06 May 2022

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास

Mpsc History

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली.

ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत.

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले.

ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली.

तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.

मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे :

भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
१८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.

भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता.

त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मिरात-उल्-अखबार

> राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.

> लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.

> संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

समाचार दर्पण:  २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

सोमप्रकाश: पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले.

द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

तत्त्वबोधिनी पत्रिका: देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

सुलभ समाचार : केशवचंद्र सेन (१८७८).

अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

Mpsc History

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1. यूरोपियन – कोलंबस

राष्ट्र – स्पेन
वर्ष – 1493
वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.

2. यूरोपियन – वास्को-डी-गामा

राष्ट्र – पोर्तुगल
वर्ष – 1498
वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)
3. यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स

राष्ट्र – ब्रिटिश
वर्ष – 1607
कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी
वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

🛑 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

🔶 ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

🔶 ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

🔶मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

🔶 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

🔶धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

🔶 भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

🔶जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

🔶पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

🔶आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

🔶 ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

🔶अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

🔶प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

🔶जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

🔶सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

🔶 रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

🔶शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

🔶 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

🔶 भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ.

________________________________

ONE WORD SUBSTITUTION

ONE WORD SUBSTITUTION
 
1.Rites- An established ceremony prescribed by a religion  -  संस्कार, प्रेतकर्म, प्रेतकार्य

2. Inevitable- That which cannot be averted - अपरिहार्य , जे टाळता येणार नाही असे

3.Orchestra- A large body of people playing various musical instrument -  ऑर्केस्ट्रा, वाद्यवृंद,
वृंदवदकाची नाटयगृहातील जागा

4.Compositors- One who sets type for books, newspaper - 
टाइप जुळवणारा, टंक-जुळारी

5. Peninsula- A piece of land almost surrounded by water or projecting out into a body of water - द्वीपकल्प

6. Barracks-  A  place where soldiers live  -  सैनिकांची राहण्याची जागा

7. Numismatist-  A man who collects old and new coins  मुद्राशास्त्रज्ञ, नाणी व पदके यांचा अभ्यासक

8.Clientele- Regular users of places restaurant - ग्राहक, ग्राहकवर्ग, आश्रयदातावर्ग

9. Observatory- A place where astronomical observations are made - वेधशाळा

10.Sororicide-  The killing of one's sister - भगिनीहत्या, आपल्या बहीणीची हत्या करणारा व्यक्ती

11. Pilferage - Act of stealing something in small quantities -
चोरी, भुरटी चोरी

12. Occidental- Pertaining to the west - पश्चिमात्य किंवा पश्चिमेकडील व्यक्ती

13.Inscribe -  Write arcane words on stone or paper - शिलालेख, मनावर कायमचा छाप वठवणे, यादीत नाव सामाविष्ट करणे, नाव, अक्षरे, इ.कोरणे, खोदणे

14.Insolvent-  Unable to pay one’s debt - दिवाळखोर, नादार
कफल्लक, दिवाळखोर मनुष्य

15.Harass-  Trouble and annoy continually - त्रास देणे, छळणे, हात धुवून मागे लागणे, वारंवार हल्ले करून जेरीस आणणे

16.Novice-  A person who is new to a profession - नवशिक्या, अननुभवी

17. Erudition - That which makes one highly knowledgeable - पांडित्य, पांडित्व, विद्वता

18. Alienation- A state of emotional or intellectual separation  -परकेपणा, दुरावलेपण

19.Obituary-  A notice of a person’s death  - मृत्यूपत्र, त्याविषयी असलेला मृत्युलेख

20. Gregarious- A person or animal that lives in groups -
एकत्रित कळप करून राहणारा,
समजशील, संगतीप्रिय

21.Sedulous- Hard working and diligent - उद्योगी, मेहनती,चिकाटीचा

22.Journey - An act of travelling from one place to another - प्रवास, सफर

23.  Obsolete- The thing no longer in use - अप्रचलित, प्रचारातुन गेलेला

24.Embezzlement - Misappropriation - घोटाळा, अपहार

25.  Colleague- A person who is working in the same institution
- सहकारी

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी

🔷 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 :-

◆ 2021 चा हा पुरस्कार 13 ऑगस्ट 2021 रोजी सायरस पुनावाला यांना प्रदान.

