सल्ला देतात.
- कलम 151(1) : कॅग केंद्र सरकारचे लेखा अहवाल राष्ट्रपतींना देतात तर राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात.
- कलम 151(2) : कॅग राज्य सरकारचे लेखा अहवाल राज्यपालना देतात तर राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर प्रत्येक सभागृहात मांडतात.

अस्थायी संक्रमनशील व विशेष तरतुदी

🌺कलम:-

🎈371:-महाराष्ट्र व गुजरात

🎈371 A:-नागालँड

🎈371 B:-आसाम

🎈371 C:-मणिपूर

🎈371 D:-आंध्रप्रदेश तेलंगणा

🎈371 E:-आंध्रप्रदेश केंद्रीय विद्यापीठ

🎈371 F:-सिक्कीम

🎈371 G:-मिझोराम

🎈371 H:-अरुणाचल प्रदेश

🎈371 I:-गोवा

🎈371 J:-कर्नाटक

राज्यघटना प्रश्नपत्रिका

1) "अपराधाबद्दलच्या दोषसिद्दी संबंधात संरक्षण " घटनेत अशी तरतूद पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे ?

1) अनुच्छेद 20
2)अनुच्छेद 21
3)अनुच्छेद 22
4)अनुच्छेद 23

2) अचूक विधान शोधा

अ) देशात एका व्यक्तीला एका वेळी एका गुन्ह्याबाबत एकच शिक्षा दिली जाते
ब)देशात अस्तित्वात असलेल्या कायद्यानेच शिक्षा दिली जाऊ शकते अन्यथा नाही

1)फक्त अ                        2)फक्त ब
3)दोन्ही                           4)एकही नाही

3)कोणत्याही अपराधाचा आरोप असलल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही अशी तरतूद कोणत्या अनुच्छेद मध्ये आहे ?

1)अनुच्छेद 20 (1)
2)अनुच्छेद 20(2)
3)अनुच्छेद 20(3)
4) अनुच्छेद 22

4) अयोग्य विधान शोधा

अ)कायद्याने प्रक्रिया स्थापन केल्याशिवाय कोणाचे ही जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य वंचित केले जाऊ शकते
ब)जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याबाबत घटनेत कोणतीेही तरतूद नाही

1)फक्त अ                       2) फक्त ब
3) दोन्ही                         4) एकही नाही

5) अनुच्छेद 21 (A) मध्ये नमूद केल्याप्रमाणे .......... कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल अशी तरतूद आहे?

1) राष्ट्रपतीला
2) केंद्र सरकारला
3) राज्यपालला
4) राज्य सरकारला

6) मूळ घटनेत मूलभूत अधिकारात प्रत्यक्ष स्वरूपात जरी शिक्षणाचा हक्क नसला तरी अप्रत्यक्ष स्वरूपात मूलभूत अधिकार अनुच्छेद 21 मध्ये आहे असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात सांगितले होते ?

1) ए.के. गोपालन
2) गोलकनाथ केस
3) केशवानंद भारती केस
4) उन्नीकृष्णन केस

7) अनुच्छेद 22 (1 ) बाबत योग्य पर्याय
      निवडा

अ) कोणत्याही व्यक्तीस अटक केल्यास शक्य तितक्या लवकर अटकेचे कारण कळवावे लागते
ब) असे कळवल्या शिवाय स्थानबद्ध करता येत नाही
क) तसेच यानुसार त्यांना वकिलांची मदत /सल्ला घेण्याचा अधिकार आहे

1) अ आणि क                2) ब आणि क
3) अ आणि ब                 4) वरील सर्व

8) अनुच्छेद 22 (3)  मधील तरतुदी
     पुढील पैकी कोणत्या देशातील
      नागरिकांना लागू होत नाहीत ?

अ)पाकिस्थान
ब) बांगलादेश
क) चीन
ड) अफगाणिस्थान

1)अ आणि ब                    2) अ,ब,क
3) ब,क,ड।                       4) वरील सर्व

9) अनुच्छेद 22 (4)  मध्ये पुढीलपैकी
     कोणत्या न्यायाधीशाची तरतूद आहे ?

