04 April 2025

ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा



🔹आर्यभट्ट (1975)  :- पहिला भारतीय उपग्रह.

🔸INSAT (1983)  : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.

🔹चांद्रयान-1 (2008)  :- चंद्रावर पाण्याचा शोध.

🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.

🔹PSLV (2017)  : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.

🔸चांद्रयान-2 (2019)  :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.

🔹चांद्रयान-3 (2023)  :- चंद्रावर यशस्वी उतरण.

🔸आदित्य-L1 (2023)  : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.

🔹NISAR (2024)  :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).

🔸गगनयान (2024)  :- पहिली मानव अवकाश मोहीम.

🔹SPADEX (2024)  : जुळी उपग्रह मोहीम.

🔸मंगलयान-2 (2024)  : दुसरी मंगळ मोहीम.

🔹शुक्रयान-1 (2031)  : पहिली शुक्र ग्रह मोहीम.

🔸चांद्रयान-4 (2027)  : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.

दोन मार्क साठी फिक्स हे लक्षातच ठेवा :


✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा )

✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई )


✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा )

✅ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ( सातारा )


✅ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार ( सातारा )

✅ पहिले मधाचे गाव - मांघर ( सातारा )


✅ पहिले झाडांचे पुनर्वसन गाव - म्हसवे ( सातारा )

✅ पहिले डिजिटल गाव - हरिसाल ( अमरावती )


✅ पहिले कॅशलेस गाव - घसई ( ठाणे )

✅ पहिले वायफाय गाव - पाचगाव ( नागपूर ) 


✅ पहिले आधार गाव - टेंभली ( नंदुरबार )

✅ पहिले कवितांचे गाव - उभादांडा ( सिंधुदुर्ग )

✅ भारताचे पहिले गाव - माना ( उत्तराखंड )

काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा


◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे

◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य

◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले

◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य

◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य

◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य 

◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य 

◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य 

◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य

◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य

◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य 

◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य

◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य 

◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य 

◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य

◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य 

◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 

◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 

◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 

◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य

◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 

◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य

◾️दिल्ली : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 

◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे

◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 

◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य

◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य

◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 

◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे

◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे

◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य

◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य


शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)


◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे 

◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.


◾️6 पदरी चा महामार्ग

📌 सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा


एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. 


◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते


◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी


📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने 

🦙सवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही दवस्थाने जोडली जाणार आहेत

समृद्धी महामार्ग....

📌 मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो 


जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो

अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

◾️6 पदरी महामार्ग


सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा

शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा


🛑 असा आहे समृद्धी महामार्ग

- नागपूर ते मुंबई  

- लांबी : 701 किलोमीटर

- 120 मीटर रुंदीचा महामार्ग

- मार्गिका : 4 + 4

- वाहन वेगमर्यादा : सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी 100 किमी असेल.

- हा महामार्ग 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल 

- समृद्धी महामार्गाचे नवीन नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग  

- समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे  

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :


संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

जीवनसत्त्वे आणि त्यांची रासायनिक नावे

 👉जीवनसत्व- ए A

🔺रासायनिक नाव= रेटिनॉल

🔺 कमतरता रोग= रात्री अंधत्व

🔺 स्त्रोत= 🥕 गाजर, 🥛 दूध, 🥚 अंडे, 🍓 फळ🍉


👉 जीवनसत्व – बी 1

🔺रासायनिक नाव= थायमिन

🔺 कमतरता रोग= बेरी-बेरी

🔺 स्रोत= 🥜 शेंगदाणे, बटाटे, 🥦 भाज्या🍆


👉 जीवनसत्व - B2

🔺 रासायनिक नाव= Riboflavin

🔺 कमतरतेचे रोग= त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांचे रोग

🔺स्रोत= अंडी, दूध, हिरव्या भाज्या


👉 जीवनसत्व – B3

🔺रासायनिक नाव= पॅन्टोथेनिक ऍसिड

🔺 कमतरता रोग= जळणारे पाय, राखाडी केस

🔺 स्रोत= 🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅 टोमॅटो, शेंगदाणे🥜


👉 जीवनसत्व- B5

🔺 रासायनिक नाव = निकोटीनामाइड (नियासिन)

🔺 कमतरता रोग= मासिक पाळीचे विकार (पेलाग्रा)

🔺 स्रोत = 🍗Meat🍖, 🥜शेंगदाणे, बटाटे


👉 जीवनसत्व- B6

🔺रासायनिक नाव = पायरिडॉक्सिन

🔺 कमतरता रोग = अशक्तपणा, त्वचा रोग

🔺 स्रोत = 🥛 दूध, 🍗 मांस, 🥦 भाजीपाला 🍆


👉 जीवनसत्व – H/B7

🔺रासायनिक नाव= बायोटिन

🔺 कमतरता रोग= केस गळणे, त्वचा रोग

🔺 स्रोत= यीस्ट, गहू, अंडी


👉 व्हिटॅमिन - B12

🔺 रासायनिक नाव= सायनोकोबालामिन

🔺 कमतरतेचे रोग= अशक्तपणा, पांडू रोग

🔺 स्रोत= 🍗मांस, 🍖काजेली, 🥛दूध


👉 व्हिटॅमिन सी C

🔺रासायनिक नाव= एस्कॉर्बिक ऍसिड

🔺 कमतरता रोग= स्कर्वी, हिरड्यांना आलेली सूज

🔺स्रोत= आवळा, 🍋 लिंबू, 🍑 संत्रा, 🍊 संत्रा


👉 जीवनसत्व - डी D

🔺रासायनिक नाव=कॅल्सीफेरॉल

🔺 कमतरता रोग=मुडदूस

🔺स्रोत=सूर्यप्रकाश, दूध, अंडी


👉 जीवनसत्व - ई E

🔺 रासायनिक नाव= टेकोफेरॉल

🔺 कमतरता रोग= प्रजनन क्षमता कमी होणे

🔺 स्रोत= 🥦हिरव्या भाज्या, 🍚लोणी, दूध🥛


👉 जीवनसत्व- के K

🔺रासायनिक नाव= Phylloquinone

🔺कमतरता रोग= रक्त गोठण्यास अपयश

🔺 स्रोत = 🍅 टोमॅटो, 🥦 हिरव्या भाज्या, 🥛 दूध

29 March 2025

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या?

अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला.

ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न  भीमजी पारेख ता गुजराती व्यक्तीने केला.

क  हुगळी येथे बंगाली  भाषेचे व्याकरण 1778 ला छापले गेले.

वरीलपैकी कोणते विधान/ने  योग्य आहे/आहेत?

1  फक्त  अ

2  फक्त  ब  व क

3  फक्त  ब

4  वरील सर्व✅🙏


 1780 साली जेम्स हिकी याने दि बेंगोल गॅझेट नावाचे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले ते इंग्रजी भाषेतील......... होते?

1  दैनिक

2  साप्ताहिक✅🙏

3  मासिक

4  त्रैमासिक


 दि कलकत्ता गॅझेट कोणत्या साली सुरू करण्यात आले?

1    1782

2    1784✅🙏

3    1781

4    1783


 वृत्तपत्र व साल याबाबतची  अयोग्य जोडी ओळखा?

अ   दि बॉम्बे कुरियर   1790

ब   दि बॉम्बे  गॅझेट    1792✅

क  द कलकत्ता क्रॉनिकल  1786

ड  द मद्रास कुरियर   1788


अ.  1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली

ब.  1824 ला भारतीय सुती  कापडाच्या आयातीवर 67.5 टक्के इतका कर आकारला जात होता

क  भारतीय मलमलीच्या कापडावर 35% इतका कर आकारला जात होता 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा?

1 फक्त अ

2 फक्त ब

3. ब आणि क

4   फक्त क✅🙏


 कमिटी ऑफ सर्किट खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे,,?

A   विल्यम बेंटिक

B   लोर्ड कॉर्नवॉलीस

C   वॉरन हेस्टींग✅🙏

D   लॉर्ड क्लाइव्ह


 सर सय्यद अहमद खान यांना सर ही पदवी कोणी बहाल केली?

1 मुस्लिम जनता

2 मुस्लिम खलिफा

3 ब्रिटिश प्रशासन✅🙏

4. यापैकी नाही


हेन्री डेरोझिओ यांच्या विषयी खालील विधाने विचारात घ्या?

अ. ते पुरोगामी विचाराचे होते.

ब. ते महिलाच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते.

वरीलपैकी योग्य असलेली विधाने कोणती ?

