Ads

06 April 2022

दादासाहेब फाळके पुरस्कार

➜ सुरुवात -1969

➜ स्वरूप - दहा लाख रुपये सुवर्णकमळ आणि शाल

➜ चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो

➜ पहिले विजेते -देविका राणी

➜ भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार. भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

➜ अलीकडील पुरस्कार विजेते
   1) 2014 - शशि कपूर
   2) 2015 - मनोज कुमार
   3) 2016- के विश्वनाथ
   4) 2017 विनोद खन्ना
   5) 2018 अमिताभ बच्चन

➜ आतापर्यंत सहा महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये 3 महिला महाराष्ट्रीयन आहेत

➜ पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन
1)  दुर्गा खोटे 1983
2) वी शांताराम 1985
3) लता मंगेशकर 1989
4) भालजी पेंढारकर 1991
5) आशा भोसले 2000

➜ अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे 50 वे मानकरी ठरले आहेत

General Knowledge


1. नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?

*उत्तर* : बी एंगेज्ड

2. ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?

*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

3. गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?

*उत्तर* : बंगळुरू

4. यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?

*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

5. ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?

*उत्तर* : कर्नाटक

6. सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : इटली

7. इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?

*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू

8. प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन

9. ‘वर्ल्ड स्टील रिपोर्ट 2020’ या शीर्षकाचा एक अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?

*उत्तर* : जागतिक पोलाद संघ

10. ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

11.‘खुडोल’ उपक्रम कोणत्या राज्यात चालविला जात आहे?

*उत्तर* : मणीपूर

12.‘गव्हर्नमेंट स्टेटस पेपर ऑन डेब्ट’ या शीर्षकाचे दस्तऐवज कोणत्या मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले?

*उत्तर* : अर्थ मंत्रालय

13. दरवर्षी जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो?

*उत्तर* : 23 मे     

14. जागतिक बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थशास्त्री या पदावर कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : कारमेन रेनहार्ट

15.‘संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता विषयक जागतिक दिन’ कोणत्या दिवशी पाळतात?

*उत्तर* : 21 मे

16. कोणत्या राज्याने ग्रामीण महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी ‘दीदी’ वाहन सेवा सुरू केली?

*उत्तर* : मध्यप्रदेश

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती
( अध्यक्ष विशेष )

1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष
    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा
    - अॅनी बेझंट ( 1917 )

3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष
    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष
    - दादाभाई नौरोजी ( 1886)

5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष
    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
    - फैजपूर ( 1936 )

10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती
    - बाल गंगाधर टिळक

💠💠GK Test💠💠

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.
1. 110
2. 115
3. 105
4. 120
🅾उत्तर : 110

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.
1. पेंच
2. मणिकरण
3. कोयना
4. मंडी
🅾उत्तर : मणिकरण

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1. मुल्क राज आनंद
2. शोभा डे
3. अरुंधती राय
4. खुशवंत सिंग
🅾उत्तर : शोभा डे

4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.
1. सिंधुदुर्ग
2. ठाणे
3. रत्नागिरी
4. रायगड
🅾उत्तर : ठाणे

5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
1. मुंबई
2. बंगलोर
3. कानपूर
4. हैदराबाद
🅾उत्तर : बंगलोर

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
1. 20 मीटर
2. 200 मीटर
3. 180 मीटर
4. 360 मीटर
🅾उत्तर : 200 मीटर

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.
1. दोन
2. तीन
3. चार
4. एक
🅾उत्तर : तीन

8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. मंत्रीपरिषद
4. राज्यविधानमंडळ
🅾उत्तर : राज्यपाल

9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.
1. नील-हरित
2. हरित
3. लाल
4. रंगहीन
🅾उत्तर : हरित

10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
1. नायट्रोजन
2. अमोनिया
3. हेलियम
4. कार्बन डाय-ऑक्साइड
🅾उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

11. हिर्याचा अपवर्तनांक किती?
1. 1.5
2. 1.6
3. 2.42
4. 1.33
🅾उत्तर : 2.42

12. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या ------ आहे.
1. 250
2. 266
3. 288
4. 278
🅾उत्तर : 288

13. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.
1. 4
2. 48
3. 720
4. 20
🅾उत्तर : 48

14. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात ------ क्रमांक होता.
1. 4
2. 7
3. 2
4. 5
🅾उत्तर : 4

15. ------ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
1. दिनबंधु
2. दिन मित्र
3. दलित मित्र
4. दलित बंधु
🅾उत्तर : दिनबंधु

16. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
1. मानवतावाद
2. समाजवाद
3. बुद्धीप्रामाण्यवाद
4. सर्वकषवाद
🅾उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद

17. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
1. मराठा
2. केसरी
3. ज्ञानप्रकाश
4. दर्पण
🅾उत्तर : केसरी

18. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
1. आर्य समाज
2. सत्यशोधक समाज
3. प्रार्थना समाज
4. ब्राम्हो समाज
🅾उत्तर : सत्यशोधक समाज

19. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?
1. लोकहितवादी
2. आगरकर
3. विठ्ठल रामजी शिंदे
4. महात्मा फुले
🅾उत्तर : महात्मा फुले

20. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते -----
1. अॅनी बेझंट
2. लोकमान्य टिळक
3. बॅरिस्टर खापरडे
4. डॉ. बी.एस. मुंजे
🅾उत्तर : लोकमान्य टिळक

♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 इलेक्ट्राॅनचा शोध कोणी लावला ?
🎈थाॅमसन.