अ) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत
ब) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले
     असतील
क) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
     होण्याची पात्रता ठेवणारे न्यायाधीश

1)फक्त अ.                   2) फक्त क
3) वरील सर्व                4)  एकही नाही

10) मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत
       स्वातंत्र्याच्या अधिकारात किती
       अनुच्छेदाचा समावेश आहे ?

1) तीन          
2) चार
3) पाच
4) सहा

आजचा संपूर्ण पेपर अनुच्छेद 20,21,22 वर आहे

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✅ राज्यघटना उत्तरे ✅

1)- 1

2)- 3

3)- 3

4)- 3 अ) कायद्याने स्थापित केल्याशिवाय
               वंचित करता येत नाही
          ब) अनुच्छेद 21 मध्ये नमूद आहे

5)- 4 ( राज्यसरकार  हा शब्द नमूद आहे)

6)- 4 ( उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्रप्रदेश
           राज्य 1993 )
7)- 4

8)- 2

9)- 3 ( यापैकी कोणतीही पात्रता असेल
          तरीही चालते असेच नमूद आहे )

10)- 2 (  A- 19,20,21,22  असे एकूण
            4 आहेत )

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी) :

अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

 चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

प्राणी : जीवनकाळ

घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष

वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

 बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

 वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

 व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
 वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

 जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

 वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

 पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

 जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

 वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

 MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

 गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

 स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

 मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

 घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
 घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

 एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

 ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

 आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

 कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

 पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

 गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

 पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल
_______________________________

जाणून घ्या - ओझोन अवक्षय ( Ozone depletion )

ओझोन अवक्षय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणार्‍या ओझोन वायूच्या थरातील त्याचे प्रमाण कमी होणे.

ओझोन हे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे उच्च ऊर्जा असलेले एक बहुरूप आहे.

सामान्य ऑक्सिजनामध्ये दोन अणू (O2 ) असतात, तर ओझोनाच्या प्रत्येक रेणूत ऑक्सिजनाचे तीन अणू (O3 ) असतात.

१८७२ सालामध्ये बी. ब्रॉडी यांनी ऑक्सिजनाचे तीन अणू एकत्र येऊन ओझोनाचा रेणू बनलेला असतो हे सिद्ध केले. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण ०.००००६ टक्के इतके अल्प असते.

सूर्याची अतिनील किरणे वातावरणातून येताना भूपृष्ठापासून ६०-८० किमी. उंचीच्या पट्ट्यात त्यांची ऑक्सिजनाशी रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो.

हा वायू स्थितांबरातील १२ ते ४० किमी. उंचीच्या थरात जमा होतो. २० ते २५ किमी. च्या पट्ट्यात त्याचे सर्वाधिक प्रमाण असते.

वातावरणातील ९० % ओझोन स्थितांबरात आढळतो. स्थितांबरातील ओझोनाच्या या आवरणालाच ‘ओझोनांबर’ असे म्हणतात.

ध्रुवीय प्रदेशात ओझोनाच्या थराची जाडी अधिक असते. विषुववृत्तीय भागात तुलनेने कमी असते.

स्थितांबरात असणार्‍या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो.

सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते.

जर ओझोनाचा थर नसता तर अतिनील किरणे जशीच्या तशी भूपृष्ठावर पोहोचली असती आणि मानवासह सर्व सजीवांना अनिष्ट परिणाम भोगावे लागले असते.

या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात.

स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती जणू एक संरक्षक कवच निर्माण झाले आहे.

नैसर्गिक रीत्या वातावरणात ओझोनाचे संतुलन राखले जाते. परंतु अलीकडील काही दशकात मानवी कृतींमुळे हे संतुलन बिघडत चालले आहे आणि ओझोन थरातील त्याचे प्रमाण घटत आहे.

सजीवसृष्टीच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे. ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन).

सीएफसी हा वायूचा शीतक, अग्निरोधक, औद्योगिक द्रावक, वायुकलिल (एरोसोल), फवार्‍यातील घटक व रासायनिक अभिक्रियाकारक म्हणून उपयोग होतो. हा वायू वातावरणाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचतो. तेथे त्याचे विघटन होते आणि त्यातून क्लोरीन वायू निर्माण होतो. हा क्लोरीन ओझोनाचे अपघटन ऑक्सिजनामध्ये करतो.