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ आणि ब✅🙏

4. वरीलपैकी एकही नाही


 हेन्री डेरोझिओ यांनी सुरु केलेली तरुण बंगाल चळवळ विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले.

ब. ही चळवळ राजा राममोहन राय यांच्या पेक्षाही आधुनिक आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब✅🙏

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत


 तत्त्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

1. राजाराम मोहन राय

2. द्वारकानाथ टागोर

3. देवेंद्रनाथ टागोर✅🙏

4. रवींद्रनाथ टागोर


तत्त्व बोधिनी पत्रिका” हे खालीलपैकी काय होते ?

1. बंगाली मासिक✅🙏

2. बंगाली साप्ताहिक

3. संस्कृत मासिक

4. संस्कृत साप्ताहिक


 खालीलपैकी कोणते पुस्तक देवेंद्रनाथ टागोर यांनी लिहिले ?

अ. ब्रम्ह धर्म

ब. ब्राम्हो धर्म  विजम

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ, ब✅🙏

4.  दोन्ही नाहीत


 नियामक कायदा १७७३ विषयी खालील विधाने विचारात घ्या.

अ. बंगालच्या गव्हर्नरला “बंगालचा गव्हर्नर जनरल” बनविण्यात आले.

ब. त्याला मदत करण्यासाठी पाच सदस्यीय “कार्यकारी परिषद” बनविण्यात आले.

1. फक्त अ✅🙏

2. फक्त ब

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत



*वेद भाष्य भूमिका हा ग्रंथ कोणी लिहिला?*

*उत्तर स्वामी दयानंद सरस्वती*

🦋


जैन तत्वज्ञानाचा असा दावा आहे की जग निर्माण आणि राखून ठेवलेले आहे?

अ) सार्वभौम कायदा.🍫🍫

ब) सार्वभौम सत्य.

क) सार्वभौम विश्वास.

ड) सार्वभौमिक आत्मा.



प्रश्न 1.अलेक्झांडर ने जेव्हा प्राचीन भारतावर आक्रमण केले त्यावेळी मगध साम्राज्यचा राजा कोण होता?

1)चंद्रगुप्त मौर्य

2)महापदमानंद

3)धनानंद✅✅

4)कालअशोक



2.तुघलक वंशाचा संस्थापक कोण?

1)मोहम्मद तुघलक✅✅

2)फिरोज तुघलक

3)जल्लाउद्दीन तुघलक

4)गाझी मलिक


खालील पैकी कोणत्या राजाने गंगैकोड हे बिरुद स्वतःस लावून घेतले?

1)पहिला राजराजा

2)दुसरा राजराजा

3)पहिला राजेंद्र✅

4)दुसरा राजेंद्र


4.चंद्रगुप्ताने धनानंदचा कसा पराभव केला याचे सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथात आहे?

1)इंडिका

2)अर्थशास्त्र

3)मुद्रा राक्षस✅

4)यापैकी नाही


5 सिंधू संस्कृतीतील अति दक्षिणेकडे असलेले ठिकाण कोणते?

1)उज्जैन

2)लोथल

3)आलमगिरपूर

4)दायामाबाद✅



6 गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामध्ये आहे?

1)ऋग्वेद✅✅

2)यजुर्वेद

3)सामवेद

4)अथर्ववेद



7 खालील विधाने पाहा.

अ)युआन श्वान्ग हा यात्री चंद्रगुप्त द्वितीय च्या काळात भारतात आला होता

ब)फाहिआण हा यात्री हर्षवर्धन च्या काळात भारतात आला होता


M)फक्त अ बरोबर ब चूक.

P)फक्त ब बरोबर अ चूक

S)दोन्ही विधाने बरोबर✅✅

C)दोन्ही विधाने चूक.



8.राज्याचे सप्ताअंग हा सिद्धांत कोणी दिला आहे?


1)समुद्रगुप्त

2)मॅगेस्थिनस

3)चंद्रगुप्त

4)विष्णुगुप्त✅



खालील महाजनपदांचा उत्तेरकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

A. कंभोज B. गांधार C. अश्मक D. अवंती

1)A,B,C,D

2)A,B,D,C✅

3)B,A,D,C

4)B,A,C,D


कोणत्या युद्धाने दिल्लीच्या सुल्तानशाहीचा आरंभ झाला?

ऊत्तर= तराई चे द्वितीय युद्धाने


तराई चे पाहिले युद्ध कधी व कोनाकोणामध्ये झाले?

उत्तर = 1191

            पृथ्वीराज चौहान (विजयी) वि मोहम्मद घोरी (पराभूत)


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले???


A】 कर्मवीर भाऊराव पाटिल🎂🎁

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय???

A】 सासरा - सुन

B】 मित्र - मैत्रीण

C】 भाऊ - बहिण

D】 बाप - मुलगी🎂



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🎂

D】 शाहू महाराज

 

🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁



विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले???

A】 १९१४

B】 १९१५🎂

C】 १९१६ 

D】 १९१७


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली???

A】 पाच🎂

B】 दोन

C】 सात

D】 तीन


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती???

A】राष्ट्रपिता फुले

B】 केळूसकर गुरूजी

C】 सावित्रीआई फुले🎂

D】 फातिमा शेख


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


१०】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय???

A】 रामजी

B】 संताजी

C】 लहुजी

D】 मालोजी🎂


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


पुणे करार केंव्हा झाला ?

 24 सप्टेंबर 1932




Police Bharti

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43. ​​'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

आर्य


◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. 


◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. 


◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली


◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. 


◾️गुरे ही त्यांची संपत्ती होती. 


◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. 


◾️त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या. 


◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. 


◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. 


◾️त्यांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय. 


◾️आर्यांनी चार वेद लिहिले

1)........

2)........

3)........

4)........


◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. 


◾️ वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.


◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला. 


◾️ जनावरे  ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले. 


◾️ हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. 


◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.


◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. 


◾️म्हणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.


◾️देशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते. 

भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान


तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)

💥1. लॉर्ड वेलस्ली


०१. रिचर्ड वेलस्लीचा जन्म १७६० मध्ये झाला. तो इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता. कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही तो सदस्य होता. १७९८ मध्ये सर जॉन शोअर नंतर वेलस्लीला गवर्नर बनविण्यात आले.


०२. शांततेच्या धोरणाचा त्याग करीत वेलस्लीने सरळ सरळ युद्धनीतीचा अवलंब केला. शांततेच्या व अलिप्ततेच्या धोरणाचा कंपनीच्या शत्रुना फायदा मिळेल असे त्याचे मत होते. तत्कालीन इंग्लंड मंत्रीमंडळानेही वेलस्लीच्या धोरणाला पाठींबा दिला.


०३. मराठा प्रदेशावर विजय म्हणजे भारतीय जनतेवर उपकार आहे असे वेलस्लीचे मत होते. इंग्रजांच्या कल्याणकारी सत्तेचे वर्चस्व मराठे का मान्य करीत नाहीत हे वेलस्लीला न उलगडलेले कोडे होते. स्वतःच्या धोरणाला न्याय्य, तर्कसंगत, संयमी व शांत अशी विशेषणे लाऊन वेलस्ली मराठ्यांच्या राजकारणाला 'विकृत, कारस्थानी व कपटी अशी संभावना करत होता.

2. तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)


०१. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८४९ मध्ये डूप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डूप्लेला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


१८ व्या शतकाच्या अखेरच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर तयार झालेले अतिरिक्त उत्पादन भारताच्या बाजारात खपवता येईल असा ब्रिटीश व्यापाऱ्यांचा कयास होता. यासाठी कंपनीने तीन मार्ग अवलंबिले. थेट युद्ध पुकारणे व पूर्वी अंकित केलेल्या प्रदेशावरील आपली पकड मजबूत करणे. यासोबतच तैनाती फौज पद्धत त्यापैकी एक होती.


०२. वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण वेलस्लीने भारतात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व भारताचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.


०३. वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली.


०४. आल्फ्रेड लायलने भारतीय युद्धात कंपनीच्या भाग घेण्याबाबत चार अवस्था सांगितल्या आहेत.


* आपल्या भारतीय मित्रांना युद्धात मदत करण्यासाठी कंपनी आपली फौज किरायाने पाठवत असे. ह्याअंतर्गत १७६८ मध्ये निजामाशी तह झाला होता.