◆  पुनावाला सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.


__________________________



◆ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी :-

◆ या पुरस्कारांची सुरुवात 1983 साली झाली व तेव्हापासून हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.

◆ 2021 चा पुरस्कार :- सायरस पुनावाला
◆ 2020 चा पुरस्कार :- सोनम वांगचुक

भारतरत्न पुरस्कार,पुरस्काराचे स्वरूप,भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी

भारतरत्न पुरस्कार

पुरस्काराचे स्वरूप

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते.

अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञानतंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली.

आत्तापर्यंत ४५  जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. नुकतेच,भारतरत्न पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकांनाही आता या पुरस्काराने सन्मानीत करता येऊ शकते.यातील निवडक श्रेणीला भारतरत्न देण्याची अट काढुन टाकण्यात आली आहे. तशी अधिसूचना व राजपत्र जारी करण्यात आले आहे.

फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.

______________________________

पुरस्काराचे स्वरूप

सध्याचे ‘भारतरत्नपुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळाच्या पानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमातिच्याखालीभारतरत्नअसे शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे.  हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना -
* Indian order of precedence मध्ये ७वे स्थान मिळते.
* भारतात मोफत 1st class विमान व रेल्वेचा प्रवास
* टँक्समधुन सुट, पेन्शन ५०% किंवा पंतप्रधानाच्या पगाराएवढी
* राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनास हजर राहू शकतात
* z प्रकारची सेक्युरीटी
* गणतंत्र व प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख आतिथी
* त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी

___________________________

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी
क्रमांक

नाव

जन्म-मृत्यु

पुरस्कृत वर्ष

क्षेत्र

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

(१८८८-१९७५)

१९५४

भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ

चक्रवर्ती राजगोपालचारी

(१८७८-१९७२)

१९५४

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल

डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

(१८८८-१९७०)

१९५४

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

डॉ. भगवान दास

(१८६९-१९५८)

१९५५

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

(१८६१-१९६२)

१९५५

पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना

जवाहरलाल नेहरू

(१८८९ -१९६४)

१९५५

भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते

गोविंद वल्लभ पंत

(१८८७-१९६१)

१९५७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री

भारताचे दुसरे गृहमंत्री

डॉ. धोंडो केशव कर्वे

(१८५८-१९६२)

१९५८

समाजसुधारक, शिक्षणप्रसारक

डॉ. बिधान चंद्र रॉय

(१८८२-१९६२)

१९६१

पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक

१०

पुरूषोत्तम दास टंडन

(१८८२-१९६२)

१९६१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

११

डॉ. राजेंद्र प्रसाद

(१८८४-१९६३)

१९६२

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती

१२

डॉ. झाकिर हुसेन

(१८९७-१९६९)

१९६३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती

१३

डॉ. पांडुरंग वामन काणे

(१८८०-१९७२)

१९६३

शिक्षणप्रसारक

१४

लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)

(१९०४-१९६६)

१९६६

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान

१५

इंदिरा गांधी

(१९१७-१९८४)

१९७१

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

१६.

वराहगिरी वेंकट गिरी

(१८९४-१९८०)

१९७५

कामगार युनियनभारताचे चौथे राष्ट्रपती

१७.

के. कामराज (मरणोत्तर)

(१९०३-१९७५)

१९७६

भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री

१८

मदर तेरेसा

(१९१०-१९९७)

१९८०

ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

१९.

आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)

(१८९५-१९८२)

१९८३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक

२०.

खान अब्दुल गफार खान

(१८९०-१९८८)

१९८७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

२१.

एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)

(१९१७-१९८७)

१९८८

चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

२२.

भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)

(१८९१-१९५६)

१९९०

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

२३.

नेल्सन मंडेला

(जन्म १९१८-२०१३)

१९९०

वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

२४.

राजीव गांधी (मरणोत्तर)

(१९४४-१९९१)

१९९१

भारताचे सातवे पंतप्रधान

२५.

सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)

(१८७५-१९५०)

१९९१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

२६.

मोरारजी देसाई

(१८९६-१९९५)

१९९१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान

२७.

मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)

(१८८८-१९५८)

१९९२

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

२८.

जे. आर. डी. टाटा

(१९०४-१९९३)

१९९२

उद्योजक

२९.

सत्यजित रे

(१९२२-१९९२)

१९९२

बंगाली चित्रपट निर्माते

३०.

ए. पी. जे. अब्दुल कलाम

(जन्म १९३१)

१९९७

भारताचे ११वे राष्ट्रपती

३१.

गुलझारीलाल नंदा

(१८९८-१९९८)

१९९७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान

३२.

अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)

(१९०६-१९९५)

१९९७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

३३.

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

(१९१६-२००४)

१९९८

कर्नाटक शैलीतील गायिका

३४.

चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्

(१९१०-२०००)

१९९८

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री

३५.

जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)

(१९०२-१९७९)

१९९९

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

३६.

रवी शंकर

(१९२०-२०१२)

१९९९

प्रसिद्ध सितारवादक

३७.

अमर्त्य सेन

(जन्म १९३३)

१९९९

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

३८.

गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)

(१८९०-१९५०)

१९९९

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री

३९.

लता मंगेशकर

(जन्म १९२९)

२००१

पार्श्वगायिका

४०.

बिसमिल्ला खान

(१९१६-२००६)

२००१

शहनाईवादक

४१.

भीमसेन जोशी

(१९२२-२०११)

२००८

हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

४२.

सी.एन.आर.राव

(जन्म-१९३४)

२०१४

शास्त्रज्ञ

४३.

सचिन तेंडूलकर

जन्म-इ.स.१९७३

२०१३

क्रिकेटपटू

४४.

मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)

(१८६१-१९४६)

२०१४

स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

४५.

अटलबिहारी वाजपेयी

(जन्म १९२४)

भारतीय ज्ञानपीठ कार्य व विविध योजना

भारतीय ज्ञानपीठ

कार्य व विविध योजना

ज्ञानपीठ पुरस्कार

प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी १८ फेब्रुवारी १९४४ रोजी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी प्रख्यात संस्था.

शांतिप्रसादांच्या सुविद्य पत्‍नी स्व. श्रीमती रमा जैन ह्या संस्थेच्या स्थापनेपासून १९७५ पर्यंत अध्यक्षा होत्या.

वाराणसी येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानिमित्त अनेक विद्वान एकत्र जमले होते.

त्यांनी शांतिप्रसादांना देशात भारविद्येच्या विविध शांखांतील सखोल संशोधनासाठी तसेच प्राचीन ग्रंथ संपादून प्रकाशित करण्यासाठी विविध योजना आखून कार्य करीत राहणारी एखादी संस्था असण्याची नितान्त गरज असल्याचे सांगितले. ही गरज लक्षात घेऊन शांतिप्रसादांनी 'भारतीय ज्ञानपीठ' ही विश्वस्त संस्था स्थापन केली. स्थापनेच्या वेळी शांतिप्रसादांनी म्हटले, की 'दुर्मिळ प्राचीन भारतीय ग्रंथांचे संशोधन, संपादन व प्रकाशन करणे तसेच सद्यकालीन भारतीय भाषांतील मौलिक सार्वजनिक वाङ्‍मयास लोकोदयासाठी उत्तेजन देणे ह्या हेतूने भारतीय ज्ञानपीठाची स्थापना केली आहे.