💐 विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली असते ?
🎈टंगस्टन.

💐 ' रसायनाचा राजा ' कशाला म्हणतात ?
🎈सल्फ्युरिक आम्ल.

💐 जर तांब्याचा वर्ख क्लोरीनमध्ये टाकला,तर काय होईल ?
🎈तो वेगाने पेट घेईल.

💐 धोत-याचे परागकण कसे असतात ?
🎈गोलाकार.

♻️ हे लक्षात ठेवा

1) भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत ?
- केंद्र सूची

2) शिक्षण, कुटुंबकल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील ------------- मध्ये दिलेले आहेत.
- समवर्ती सूची

3) पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील ------------------ मध्ये नमूद केलेले आहेत.
- राज्य सूची

4) राष्ट्रपती जेव्हा -------------  या कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील एकोणिसावे कलम व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्ये आपोआपच रद्दबातल ठरतात.
- 352

5) भारताच्या घटना समितीचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ?
- डॉ. बी. एन. राव

♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने 'पेमेंट बॅंक सेवा' सुरू केली आहे ?
🎈एअरटेल.

💐 देशात वीजनिर्मितीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो ?
🎈हिमाचल प्रदेश.

💐 निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?
🎈गिधाड.

💐 देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकादमीचे अध्यक्ष कोण ?
🎈न्या.अरूण चौधरी.

💐 सार्क ( SAARC ) म्हणजे काय ?
🎈द साउथ एशियन असोसियशन फाॅर रिजनल को-ऑपरेशन.



♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली ?
🎈कुतुबुद्दीन ऐबक. ( १२०६ मध्ये )

💐 हडप्पाकालीन धौलावीरा स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
🎈गुजरात.

💐 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 'कैसर-ए-हिंद' पदवी कोणी परत केली ?
🎈महात्मा गांधी.

💐 इंग्रज व सिराज उद्दोला यांच्यात निर्णायक प्लासी युद्ध कधी झाले ?
🎈२३ जून १७५७.

💐 इंग्लंडची महाराणी हिक्टोरिया यांना 'भारत की सम्राज्ञी' ही पदवी कधी देण्यात आली ?
🎈१ जानेवारी १८७६.

व्यक्ती विशेष : प्रा. अनीसउज्जमान


👉आपल्याकडे ‘पद्म’ पुरस्कारांचे जे महत्त्व, तेच पद्मा नदीपारच्या बांगलादेशात ‘एकुशे पदक’ या पुरस्काराचे. हे दोन्ही पुरस्कार- त्यातही ‘पद्मभूषण’ आणि ‘एकुशे पदक’ मिळवणाऱ्या व्यक्ती फार कमी, त्यांपैकी एक म्हणजे प्राध्यापक अनीसउज्जमान. बंगाली भाषा, साहित्य आणि शिक्षण यांच्या निरंतर सेवेसाठी त्यांना २०१४ मध्ये ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आले होते.

👉बांगलादेशनिर्मितीच्या चळवळीत ते सहभागी होतेच. पण त्यापुढेही, बांगलादेश हा अतिरेकी धर्मवाद्यांचा देश ठरू नये, इथे कला-संस्कृती बहरण्यासाठी आवश्यक असलेला मोकळेपणा रुजावा, यासाठी ते आजन्म प्रयत्नरत होते. त्यांचे निधन १४ मे रोजी ढाका येथे झाले.

👉कोलकात्यात १९३७ मध्ये जन्म, १९४७ मध्ये ढाक्याकडे स्थलांतर, तेथेच माध्यमिक व उच्चशिक्षण अशी पार्श्वभूमी असलेल्या अनीसउज्जमान यांचा वयाच्या १४ व्या वर्षांपासून विद्यार्थी चळवळीशी संबंध आला. ‘पाकिस्तानीकरण नको’ हा मुद्दा तत्कालीन विद्यार्थ्यांनाही आपला वाटत होता. बंगालीसाठी १९५२ मध्ये पहिली भाषा-चळवळ झाली, त्यात तरुण अनीसउज्जमान यांचा सहभाग होता. पुढे १९६९च्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या चित्तगांवमध्ये सहप्राध्यापक असताना त्यांनी नेतृत्वही केले. निर्णायक उठाव १९७१ मध्ये झाला, तोवर नव्या बांगलादेशाची उभारणी करणाऱ्यांत त्यांची गणना होत होती.