* आपल्या मित्रांच्या मदतीने कंपनी स्वतःच युद्धात भाग घेऊ लागली


* कंपनीची मित्रराज्ये कंपनीला सैनिकाऐवजी पैसा पुरवू लागली. ज्याच्या आधारावर कंपनीने इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सानिक भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करण्यास प्रारंभ केला. पुढे गरजेनुसार हेच प्रशिक्षित सैन्य मित्रराज्यांना देऊन त्याऐवजी कंपनी पैसा घेऊ लागली. उदा. १७९८ चा हैद्राबाद तह


* शेवटच्या अवस्थेत कंपनीने मित्रराज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पत्करून त्याकरिता तैनाती फौज त्या राज्यात ठेवणे सुरु केले. त्याऐवजी कंपनी पैसे न घेता त्या राज्यातून काही प्रदेश घेऊ लागली. १८०० मध्ये निजामाशी झालेला तह.


०५. सर्वप्रथम प्रयोग १७६५ मध्ये अवधसोबत केला. यावेळी राजधानी लखनौत इंग्रज रेसिडेंट ठेवण्याचे अवधने मान्य केले. १७८७ मध्ये कंपनीने कर्नाटक नवाबाला विनंती केली कि त्याने इंग्रजान्शिवाय दुसऱ्या युरोपियन शक्तीशी संबंध ठेऊ नये.


०६. १७९८ मध्ये सर जॉन शोअरने अवधच्या नवाबाशी तह करताना अशी अट घातली कि नवाबाने इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना सेवेत घेऊ नये व कोणताही संबंध ठेऊ नये.


०७. पैशाऐवजी प्रदेशाची मागणी करणे हा एक नैसर्गिक टप्पा होता. भारतीय राज्ये धन कबुल करीत असत पण त्यांची फेड न झाल्याने रक्कम वाढत जाई. म्हणून कंपनीने तैनाती फौजेचा खर्च म्हणून प्रदेशाची मागणी सुरु केली. ह्या प्रदेशावर कंपनीची सार्वभौम सत्ता प्रस्थापित होत असे.


०८. ब्रिटिशांनी आपल्या सहा बटालियन हैदराबादेत ठेऊन फ्रेंचांना हाकलून दिले. या फौजेचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी २ लाख ४१ हजार ७१० पौंड निजामकडून वसूल केले. फौजेचा वाढता खर्च झेपेनासा झाल्याने निजामाने आपल्या संस्थानचा काही भाग ब्रिटीशांच्या हवाली केला.


3. तैनाती फौजेच्या अटी


०१. भारतीय राज्यांच्या परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण राहील. दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध वगैरे कंपनीच्या माध्यमातून होईल. संस्थानांनी परस्पर कोणतेही युद्ध करू नये व कुणाशीही परस्पर बोलणी करू नये. आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.


०२. संस्थानिकांनी आपली स्वतःची फौज ठेऊ नये. त्याऐवजी राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी कंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. ह्या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात राहील. त्याऐवजी ती राज्ये कंपनीला पूर्ण अधिकारयुक्त प्रदेश देईल. लहान राज्ये मात्र धन देत असत.


०३. ह्या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल. तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.


०४. कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना दुसऱ्या युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही.


०५. राज्याच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही.


०६. राज्याचे अंतर्गत व बाह्य शत्रूपासून कंपनी संरक्षण करेल.


4. तैनाती फौजेचे कंपनीला झालेले फायदे


०१. तैनाती फौज पद्धतीने साम्राज्य निर्मितीच्या प्रक्रियेत फितूर शत्रूसारखी भूमिका पार पाडली. कंपनीचे संरक्षण असल्याने भारतीय राज्ये दुर्बल बनली. हि पद्धती स्वीकृत केलेल्या राज्यात गवर्नर जनरल आपल्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहत असे. आता ही राज्ये आपसात विशेषतः इंग्रजांविरुद्ध कोणताही संघ बनवू शकत नसत.


०२. ह्यामुळे कंपनीला भारतीय राज्यांच्या खर्चात एक महान सैन्य उपलब्ध झाले.


०३. राज्यांच्या राजधानीत कंपनीचे सैन्य राहत असल्याने देशातील मोक्याच्या जागांवर कंपनीचे नियंत्रण प्रस्थापित झाले.


०४. ह्या पद्धतीमुळे कंपनीचे सैन्य आपल्या राजकीय सीमांच्या बराच दूर निघून गेले. परिणामी युद्ध झालेच तर त्याचा कोणताही आर्थिक भार कंपनीवर पडत नव्हता. तसेच युद्धक्षेत्र बरेच दूर असल्याने कंपनीचा प्रदेश सुरक्षित राहिला.


०५. तैनाती फौज पद्धतीमुळे कंपनीला वाटत असलेली फ्रेंचांची भीती नेहमीकरिताच नाहीशी झाली. कारण तहानुसार कोणतेही तैनाती फौज स्वीकारलेले राज्य कंपनीच्या अनुमतीशिवाय कोणत्याही युरोपियनाला सेवेत ठेऊ शकत नव्हते.


०६. राज्यांचे परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात आल्याने भारतीय राज्यांच्या भांडणात कंपनी मध्यस्थ बनली


०७. तैनाती फौजेच्या अधिकाऱ्यांना भरपूर वेतन मिळू लागले. तसेच ह्या राज्यातील इंग्रज रेसिडेंट अतिशय प्रभावशाली बनून कालांतराने राज्याच्या अंतर्गत कार्भाराठी हस्तक्षेप करू लागले.


०८. सार्वभौमत्वसंपन्न असा बराच प्रदेश कंपनीला मिळाल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले. १७९२ आणि १७९९ मध्ये युद्धात म्हैसूरचा मिळालेला प्रदेश निजामाने १८०० मध्ये कंपनीला दिला. १८०१ मध्ये अवधच्या नवाबाने रोहिलखंड आणि दक्षिण दोआब प्रदेश कंपनीला देऊन टाकला.



तैनाती फौजेमुळे झालेली भारतीय राज्यांची हानी


०१. परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात गेल्याने भारतीय राज्ये आपले सार्वभौमत्व गमावून बसली. लष्करीदृष्ट्याही राज्ये दुर्बल बनली. परिणामी भारतीय राज्यांचे मानसिक बळ खच्ची झाले. त्यामुळे भारतीय राज्यांना अंततः ते अतिशय हानिकारक ठरले. प्रजेलाही त्याचा त्रास भोगावा लागला.


०२. राज्यांच्या दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला कि प्रशासन चालविणे कठीण होऊन बसले.


०३. ही पध्दती स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. कंपनी या राज&##2381;यांच्या उत्पन्नाचा अंदाजे १ भाग घेत होती, पण ही रक्कम इतकी जास्त असे की बहुतेक राज्यांकडे रक्कम थकीत राहू लागली. इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांचे वेतन प्रचंड होते आणि लष्करी साहित्य इतके महाग होते की राजांना आपल्या प्रजेवर मोठया प्रमाणावर कर लादणे भाग पडले.


०४. रक्कम देणे शक्य झाले नाही तर कंपनी राजाकडून त्याच्या राज्याच्या प्रदेशाची मागणी करीत असे. पण हा भूप्रदेश फार मोठा असे. वेलस्लीच्या कंपनीच्या संचालकांना एका प्रसंगी लिहिले की ४० लक्ष रु ऐवजी आम्ही ६२ लक्ष वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मागितला आहे.


* तैनाती फौजेची ही पद्धत निजाम (१७९८ व १८००), म्हैसूर (१७९९), तंजावर (१७९९), सुरत (१७९९), बडोदा (१८००), कर्नाटक (१८०१), अवध (१८०१), पेशवा (१८०२), नागपूरचे भोसले (१८०३), शिंदे (१८०४), जोधपुर, जयपूर, मछेरी, बुंदी व भरतपूर या राज्यांनी स्वीकारली.


6. १८०० नंतर भारताच्या सीमा


०१. १८०५ मध्ये कंपनीचे नियंत्रण भारताच्या पश्चिम तटासह सिंधू नदीच्या मुखापासून कन्याकुमारीपर्यंत, बंगालची खाडी आणि ब्रह्मदेशच्या सीमेपर्यंत व तेथून थेट पंजाबपर्यंत होते. अवध, नागपूर, ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, हैद्राबाद, मैसूर , त्रावणकोर ही राज्ये कंपनीची संरक्षित राज्ये बनली होती.


०२. नाशिकपासून कोंकण किनारपट्टीसह कोल्हापूरपर्यंत पेशव्यांचे वर्चस्व, गुजरातमध्ये गायकवाड, मध्यभारतात होळकर व शिंदे आणि नागपूर भागात भोसले असा मराठ्यांचा प्रदेश होता.