सीएफसीशिवाय अन्य क्लोरीनयुक्त वायूंमुळेही ओझोन नष्ट होऊ शकतो.

या वायूंचे स्रोत काही प्रमाणात नैसर्गिक (ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन इ.) असले तरी प्रामुख्याने ते मानवनिर्मित आहेत.

वातावरणातील ओझोनाची संहती (रेणूंची संख्या) कमी झाल्यामुळे त्याचा अवक्षय दिसून येतो. ओझोनाच्या थराच्या जाडीत फरक होत नाही.

१९७० च्या दशकाच्या शेवटी वैज्ञानिकांना अंटार्क्टिका खंडावरील वातावरणातील ओझोनच्या अवक्षयाची खरी जाणीव झाली.

१९८५ मध्ये ब्रिटिश वैज्ञानिकांनी ओझोनाचे छिद्र (ओझोनाची संहती लक्षणीय रीत्या कमी झालेले क्षेत्र) १९६० पासून वाढत असल्याचे निदर्शनाला आणून दिले.

अंटार्क्टिकावरील काही जागी ओझोनाची संहती ५० % पर्यंत कमी झालेली आढळली.

जागतिक स्तरावर ओझोनाचा अवक्षय थांबवून जीवसृष्टीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न सुरू झाले आहेत. सीएफसीच्या उत्पादनास प्रतिबंध घालणे, त्यांचे उत्पादन कमी करणे किंवा त्याला पर्यायी रसायने शोधणे इ. उपायोजना केल्या जात आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीने सप्टेंबर १९८७ मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार केला. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून १६ सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो.

१९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून सीएफसीची निर्मिती २० टक्क्यांनी कमी झाली आहे. ओझोन समस्येबाबत भारत हे एक जवाबदार व जागरूक राष्ट्र आहे.

ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने १९९२  मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र या प्रकारचे करार हे जगातील सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने  सामान्य व न्याय्य स्वरूपाचे असावेत, ही भारताची ठाम भूमिका आहे.

भारताने ओझोनाचा नाश करणार्‍या द्रव्यांच्या उत्पादनावर व व्यापारावर बंदी

जाणून घ्या :- विज्ञान : द्रव्याच्या अवस्था व गुणधर्म

💁‍♂ कोणत्याही द्रव्याच्या स्थायुरूप, द्रवरूप, वायुरूप अशा तीन अवस्था असतात. या तीनही अवस्थांमध्ये त्यांचे काय गुणधर्म आढळतात याचा आज आपण अभ्यास करणार आहोत.

1) स्थायू आवस्था :

▪ स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
▪ जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
▪ स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
👉 उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2) द्रव अवस्था :

▪ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
▪ द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
▪ द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
👉 उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3) वायु अवस्था :

▪ वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
▪ वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
👉 उदा. हवा, गॅस इ.

सराव प्रश्नमालिक ( स्पेशल पोलीस भरती )

1) एका वस्तूची खरेदी किंमत ५० रुपये व विक्री किंमत ३० रुपये आहे, तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती ?

1) 0.5
2) 0.4
3) 0.45
4) 0.35

* उत्तर = 0.4

2) ६० किमी अंतर १ तास १५ मिनिटात कापणाऱ्या गाडीचे ताशी वेग किती ?

1) ४० किमी
2) ४५ किमी
3) ४८ किमी
4) ५४ किमी

* उत्तर = ४८ किमी

 3) १५६ ही संख्या २२ वेळा घेऊन गुणाकार केल्यास ; गुणाकारात एकक स्थानचा अंक कोणता असेल ?

1) 0
2) 6
3) 8
4) 4

* उत्तर = 6

4) एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे १५० मिली व १६५ मिली पाणी भरले. १३ लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व एक तांब्या पाणी बाहेर काढल्यास बादलीत किती लिटर पाणी राहील ?

1) 12.121
2) 12.625
3) 12.425
4) 12.85

* उत्तर = 12.625

 5) २ तास, १५ मिनिटे दशांश अपुर्णाकांत कसे लिहाल ?

1) २.२४ तास
2) २.१५ तास
3) २.२५ तास
4) २.६२ तास

* उत्तर = २.२५ तास

 6) एका कुटुंबात ३ पुरुष व २ स्त्रिया आहेत. पुरुषांच्या दिवसाची सरासरी मिळकत ११० रु., तर स्त्रियांची ७० रु. आहे, तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची सरासरी मिळकत किती रुपये ?