कार्य व विविध योजना. --------

ज्ञानपीठाच्या कार्यविकासाचे चार प्रमुख टप्पे दिसून येतात :

(१) पहिल्या टप्प्यात 'मूर्तिदेवी ग्रंथमाले'ची योजना आखून भारतविद्येतील प्राचीन ग्रंथांचे-विशेषतः जैन आचार्यांच्या-संशोधन, संपादन व प्रकाशन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हे ग्रंथ संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, प्राचीन कन्नड व तमिळ भाषेतील होते. मूलतः नाथुराम प्रेमींनी मुंबई येथे सुरू केलेल्या 'माणिकचंद्र ग्रंथमाले'चेही पुनरूज्‍जीवन करून ती तडीस नेणे याचाही अंतर्भाव या टप्प्यात होता.

(२) दुसऱ्या टप्प्यात 'लोकोदयग्रंथमाले' चा विकास करण्यात आला. मान्यवर आधुनिक भारतीय लेखकांच्या सर्जनशील ग्रंथांचे प्रकाशन करणे तसेच नवोदित होतकरू लेखकांना उत्तेजन देऊन त्यांच्याही ग्रंथांचे प्रकाशन या टप्प्यात करण्यात आले.

(३) तिसऱ्या टप्प्यात विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या पंधरा भारतीय भाषांतील एका उत्कृष्ट सर्जनशील ग्रंथाची दरवर्षी निवड करण्यात येऊन त्याला एक लाख रूपयांचा (१९८२ पासून दीड लाख) पुरस्कार देण्याची योजना कार्यवाहीत आली.

(४) चौथ्या टप्प्यात पुराभिलेख व पुरातत्त्वीय सर्वेक्षण व संवर्धनाची योजना हाती घेण्यात आली; तसेच जैनांनी निर्माण केलेल्या कलावस्तूंचा व ग्रंथांचा सखोल अभ्यास व संशोधन करण्याच्या योजना आखण्यात आल्या. चौथ्या टप्प्यातच (अ) संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषांत उपलब्ध असलेल्या भगवान महावीरांच्या सर्व काव्यत्मक चरित्रांचे संपादन व प्रकाशन करणे, (आ) 'जैन आर्ट अँड आर्किटेक्चर' या विषयावरील अधिकृत ग्रंथ तयार करून त्याचे प्रकाशन करणे आणि (इ) जैन पुरातत्त्वीय कलावस्तूंच्या छायाचित्रांचे संकलन व संग्रह करणे या योजनांचाही अंतर्भाव होता.

या विविध योजनांखाली भारतीय ज्ञानपीठाने आजवर सु. सहाशे ग्रंथ प्रसिद्ध केले असून ते संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, हिंदी, तमिळ, कन्नड, उर्दू, इग्रंजी इ. भाषांत आहेत.

भारतीय पुरातत्त्वीय संशोधन योजनेद्वारा जैन कलेचे सर्वेक्षण, संशोधन व संकलन सुरू आहे. आजवर एतद्‍विषयक सु. दहा हजार छायाचित्रे जमविण्यात आलेली असून ती शास्त्रशुद्ध रीतीने संगृहीत केली आहेत.

भगवान महावीरांच्या २५०० व्या निर्वाणमहोत्सवानिमित्त संस्कृत, अपभ्रंश व कन्नड भाषेतील उपलब्ध महावीर चरित्रकाव्यांच्या संपादनाची व प्रकाशनाची जबाबदारीही ज्ञानपीठाने अंगावर घेतली आहे. महावीरांचे तत्त्वज्ञान तसेच आपली सांस्कृतिक परंपरा यांवर पंचवीस ग्रंथ प्रकाशित करण्याची योजनाही आहे. जैन आर्टं अँड आर्किटेक्चर (३ खंड, १९७४-७५) हा अनेक उत्कृष्ट चित्रे-छायाचित्रे असलेला संदर्भग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

देशाच्या सर्व स्तरांतील व विविध प्रदेशांतील थोर विद्वानांचा व सर्जनशील साहित्यिकांचा हातभार या महान सांस्कृतिक-साहित्यिक कार्यास लाभत आहे. संस्थेचे सध्याचे प्रमुख कार्यालय नवी दिल्ली येथे असून वाराणसी येथे शाखा कार्यालय आहे.