०३. सतलज नदीच्या दोन्ही काठावर मिसल (म्हणजे शिखांची लहान लहान राज्ये) बऱ्याच मोठ्या प्रदेशावर होती. पंजाबमध्ये शक्तिशाली राजा म्हणून रणजीतसिंगचा उदय होत होता.


०४. मुलतान, सिंध, पश्चिम पंजाब आणि काश्मीरमध्ये मुसलमान सरदार राज्य करीत होते.


०५. वेलस्लीनंतर तटस्थ धोरणाचा पुरस्कार करणारा र्लॉड कॉर्नवॉलिस दुसर्‍यांदा भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला पण येथे लवकरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर सर बार्लो (१८०५-१८०७) हा गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याने शिंदे व होळकर यांच्याशी समझोत्याचे करार करुन त्यांचे काही प्रदेश परत केले.


०६. बर्लोनंतर र्लॉड मिंटो हा गव्हर्नर जनरल झाला (१८०७-१८१३) यानेही तटस्थतेचे धोरण स्वीकारले. याच्या कारकिर्दीतचत शिख राजा रणतिजसिंग याच्यांशी करार होऊन इंग्रजी राज्य व शीख राज्य यांच्यात सतलज नदी ही हद ठरविण्यात आली होती.


०७. याच सुमारास इंग्रज सरकारने १८१३ चा सनदी कायदा पास करुन कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि र्बोड ऑफ कंट्रोल मार्फत इंग्रज सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर केले.


ब्रह्मपुत्र नदी



◆आशियातील ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. लांबी २,९०० किमी. पाणलोट क्षेत्र ९,३५,५०० चौ. किमी. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत सस. पासून ७,२०० मी. उंचीवर (८२० १०’ पू. रेखांश व ३०० ३१ ’ उ. अक्षांश) चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते.

◆हे उगमस्थान मानसरोवरापासून सु. १०० किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून सु. १६० किमी. अंतरावर आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.

◆भारतात ब्रह्मपुत्र महानद असाच या नदीचा निर्देश करण्यात येत असे. या नदीशी अनेक आख्यायिका निगडित असून त्या महाभारत कालिकापुराण कालिदासाचा रघुवंश यांसारख्या संस्कृत साहित्यातूनआढळतात. ‘लौहित्य’ (म्हणजे लाल रंगाची) असेही तिचे नाव असून परशुरामाने क्षत्रिय संहाराने रक्तरंजित झालेला परशू ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात धुतल्याने तिचे पाणी लाल झाले, अशी एक आख्यायिका आहे.

◆आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्याच’ म्हणून तिचा उल्लेख करतात.

◆ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखत असून तिबेटमध्ये तिला काही स्थानिक नावेही आहेत.

◆उगमानंतर ही नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेमी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व देशेने वाहत जाते. तिबेट मधील ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण प्रवाह सु. १,२९० किमी. आहे.

◆या भागातील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदऱ्यांमधून उड्या घेत वाहू लागते. तेथे प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह व प्रपातमाला आढळतात. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते. तिबेटमध्ये त्सांगपोला डावीकडून जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू) तर उजवीकडून न्येन-चू हो (न्यांग) ह्या उपनद्या येऊन मिळतात. चीचू या उपनदीतीरावरच ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण आहे.

◆भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथूनच तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे.

◆आसाममध्ये ब्रह्मापुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोरच मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली या १,२५६.१५ चौ. किमी. क्षेज्ञाच्या बेटाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मपुत्रेला भारतात उत्तरेकडून सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली या उपनद्या येऊन मिळतात. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोऱ्याची लांबी सु. ७५० किमी. व रुंदी सरासरी ८०
बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून तोरसा, जलढाका, तिस्ता या उपनद्या येऊन मिळतात. पुढे गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हाच ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो; तर जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो. तत्पूर्वी जमुनेला बारल, अत्राई, हुरासागर यांचा संयुक्त प्रवाह उजवीकडून येऊन मिळतो.

◆तसेच धालेश्वरी व बडी गंगा या शाखा तिच्यापासून वेगळ्या होऊन स्वतंत्रपणे मेघना नदीला मिळतात. ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो. पुढे पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

◆एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या वरच्या टप्प्याविषयी अज्ञानच होते. किंबहुना त्सांगपो व दिहांग (ब्रह्मपुत्रा) ही एकच नदी आहे. या

पोलीस भरती प्रश्नसंच

 महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? 

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅


(०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

_______________________________

पृथ्वीचे अंतरंग



🏆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

🏆 पथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

🏆 पष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

🏆 अतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

✅ पराथमिक लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 भकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.

🏆 पराथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

✅ दय्यम लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पराथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

✅ पष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष


🏆 पथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 भगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

🏆 बाह्य गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

महत्वाच्या योजना आणि त्यांची सुरुवात


✍️📚 MPSC चा सर्वात आवडता प्रश्न आहे.सर्व योजना आणि त्यांच्या तारखा लक्षात असू द्या.


💯 दर वर्षी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व मध्ये योजना वर 2/3 प्रश्न Fix असतातच..


1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014


2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014


3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014


4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014


5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014

 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014


7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014


8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015


9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015

 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015


11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 


12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 


13) राष्ट्रीय कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 


14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015


15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015


16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015


17) उस्ताद योजना — 14 मे 2015


18) कायाकल्प योजना — 15 मे 2015


19) D D किसान वाहिनी — 26 मे 2015


20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015


21) किसान सन्मान निधी योजना — 24 फेब्रुवारी 2019


22) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना — 1 मे 2016


राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः

🔹 सिंधू संस्कृती:


०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती. 


०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही. 


०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

ठळक बातम्या २९ मार्च २०२५.



१.एबेल पुरस्कार २०२५

- मसाकी काशीवारा यांना
- ७८ वर्षीय जपानी गणितज्ञांना बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील योगदानाबद्दल.

२. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५

- १५ वी आवृत्ती.
- मुंबईला मागे टाकून आशियातील अब्जाधीशांची राजधानी शांघाय ठरले.
- रोशिनी नादर या जगातील टॉप १० श्रीमंत महिलांमध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.
- अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक अब्जाधीशांचा देश म्हणून भारत.

३. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन.

- संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १४ डिसेंबर २०२२ रोजी एक ठराव मंजूर केला.
-३० मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून घोषित.
- शून्य-कचरा उपक्रम शाश्वत विकासाच्या २०३० च्या अजेंडाशी सुसंगत आहेत.
SDG ११: शाश्वत शहरे आणि समुदाय
SDG १२: जबाबदार वापर आणि उत्पादन.
- या वर्षीचा आंतरराष्ट्रीय कचरामुक्त दिवस फॅशन आणि कापड क्षेत्रातील कचरा सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतो.

४. सिल्वागार्ड.

- एक एआय-चालित स्वायत्त ड्रोन प्रणाली जी जंगलातील आगी शोधण्यास आणि दाबण्यास सक्षम आहे, वाढत्या जंगलातील आगीवर नियंत्रण आणणे.
- निर्मिती ड्रायड नेटवर्क्सने केली.

५.खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची दुसरी आवृत्ती.

- हरियाणाने अव्वल स्थान मिळवले, एकूण 104 पदकांसह (34 सुवर्ण, 39 रौप्य आणि 31 कांस्य).
- तामिळनाडू (74 पदके) आणि उत्तर प्रदेश (64 पदके) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान.
- स्पर्धा नवी दिल्लीतील तीन  स्थळांवर झाली – जवाहरलाल नेहरू इंडोअर स्टेडियम, IG इंडोअर स्टेडियम आणि कर्णी सिंग शूटिंग रेंज.

चालू घडामोडी :- 28 मार्च 2025



◆ महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने कनिष्ठ गृहमंत्री नित्यानंद राय यांनी यांनी लोकसभेत इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल-2025 विधेयक सादर केले.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास सात वर्षाची शिक्षेची तरतूद आहे.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते गृह मंत्रालयाशी संबधित आहे.

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

◆ नाशिकमध्ये 2027 वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे.

◆ भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकॲप सर्च इंजिन चे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ तामिळनाडू राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे.

◆ भारतीय स्वदेशी बनावटीचे लुकॲप सर्च इंजिन पुणे ठिकाणच्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे.