1) 93
2) 94
3) 92
4) 91

* उत्तर = 94

7) अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 3 आणि ब व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 3 : 4 आहे.जर क चा पगार 8,400 रु. असेल तर अ चा पगार किती?

1) 3,200 रु.
2) 4,850 रु.
3) 8,400 रु.
4) 6,300 रु.

* उत्तर = 8,400 रु

 8) ७ : x : ६३ या संख्या प्रमाणात आहेत, तर x = ?

1) 14
2) 21
3) 28
4) 42

* उत्तर = 21

 9) २,८००रु. मुद्दलाचे २ वर्षाचे सरळव्याज ८४० रु.झाले तर व्याजाचा द .सा .द .शे .दर काय असावा ?

1) 15
2) 12
3) 16
4) 10

* उत्तर = 15

10) २५३? X २? = ६५९३?; या उदाहरणात ? च्या जागी समान अंक आहे ; तर तो अंक कोणता ?

1) 1
2) 6
3) 8
4) 4

* उत्तर = 6

_________________________________

पोलीस भरती प्रश्नसंच

1.महाराष्ट्राचे बुकर टी-वॉशिग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते.

A. महात्मा फुले
B.कर्मवीर भाऊराव पाटील✅✅
C.महर्षी धांडो केशव कर्वे
D.महर्षी विट्ठल रामजी शिंदे

2.4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता

A : परिपत्रकाला विरोध करणे
B : काढून टाकलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षण
देणे✅✅
C : विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे
D : वरीलपौकी कोणताच उद्देश नव्हता

3.सन 1985 मध्ये असंघटित क्षेत्रातील स्त्री कामगारांवर एक महत्तपूर्ण अभ्यास कोणी प्रसीध्द केला

A : सुलभा ब्रम्हे
B : निर्मला बॅनर्जी✅✅
C : लीला दुबे
D : बीना आगरवाल

4.विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारीत आहे.

A : हंटर कमिशन
B : सॅडलर कमीशन
C : रॅली कमिशन✅✅
D : वूडस कमिशन

5.थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली

A : अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक✅✅
B : जी. के. गोखले आणि एन. सी. केळकर
C : महात्मा फुले
D : आंबेडकर

6.कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भाषावर प्रांतरचना करण्यात आली

A : पहिली दुरुस्ती
B : सातवी दुरुस्ती
C : सहावी दुरुस्ती✅✅
D : चौथी दुरुस्ती

7.स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन "लढाऊ हिंदू धर्म" (Aggressive Hinduism) असे कोणी केले

A : सरोजिनी नायडू
B : भगिनी निवेदिता✅✅
C : अॅनी बझंट
D : वरील सर्व

8.  . . . . यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना "आर्यसमाज" स्थापनेसाठी मदत केली

A : विवेकानंद
B : आगरकर
C : गोखले
D : लोकहितवादी✅✅

9.महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिध्द सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखली जात होते.

A : ज्योतीबा फुले
B : महादेव रानडे
C : गोपाळ हरी देशमूख✅✅
D : गोपाळ गणेश आगरकर

10.विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारीत आहे.

A : हंटर कमिशन
B : सॅडलर कमीशन
C : रॅली कमिशन✅✅
D : वूडस कमिशन

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार:

◆ जागृत ज्वालामुखी – ज्वालामुखीमधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो, तसेच त्यांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. त्यांना जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. जगामध्ये सुमारे ५०० जागृत ज्वालामुखी आहेत.

◆ निद्रिस्त ज्वालामुखी – ज्या ज्वालामुखीतून एके काळी जागृत ज्वालामुखीप्रमाणे सतत उद्रेक होत असत परंतु सध्या उद्रेक होण्याची शक्यता आहे. अशा ज्वालामुखीस निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी असे म्हणतात.

◆ मृत ज्वालामुखी – ज्या ज्वालामुखीमध्ये पूर्वी एके काळी उद्रेक होत असत. आता उद्रेक होत नाहीत. त्यास मृत ज्वालामुखी म्हणतात.