Tuesday 14 December 2021

जाणून घ्या :- विज्ञान : द्रव्याच्या अवस्था व गुणधर्म

💁‍♂ कोणत्याही द्रव्याच्या स्थायुरूप, द्रवरूप, वायुरूप अशा तीन अवस्था असतात. या तीनही अवस्थांमध्ये त्यांचे काय गुणधर्म आढळतात याचा आज आपण अभ्यास करणार आहोत.

1) स्थायू आवस्था :

▪ स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
▪ जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
▪ स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
👉 उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2) द्रव अवस्था :

▪ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
▪ द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
▪ द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
👉 उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3) वायु अवस्था :

▪ वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
▪ वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
👉 उदा. हवा, गॅस इ.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...