◆ रोशनी नाडर जागतिक स्तरावर पाचव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत.[सर्वात श्रीमंत भारतीय महिला :-रोशनी नाडर]

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने पाचवे स्थान पटकावले आहे.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 43 पदके जिंकली आहेत.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 18 सुवर्ण पदक मिळवले आहेत.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिस मध्ये 3 सुवर्ण पदक जिंकले आहेत.

◆ एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुनील कुमार ने 87 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे.

◆ ICC One Day Women World Cup 2025 चे आयोजन भारत देशात करण्यात येणार आहे.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक 104 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे.

23 March 2025

IMP

 1-10: व्यक्ती आणि त्यांचे वैशिष्ट्ये (People & Their Characteristics)

 1. Ascetic – जो ऐहिक सुखांचा त्याग करून साधी जीवनशैली जगतो. (संन्यासी)

 2. Autocrat – जो एकहाती सत्ता गाजवतो. (हुकुमशहा)

 3. Bankrupt – ज्याच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसा उरलेला नाही. (दिवाळखोर)

 4. Celibate – जो विवाह किंवा लैंगिक संबंधापासून दूर राहतो. (ब्रह्मचारी)

 5. Charlatan – जो खोटे ज्ञान असल्याचा दिखावा करतो. (ढोंगी विद्वान)

 6. Connoisseur – ज्याला एखाद्या गोष्टीचे उत्तम ज्ञान आहे. (रसिक तज्ञ)

 7. Crusader – जो कोणत्या तरी चळवळीसाठी लढतो. (सामाजिक कार्यकर्ता)

 8. Feminist – जो स्त्रियांच्या हक्कांसाठी लढतो. (स्त्रीवादी)

 9. Impostor – जो खोट्या ओळखीने इतरांची फसवणूक करतो. (भोंदू)

 10. Mercenary – जो पैशासाठी कोणासाठीही काम करतो. (भाडोत्री सैनिक)



11-20: विविध संज्ञा (Miscellaneous Terms)

 11. Extempore – कोणत्याही पूर्वतयारीशिवाय दिलेले भाषण. (तात्काळ भाषण)

 12. Hearsay – पुरावा नसलेली फक्त ऐकीव माहिती. (ऐकीव गोष्ट)

 13. Illusion – डोळ्यांना भासणारी पण खरी नसलेली गोष्ट. (मोहजाल)

 14. Mirage – वाळवंटात पाण्याचा आभास निर्माण करणारी दृश्य फसवणूक. (मृगजळ)

 15. Nemesis – एखाद्याच्या चुकीला मिळणारी नैसर्गिक शिक्षा. (अनिवार्य शिक्षा)

 16. Oxymoron – दोन विरुद्ध अर्थाच्या शब्दांचा एकत्र वापर. (उलटसुलट अर्थ असलेली संज्ञा – उदा. “विनम्र गर्व”)

 17. Paradox – वरकरणी विरोधाभासी पण सत्य असलेले विधान. (विसंगत वाटणारी पण सत्य गोष्ट)

 18. Rendezvous – ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी होणारी भेट. (पूर्वनियोजित भेट)

 19. Silhouette – अंधुक सावली किंवा आकृती. (सावली प्रतिमा)

 20. Utopia – काल्पनिक आदर्श राज्य. (संपूर्णतः परिपूर्ण देश)



21-30: वैद्यकीय संबंधित (Medical Related)

 21. Amnesia – स्मृतिभ्रंश, विसरण्याचा आजार. (स्मृती喪失)

 22. Anemia – रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. (रक्ताल्पता)

 23. Antiseptic – जखमेत जंतू होऊ नयेत म्हणून वापरणारी औषधे. (जीवाणुनाशक)

 24. Chronic – दीर्घकाळ टिकणारा आजार. (जुना व कायमस्वरूपी आजार)

 25. Coma – दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत असणे. (गंभीर अचेतन अवस्था)

 26. Diagnosis – रोगाचे कारण शोधणे. (रोगाचे निदान)

 27. Paralysis – स्नायूंना हालचाल न करणे शक्य होणे. (अर्धांगवायू)

 28. Quarantine – संसर्गजन्य रोगाने बाधित व्यक्तीला वेगळे ठेवणे. (संगरोध)

 29. Therapy – रोगाच्या उपचारासाठी वापरणारी पद्धत. (चिकित्सा)

 30. Vaccination – रोगप्रतिकारक लस देणे. (लसीकरण)



31-40: विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology)

 31. Astronomy – ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांचा अभ्यास. (खगोलशास्त्र)

 32. Botany – वनस्पतींचा अभ्यास. (वनस्पतिशास्त्र)

 33. Ecology – पर्यावरण व सजीव यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास. (पर्यावरणशास्त्र)

 34. Entomology – कीटकांचा अभ्यास. (कीटकशास्त्र)

 35. Genetics – आनुवंशिक गुणधर्मांचा अभ्यास. (जनुकीय विज्ञान)

 36. Meteorology – हवामानाचा अभ्यास. (हवामानशास्त्र)

 37. Optics – प्रकाशाचा अभ्यास. (प्रकाशशास्त्र)

 38. Seismology – भूकंपाचा अभ्यास. (भूकंपशास्त्र)

 39. Toxicology – विषांचे गुणधर्म आणि परिणाम यांचा अभ्यास. (विषशास्त्र)

 40. Zoology – प्राण्यांचा अभ्यास. (प्राणिशास्त्र)



41-50: राजकीय आणि आर्थिक संज्ञा (Political & Economic Terms)

 41. Arbitration – दोन पक्षांमधील वाद मिटवण्यासाठी तटस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप. (मध्यस्थी)

 42. Boycott – विरोध म्हणून एखादी वस्तू किंवा सेवा वापरणे थांबवणे. (बहिष्कार)

 43. Diplomacy – दोन राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी केलेली राजकीय चर्चा. (राजनैतिक कौशल्य)

 44. Expatriate – जो आपल्या देशाबाहेर राहतो. (परदेशस्थ व्यक्ती)

 45. Inflation – वस्तूंच्या किंमती सतत वाढत जाण्याची प्रक्रिया. (महागाई)

 46. Deflation – बाजारातील किंमती सतत घटत जाण्याची प्रक्रिया. (किंमत घट)

 47. Referendum – मोठ्या प्रश्नावर घेतलेले सार्वमत. (जनमत संग्रह)

 48. Sanctions – आंतरराष्ट्रीय निर्बंध. (प्रतिबंध)

 49. Tyranny – क्रूर आणि जुलमी राजवट. (हुकूमशाही)

 50. Xenophobia – परदेशी लोकांविषयी तिरस्कार किंवा भीती. (परदेशी व्यक्तींबद्दल भीती/द्वेष)

ऑस्ट्रेलियन ओपन 2025 संपूर्ण विजेत्यांची यादी


🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष 2025 

1) पुरुष विजेता - जॅनिक सिनर (इटली) 

2) पुरुष उपविजेता -अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी)



🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला 2025 

1) महिला विजेता - मॅडिसन कीजने ( अमेरिका)

2) महिला उपविजेता - आर्यना सबालेन्का



🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष दुहेरी 2025

1) विजेता - हॅरी हेलिओवारा(फिनलँड) आणि ग्रेट हेन्री पॅटेन (ब्रिटन)

2) उपविजेता -  सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी 



🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला दुहेरी 2025

1) विजेता - कॅटेरिना सिनियाकोवा आणि टेलर टाऊनसेंड

2) उपविजेता - हसिह सु-वेई आणि जेलेना ओस्टापेन्को 


ऑस्ट्रेलिया ओपन मिश्र दुहेरी 2025

1) विजेता-  ऑलिव्हिया गाडेकी (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन पीर्स 

2) उपविजेता - किम्बर्ली बिरेल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी कोणता optional विषय घ्यावा?


1) एखाद्या विषयाची आवड असेल तर तो विषय घेऊ शकता (उदा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र) 


2) कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार : मराठी / English : उपलब्ध संदर्भ साहित्य


3) syllabus : इतर विषयांच्या तुलनेने कमी असलेला विषय / खूपच किचकट संकल्पना नसलेला विषय 



मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणार असाल तर खालील विषयांसाठी चांगले संदर्भ / पुस्तके मिळू शकतात. 


1) इतिहास :  syllabus खूप जास्त

upsc तील trend - इतर विषयांच्या तुलनेत कमी मार्क्स मिळतात.  पण मराठीतून भरपूर संदर्भ पुस्तके उपलब्ध.