भारतीय ज्ञानपीठाचे संस्थापक, अध्यक्ष व इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेतः स्व. साहू शांतिप्रसाद जैन (संस्थापक); स्व. श्रीमती रमा जैन (अध्यक्षा-१९४४-७५); श्रीयांसप्रसाद जैन (विद्यमान अध्यक्ष); ए. के. जैन (व्यवस्थापक व विश्वस्त) व लक्ष्मीचंद्र जैन (संचालक).


ज्ञानपीठ पुरस्कार -------

भारतीय ज्ञानपीठ १९६६ पासून दरवर्षी आधुनिक भारतीय भाषांतील एका सर्वोत्कृष्ट, मौलिक व सर्जनशील ग्रंथास म्हणजे त्याच्या कर्त्यास एक लाख रूपयांचा पुरस्कार देते. १९८२ पासून पुरस्काराची रक्कम वाढवून दीड लाख रूपये करण्यात आली आहे. हा पुरस्कार भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार देण्यामागील ज्ञानपीठची कल्पना अशी, की आधुनिक भारतीय भाषा अनेक असल्या, तरी त्यातील सांस्कृतिक आशय हा सारखाच आहे आणि त्यांचा आत्माही एकच-भारतीय-आहे.

१९६६ मध्ये पहिला पुरस्कार (१९६५ चा) दिला गेला. आजवर विविध भारतीय भाषांतील २० प्रतिभासंपन्न लेखकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. १९८१ चा १७ वा पुरस्कार प्रख्यात पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम यांना, तर १९८२ चा १९८२ चा १८ वा पुरस्कार हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांना देण्यात आला. आजवर १८ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या साहित्यिकांची यादी मागील पानावर दिली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेली साहित्यकृती ही अनेक परीक्षकांच्या नजरेखालून जाते व तिच्या योग्यायोग्यतेबाबत चिकित्सा होऊनच तिची पुरस्कारासाठी निवड केली जाते.

प्रत्येक भाषेतील काही तज्ञ लेखक समीक्षकांची सल्लागार व परीक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. पुरस्कार प्राप्त सिहित्यिकाचा ज्ञानपीठातर्फे मोठ्या समारंभपूर्वक आदसरत्कार करून एखाद्या ख्यातकीर्त नेत्याच्या वा नामांकित विद्वान व्यक्तीच्या हस्ते त्यास पुरस्काराची रक्कम व पुरस्काराचे प्रतीक असलेली, चौदा पाकळ्यांच्या कमळावर (चौदा भाषांचे प्रतीक) उभ्या असलेल्या वाग्‍देवीची ब्राँझ मूर्ती दिली जाते. वाग्‍देवीची मूळ मूर्ती धार (म. प्रदेश) येथील सरस्वती मंदिरातील असून ती राजा भोज याने १०३५ मध्ये प्रतिष्ठापित केली. सध्या ती लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात आहे. पुरस्कारप्राप्त कृतीची व तिच्या लेखकाची वैशिष्टये सांगणाऱ्या प्रशस्तिपत्रासह (सायटेशनसह) त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या समारंभानिमित्त कवितावाचन, कविसंमेलन, नृत्य, संगीत यांसारखा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जातो.

भारतीय ज्ञानपीठाचे ज्ञानोदय हे प्रसिद्ध हिंदी मासिकपत्र असून त्यातून नवोदित होतकरू भारतीय लेखकांचे लेखन प्रसिद्ध केले जाते.

ज्ञानपीठ पत्रिका हे संस्थेचे दुसरे मासिक असून त्यातून विविध भारतीय भाषांतील विद्वान लेखकांचे दर्जेदार लेखन प्रसिद्ध होते.