👉 मात्र राजकारणात न पडता ते लेखन आणि अध्यापनातच रमले. १४ पुस्तके आणि समीक्षा व समाजचिंतनपर अनेक निबंध त्यांच्या नावावर आहेत. ढाका व चित्तगांव येथे प्राध्यापकी करताना १९७८ ते १९८३ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या संशोधन प्रकल्पांसाठी काम केले. हे प्रकल्प भाषा व समाज यांच्या संबंधांविषयी होते. ‘सॉरबाँ’ म्हणून ओळखले जाणारे पॅरिस विद्यापीठ (१९९४) व अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ (१९९५) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर २०१० मध्ये ते कोलकाता विद्यापीठातही पाहुणे प्राध्यापक होते.

👉 पण त्यांच्या विद्यापीठीय विश्वनागरिकत्वावर कळस चढला तो, २००९ ते २०११ मध्ये शांतिनिकेतनच्या ‘विश्व भारती’ विद्यापीठातील त्यांच्या वावराने! प्राचीन बंगाली गद्यापासून ते स्त्रीचे साहित्य व समाजातील स्थान, सांस्कृतिक वैविध्य व बहुविधता, अशा विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली. बांगलादेश आणि जग यांमधला एक सांस्कृतिक पूल त्यांच्या निधनामुळे निखळला आहे.                                

ENGLISH QUESTION AND ANSWER

                                                                                                                1.He founded a refuge for mountain gorilla
  A) Rubbish
B) Migrant
C) Waste
D) Sanctuary

Correct Answer D
Sanctuary
2. Identify the correct meaning of the underlined words in the contexts.
He skimmed through the newspaper.
  A) Glanced
B) Removed
C) Tossed
D) Moved
Correct Answer A
Glanced

3. What is meaning of the word 'Elegy'.
  A) A handwritten document
B) A song telling a popular story
C) A poem addressed to a person
D) A funeral song
Correct Answer D
A funeral song

4.Today is a special day on the ________.
  A) Calendar
B) Calender
C) Calander
D)Calendor
Correct Answer A
Calendar
 
5.The barber has cut my hair very short.
(Correct progressive future tense form)
  A) The barberis cutting my hair very short.
B) The barber will have cut my hair very short
C) The barber will be cutting my hair very short
D) The barber had cut my hair very short.
Correct Answer C
The barber will be cutting my hair very short

6.Write the correct form of verb in the given sentence:
"Each of these rooms_____good enough for me."
  A) is
B) are
C) have
D) were
Correct Answer A
is

7. ____means strength,energy, power, force and spirit.
  A) Victory
B) Calamity
C) Vigour
D) Apology
Correct Answer C
Vigour

8. A stoic is a person who__________ ?
  A) Silently suffers and endures as without any complaints
B) Buys and sells the stock and share
C) is in a charge of the goods of a private company
D) does not endure anything plainful and sorrow
Correct Answer A
Silently suffers and endures as without any complaints
 
9. Sunita is on cloud nine after winning the final T20 match.
(underline phrase means)
  A) to be very happy
B)to be bery angry
C) to be fond of somebody
D) All of the above
Correct Answer A
to be very happy

10. "To bite the bullet" means
  A) To try very soft
B) To state your opinion
C) To accept something unpleasant without complaining
D) Biting the air
Correct Answer C
To accept something unpleasant without complaining                      

05 April 2022

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना

प्रस्तावना

योजनेची वैशिष्ट्ये

योजनेतील घटक

आहाराचे स्वरूप

अंमलबजावणी यंत्रणा

प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

योजनेतील घटक

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

आहाराचे स्वरूप

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

अंमलबजावणी यंत्रणा

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य (अनुसूचित जमाती) यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेचे वेळोवळी त्रयस्थ संस्थेमार्फत

भारतीय क्रांतिकारी संघटना

🛡 *व्यायाम मंडळ*🛡
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🛡 *अनुशीलन समिती*🛡
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🛡 *अभिनव भारत*🛡( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🛡 *इंडिया हाऊस*🛡
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🛡 *स्वदेश बांधव समिती*🛡
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🛡 *अभिनव भारत*🛡( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🛡 *अनुशीलन समिती*🛡
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🛡 *भारत माता सोसायटी*🛡
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🛡 *गदर पार्टी*🛡
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🛡 *हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन*🛡
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🛡 *नौजवान सभा*🛡
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🛡 *हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन*🛡
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🛡 *इंडियन इंडिपेंडन्स लिग*🛡( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🛡 *आझाद हिंद सेना*🛡
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

गांधी युगातील महत्वाच्या घटना

♻गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

♻चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

✍साराबंधी चळवळ (सन 1918) -

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.

गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.

शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

✍रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.

या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.

या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.

या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.