2) भूगोल : objective साठी वाचलेल्या बऱ्याच गोष्टी Descriptive मध्ये फायदेशीर ठरू शकतात. बरेच सिद्धांत, भौगोलिक संकल्पना खूप detail मध्ये कराव्या लागतील. 

Mapping वर प्रश्न असतात. 


3) राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) : core polity सगळ्यांचं वाचून झालेलं असतं, बऱ्याच गोष्टी / facts तोंडपाठ असतात. याचा फायदा राज्यशास्त्रात होऊ शकतो. इथे extra फक्त आंतरराष्ट्रीय संबंध हा घटक करायचा आहे. पण सर्व गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. Thinkers हा घटक बऱ्याच विषयात थोडयाफार प्रमाणात आहे. संकल्पना, कारणे, परिणाम या मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागेल (इतर विषयांमध्ये सुद्धा) 


4) लोकप्रशासन (Pub Ad) : या विषयाचा अभ्यासक्रम आत्ताच्या objective mains मधील Polity Part 2 शी मिळताजुळता आहे. पण इथे facts पेक्षा Concepts वर जास्त focus पाहिजे. Syllabus इतर विषयांपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. 

प्रशासनाशी संबंधित विषय आहे. बऱ्याच गोष्टी आपण polity, पंचायतराज मध्ये वाचलेल्या असतात. 


5) समाजशास्त्र (Sociology) : 

  मराठीतून बरेच संदर्भ उपलब्ध आहेत. Syllabus देखील खूप जास्त नाही. काही thinkers / किचकट सिद्धांत, संकल्पना सोडल्या तर दैनंदिन /सामाजिक जीवनावरील घडामोडिंवर आधारित विषय आहे. 



वरील सर्वच विषयांसाठी मराठी मध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. मराठी माध्यमातून अभ्यास करणाऱ्यांसाठी वरील optional विषय चांगले आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि इतर घटकांचा विचार करून optional विषय निवडू शकता. 


Descriptive मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे Writing practice.

तुम्ही कितीही वाचन केलात, पाठांतर केलात पण writing जमत नसेल तर मार्क्स मिळणार नाहीत. 

इतर काही विषय : मराठी साहित्य, अर्थशास्त्र, विधी, व्यवस्थापन 


पूर्व परीक्षेचा अर्ज भरतेवेळेस Optional विषय कोणता घेणार हे अर्जात नमूद करावे लागेल.


19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना जाहीर


👉 व्यक्तीशः ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे 21 वे व्यक्ती


👉पुरस्कार वर्ष - 2024 

◾️गाव - गोंदूर धुळे महाराष्ट्र

◾️वय - 100 वर्षे

◾️जगातील सर्वात उंच मूर्ती "स्टॅच्यू ऑफ युनिटी"(182 मीटर - 597 फूट) 

◾️1954 ते 1958 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात मॉडेलिंग म्हणून सेवा देऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात 

◾️1959 मध्ये -  दिल्लीत माहिती वर दूरसंचार मंत्रालयात नोकरी केली.

◾️त्यांनी वेरूळ आणि अजिंठा लेण्यांमधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी केली. 


👉त्यांनी बनवलेले महत्वाचे पुतळे 👇


◾️संसदेतील महात्मा गांधीजींचा पुतळा

◾️बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 108 फूट उंच केम्पे गौडा पुतळा

◾️ मध्य प्रदेशातील गांधी सागर धरणावरील 45 फूट उंच चंबळ स्मारक

◾️ब्रह्मा सरोवर येथील कृष्ण अर्जुन स्मारक

◾️राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा ते बनवणार आहेत

◾️भाक्रा नांगल धरणावर  कामगारांच्या स्मरणार्थ 50 फूट उंच कांस्य स्मारक

◾️26 जानेवारी 1959 रोजी कामगारांचा विजय पुतळा बसवण्यात 

◾️दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत यांची 10 फूट लांबीची कांस्य मूर्ती

◾️ बिहारमधील कर्पुरी ठाकूर पुतळा

◾️ बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांची मूर्ती

◾️अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंह यांची 21 फूट उंच मूर्ती 

◾️भगवान श्रीरामाची 251 मीटर उंच मूर्ती (अयोध्या)

◾️153 फूट उंच भगवान शिव मूर्ती (बेंगळुरू)

◾️100 फूट उंच छत्रपति संभाजी महाराज यांची प्रतिमा (मोशी, पुणे)

◾️मुंबईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सध्या बनवत आहेत


👉श्री राम सुतार यांना मिळालेले पुरस्कार 

◾️1999 - पद्मश्री पुरस्कार

◾️2016 - टागोर पुरस्कार

◾️2016 - पद्मभूषण पुरस्कार

◾️2025 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार

👉फ्रान्समधील इकोल सुपेरिअर रॉबर्ट डी सोर्बन विद्यापीठाकडून डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे


👉 महाराष्ट्र भूषण पुरस्कार

●2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी

●2023 - अशोक सराफ 

●2024 - राम सुतार 


👉 महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल ✅


◾️महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे

◾️स्थापना : 1995

◾️आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रसाठी दिला जातो

◾️पुरस्कार स्वरूप : 25 लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

👉पहिला पुरस्कार : पू.ल.देशपांडे (साहित्य) 1996

👉 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार लता मंगेशकर,राणी बंग,सुलोचना लाटकर,आशा भोसले

अत्यंत महत्त्वाचे.

𝟏)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

𝟐)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

𝟑)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

𝟒)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी- हिमाचल प्रदेश

𝟓)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ नदी - मध्य प्रदेश

𝟔)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

𝟕)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

𝟖)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

𝟗)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

𝟏𝟎)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟏𝟏)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

𝟏𝟐)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟏𝟑)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र 

𝟏𝟒)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

𝟏𝟓)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

𝟏𝟔)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

𝟏𝟕)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

𝟏𝟖)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

𝟐𝟏)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

𝟐𝟎)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

𝟐𝟏)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

𝟐𝟐)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

𝟐𝟑)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟐𝟒)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

𝟐𝟓)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟐𝟔)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

𝟐𝟕)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक


परीक्षाभिमुख AI बाबत महत्वाची माहिती :


➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस 

➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका 

➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)

➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ

➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ

➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह 

➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ

➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)

➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका 

➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा 

➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत 

➡️ पहिली AI ब्युटी क्वीन - जारा शतावरी

➡️ मिस AI 2024 - केंझा झायली

➡️ भारतातील पहिली AI MOM इन्फ्लुएन्सर - काव्या मेहरा

➡️ भारतातील पहिली AI हिंदी सिंगर - माया 

काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा


◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे

◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य

◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले

◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य

◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य

◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य 

◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य 

◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य 

◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य

◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य

◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य 

◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य

◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य 

◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य 

◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य

◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य 

◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 


◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 


◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे 

करणारे पहिले राज्य 


◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 


◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य


◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 


◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य


◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य


◾️दिल्ली

 : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 


◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे


◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 


◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य


◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.


◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य


◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 


◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे


◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे


◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य


◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य


आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी - 2025


👉 आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 

👉 प्रकार - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय

👉 आयोजित - दर 4 वर्षांनी 

👉 विजेता संघ - भारत 

👉 उपविजेता संघ - न्युझीलँड 

👉 एकूण संघ - 8

👉 एकूण सामने - 15 

👉 2025 चे आयोजन - पाकिस्तान 

👉 भारताचे सर्व सामने - दुबई 

👉 प्रथम आयोजन 1998 - बांगलादेश 

👉 प्रथम विजेता - दक्षिण आफ्रिका 

👉 पुढील आयोजन 2029 - भारत 

👉 मॅन ऑफ द मॅच - रोहित शर्मा

👉 मॅन ऑफ द सिरीज - रचीन रवींद्र 


प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय

 1).  GATT चे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - जिनिव्हा (1947)


 2).  G-8 देशांची स्थापना कधी झाली?

 उत्तर - 1975


 3).  UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा (1964)


 4).  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - वॉशिंग्टन (1945)


 ५).  अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे? 

 उत्तर - रोम (1945)


 ६).  जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा 1948


 7).  रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा (1863)


 8).  जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - वॉशिंग्टन (1945)


 9).  G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - जिनिव्हा (1989)


 10).  जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा (1995)


 11).  नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत?

 उत्तर - ब्रुसेल्स (1949)


 १२).  सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - काठमांडू (1985)


 13).  आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - मनिला (1966)


 14).  आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?

 उत्तर - हेग (1946)


 १५).  इंटरपोल कुठे आहे?  

 उत्तर - लियोन पॅरिस (1923)


बंगालमधील राजकीय संस्था

🌷   बंगाभाषा प्रकाशक सभा – १८३६

🌷    Landholders Association – 1838

जमीनदारांचे हितसंरक्षण करणे

 भारतातील पहिली राजकीय संघटना 

 – याच संगठनेने सर्वप्रथम संवैधानिक प्रदर्शनाचा मार्ग अनुसरला


🌷  बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी –१८४३

–उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे


🌷  ब्रिटीश इंडियन असोसिएशन  –१८५१

–    Landholders Association व बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून


# ईस्ट इंडिया असोसिएशन १८६६ @ लंडन : दादाभाई नौरोजी


🌷  इंडियन लीग १८७५

शिशिर कुमार घोष  – उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे

·         – इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता मध्ये विलीन


🌷इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता १८७६

सुरेंद्रनाथ बानर्जी , आनंद मोहन बोस –

 उद्देश तत्कालीन राजकीय व्यवस्थे संदर्भात जनमत तयार

कलम 14

भारतीय संविधानाचा कलम 14 (Article 14) हा समानतेच्या हक्कांशी (Right to Equality) संबंधित आहे. हा कलम भारतातील सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देतो.


कलम 14 चे महत्त्वाचे मुद्दे:


समानतेचा अधिकार: भारतातील कोणत्याही व्यक्तीला (नागरिक असो वा परदेशी) कायद्याच्या आधी समान वागणूक दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला लिंग, जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही.


कायद्याचे समान संरक्षण: देशातील प्रत्येक व्यक्तीस कायद्याचे समान संरक्षण मिळेल. याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी व्यक्ती समान परिस्थितीत असेल, तेव्हा तिला समान कायद्याचे संरक्षण मिळायला हवे.


समानता आणि तर्कसंगत वर्गीकरण: 

जरी कलम 14 सर्वांसाठी समानतेचा अधिकार देतो, तरीही तर्कसंगत वर्गीकरण (Reasonable Classification) अनुमत आहे. म्हणजे, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गटांसाठी भिन्न कायदे असू शकतात, पण ते तर्कसंगत आणि न्याय्य असले पाहिजेत.

यासाठी दोन अटी पूर्ण कराव्या लागतात: 

समूहामध्ये समरसता असावी – म्हणजे, गटामध्ये असलेल्या लोकांमध्ये समान वैशिष्ट्ये असावी.

वर्गीकरणाचा उद्देश न्याय्य आणि तार्किक असावा – म्हणजे, त्यामागे वैध आणि न्याय्य कारण असावे.


कलम 14 अंतर्गत महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय:

State of West Bengal v. Anwar Ali Sarkar (1952) – यात सांगितले गेले की, कोणत्याही कायद्याने किंवा धोरणाने अवैध भेदभाव निर्माण होऊ नये.

E.P. Royappa v. State of Tamil Nadu (1974) – यात सांगितले गेले की, समानता म्हणजे केवळ भेदभावाचा अभाव नव्हे, तर याद्वारे स्वेच्छाचारी निर्णयांना आळा बसला पाहिजे.

Maneka Gandhi v. Union of India (1978) – या प्रकरणात कलम 14 चे अधिक विस्तृत अर्थ लावण्यात आले आणि याला कलम 19 आणि कलम 21 सोबत वाचले पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले.


कलम 14 चा अपवाद:

कलम 14 सर्वसामान्य नियम सांगतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही अपवाद देखील आहेत:

President आणि Governors यांना काही घटनात्मक विशेषाधिकार आहेत.

संसद आणि विधिमंडळ सदस्यांना विशिष्ट अधिकार आणि विशेष संरक्षण दिले जाते.

आरक्षण धोरणांमध्ये (SC, ST, OBC साठी) समानतेचा तत्त्व लवचिक पद्धतीने वापरला जातो.


निष्कर्ष:

कलम 14 हा भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे. तो प्रत्येक व्यक्तीस कायद्याच्या आधी समानता देतो, पण त्याच वेळी तर्कसंगत वर्गीकरणाची संकल्पना देखील मान्य करतो, जेणेकरून सामाजिक न्याय व वास्तववादी व्यवस्थापन शक्य होईल.


महत्वाच्या संस्था , अध्यक्ष , स्थापना मुख्यालय

💡 IOC - international Olympic committee 

⭐️मुख्यालय : लुझने (Lausanne) स्वित्झर्लंड

⭐️स्थापना : 23 जून 1894

⭐️अध्यक्ष : थॉमस बॅच


💡 BIMSTEC - ( Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation)

◾️मुख्यालय : ढाका बांगलादेश

◾️स्थापना : 6 जून 1997

◾️अध्यक्ष : इंद्रा मणी पांडे

◾️सदस्य : 7 ( भारत आहे)


💡 ASEAN - Association Of South East Asian Nation's

⭐️मुख्यालय : जकर्ता ( इंडोनेशिया)

⭐️स्थापना : 8 ऑगस्ट 1967

⭐️अध्यक्ष :डॉ काओ किम हॉर्न


💡 ICJ - ( international Court of Justice)

◾️मुख्यालय : हेग नेदरलँड

◾️स्थापना : 1945 ( सुरवात एप्रिल 1946)

◾️अध्यक्ष :नवाफ सलाम


💡 NATO - (North Atlantic Treaty Organization)

⭐️मुख्यालय : ब्रुसेल्स ( बेल्जियम)

⭐️स्थापना : 4 एप्रिल 1949

⭐️अध्यक्ष : जेन्स स्टोलटेंबर्ग


💡 IMF(International Monetary Fund

◾️मुख्यालय : वॉशिंग्टन डीसी अमेरिका

◾️स्थापना : 27 डिसेंबर 1945

◾️अध्यक्ष : क्रिस्टलीना जॉर्जिवा (Georgieva)


💡 ISA (International Solar Alliance)

⭐️मुख्यालय : गुरुग्राम भारत

⭐️स्थापना : 30 नोव्हेंबर 2015

⭐️अध्यक्ष :अजय माथूर


💡 ADB (Asian Development Bank)

◾️मुख्यालय : फिलिपिन्स

◾️स्थापना : 19 डिसेंबर 1966

◾️अध्यक्ष : Masatsugu Asakawa


💡 FATF ( Financial Action Task Force) 

⭐️मुख्यालय : पॅरिस ( फ्रांस)

⭐️स्थापना : 1989

⭐️अध्यक्ष : टी राजा कुमार

💡 WHO ( World Health Organisation )

◾️मुख्यालय : जीनेव्ह ( स्वित्झर्लंड)

◾️स्थापना : 7 एप्रिल 1948

◾️अध्यक्ष :टेड्रोस अधानंम

◾️सदस्य :194 देश


💡 UNICEF (United Nation's children's Fund)

⭐️मुख्यालय : न्यूयॉर्क अमेरिका

⭐️स्थापना : 11 डिसेंबर 1946

⭐️अध्यक्ष : कॅथरीन रसल


💡 SCO - (Shanghai Cooperation Organization )

◾️मुख्यालय : बीजिंग (चायना)

◾️स्थापना : 15 जून 2001

◾️अध्यक्ष : Zhang Ming

◾️सदस्य : 9 ( भारत आहे)

💡 SAARC (South Asian Association for Regional Cooperation )

⭐️स्थापना 8 डिसेंबर 1985 

⭐️मुख्यालय काठमांडू नेपाळ


💡 UNSCO (United Nations Educational Scientific and cultural Organization)

◾️मुख्यालय : पॅरिस फ्रान्स

◾️स्थापना : 16 नोव्हेंबर 1945

◾️अध्यक्ष : आंद्रे अझुले (Audrey Azouley )


💡 FIFA ( Federation International de Football Association)

⭐️मुख्यालय : झुरिच  स्विझर्लंड

⭐️स्थापना : 21 मे 1904

⭐️अध्यक्ष :गियानी अनफेंटिनो (Gainni Infantino)


💡 ICC ( international Cricket Council)

◾️ स्थापना 15 जून 1909

◾️ मुख्यालय : दुबई (UAE)

◾️ अध्यक्ष : ग्रेग बारकले (Greg Barclay)

चालू घडामोडी :- 21 & 22 मार्च 2025

◆ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


◆ जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.


◆ जागतिक जल दिन 2025 ची थीम "ग्लेशियर प्रिझर्वेशन" [Glacier Preservation.] ही आहे.


◆ पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील 100 जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे.


◆ भारत देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे.


◆ जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? [पहिला जागतिक हिमनदी दिन :- 2025]


◆ पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे.


◆ 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन ओडिशा येथे करण्यात येणार आहे.


◆ भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून 50 वर्षे झाल्यानिमित्ताने के अरुमुगम आणि एरोल डी क्रुझ यांनी March of Glory Book लिहिले आहे.


◆ नेतुम्बो नंदी नदैतावाह यांची नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.


◆ Knights Cross of the Order of डेन्मार्क सन्मान विजय शंकर यांना प्रदान करण्यात आला आहे.


◆ तेलगू अभिनेता चिरंजीवी ला UK देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे.


◆ State of Climate report 2024, WMO या संस्थेने जारी केला आहे.


◆ ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी हरीश टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)

◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे)

◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)

◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा)

◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा)

◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा)

◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा)

◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा)

◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा)

◾️राधानगरी:  लक्ष्मी सागर (कोल्हापूर )

◾️तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे)

◾️तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव)

◾️माणिक डोह : शहाजी सागर (पुणे )

◾️चांदोली : वसंत सागर ( सांगली, कोल्हापूर)

◾️उजनी : यशवंत सागर (सोलापूर)

◾️दूधगंगा : राजर्षी शाहू सागर ( कोल्हापूर)

◾️विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड)

◾️वैतरणा : मोडक सागर (ठाणे)


🟢भंडारदरा जलाशयाला अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखला जात होता

भारतीय पर्जन्याचे (पावसाचे) खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये


1. मानसूनप्रधान पर्जन्य: भारतातील प्रमुख पर्जन्य मानसूनवर अवलंबून असतो. मुख्यतः दक्षिण-पश्चिम आणि काही प्रमाणात उत्तर-पूर्व मानसून भारतात पाऊस घडवतात.


2. हंगामानुसार बदलणारा पर्जन्य: भारतात पर्जन्य मुख्यतः जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. या कालावधीत सुमारे 75% पाऊस पडतो.


3. असमान वितरण: भारतात पर्जन्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. उदा. मेघालयातील चेरापुंजी/मौसिनराम येथे सर्वाधिक पर्जन्य होतो, तर राजस्थानमधील थार वाळवंटात अतिशय कमी पावसाची नोंद होते.


4. चक्रीवादळांमुळे होणारा पाऊस: बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्रीवादळांमुळे किनारपट्टी भागांत जास्त पाऊस होतो.


5. अनियमितता: पर्जन्याचा वेळ, प्रमाण आणि कालावधी यामध्ये वर्षानुवर्षे चढ-उतार असतो. त्यामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ पडतो.


6. पर्वतीय भागांवर अधिक पर्जन्य: घाटमाथा, हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्वेकडील पर्वत रांगांमध्ये अधिक पर्जन्य होतो, कारण वाऱ्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन पाऊस पडतो.


7. दोन मुख्य पर्जन्य ऋतू:


दक्षिण-पश्चिम मानसून (जून - सप्टेंबर) – मुख्य पावसाळा

उत्तर-पूर्व मानसून (ऑक्टोबर - डिसेंबर) – विशेषतः तामिळनाडूमध्ये महत्त्वाचा

19 March 2025

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या



◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या
◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या 
◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
◾️बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत
◾️गेल्या होत्या -बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयान
◾️परत आल्या - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन सोबत
◾️अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
◾️एकूण 286 दिवस अंतराळात घालवले
◾️पृथ्वीभोवती 4576 प्रदक्षिणा पूर्ण केल्या
◾️त्यांनी आणि स्प्लॅशडाऊन होईपर्यंत 121 दशलक्ष मैल (195 दशलक्ष किलोमीटर) प्रवास केला.
◾️5 जून 2024 -सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले
◾️8 दिवसांची ही मोहीम होती
◾️एकूण 4 जण परत आले
👩‍🚀नासाचे अंतराळवीर - बुच विल्मोर
👩‍🚀रशियाचे अंतराळवीर - अलेक्झांडर गोर्बुनोव्ह 
👩‍🚀 नासाचे अंतराळवीर - निक हेग 
👩‍🚀नासा अंतराळवीर - सुनीता विल्यम्स.
.
🚀 अंतराळ संस्था  देश आणि त्यांची नावे 
◾️रशिया - Roscosmos
◾️अमेरिका - National Aeronautics and Space Administration 
◾️सौदी अरेबिया - Saudi Space Commission
◾️जपान - Japan Aerospace Exploration Agency
◾️UAE - Mohammed bin Rashid Space Centre
◾️बांगलादेश - Space Research and Remote Sensing Organization
◾️इजिप्त - Egypt Remote Sensing Center
◾️बहरीण - National Space Science Agency
◾️स्पेन - Instituto Nacional de Técnica Aeroespacial
◾️जर्मनी - German Aerospace Center
◾️चीन - China National Space Administration
◾️पाकिस्तान - Pakistan Space and Upper Atmosphere Research Commission
◾️ऑस्ट्रेलिया - National Space Program
.
🛰  International Space Station माहिती
◾️लॉन्च केले : 20 नोव्हेंबर 1998 (25 वर्षांपूर्वी)
◾️चालू कमान : सुनीता विल्यम्स यांच्याकडे होती
◾️यामध्ये 5 अंतराळ एजन्सी आहेत ज्या 15 देशांचे प्रतिनिधित्व करतात
🛰 रोसकॉसमॉस (रशिया)
🛰ESA (युरोप)
🛰JAXA (जपान)
🛰 CSA (कॅनडा)
◾️ISS फुटबॉल मैदानाच्या आकारमानात पसरलेले आहे 
◾️ पृथ्वीपासून सुमारे 250 मैल (400 किलोमीटर) परिभ्रमण करते
◾️पृथ्वीला परिभ्रमण कालावधी : 92.09 मिनिटे आहे
◾️ISS वजन : 450,000 kg
◾️लांबी : 109 मी (358 फूट)
◾️रुंदी : 73 मीटर (239 फूट)

ही खूप महत्वाची News आहे , त्यामुळं सर्वच दिलं आहे व्यवस्थित वाचा 🚀 
➖➖➖➖➖

03 March 2025

आंतरराष्ट्रीय घडामोडी

📚कोणत्या भारतीय वंशीय कलाकाराला ब्रिटनच्या टर्नर पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले?
-जसलिन कौर

📚 वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोठे होणार आहे? 
-नवीं दिल्ली

📚भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे?
-इंडोनेशिया

📚कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे?
-जॉर्जिया

📚पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
-अबुधाबी

📚जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? 
-दक्षिण सुदान

📚एच.एस.बी.सी.अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण?
-सत्या नडेला

📚 संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे?
 -दुसरी (पहिल्यांदा 2012)

📚टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहे?
-मेसाचुसेट्स इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (प्रथम स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ)

📚 वल्र्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक संपन्न झालेले दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?
-स्वित्झर्लंड

पोलिस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे...



❇️ देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
-सिक्कीम

❇️भारतात एकूण, रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
- 89

❇️कोणत्या ठिकाणी दहावा विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते?..
-पणजी (गोवा)

❇️ विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे?
-मराठी भाषा विभाग

❇️ मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
- किरण कुलकर्णी

❇️नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक कोण आहेत?
-युवराज मलिक

❇️आर्थिक पाहणी अहवाला 2024-25 नुसार देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका. शेतीवर अवलंबून आहे?
-46 टक्के

❇️ 2025 वर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग, स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे ? -33वा

मराठी व्याकरण लिहून घ्या


1) चमचम हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे 
👉अनुकरणदर्शक

2) धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो ?
👉क्रियाविशेषण

3) या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा माणसाने सदा हसमुखत राहावे ?
👉 सदा
 
4) वारा फार जोराने वाहत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
👉 क्रियाविशेषण अव्यय

5) क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार किती ?
👉 नऊ
 
6) एकदा ,दोनदा ,तीनदा , हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत ?
👉 आवृत्तीदर्शक
 
7) पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा लहान मुलांना हळुवार शाब्बासकी द्यावी ?
👉 हळुवार
 
8) वर खाली पुढे मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? 
👉 क्रियाविशेषण
 
9) कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्य दर्शक, हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?
👉 कालवाचक
 
10) क्रियाविशेषण हे क्रियापदाचे ......असते ?
👉 विशेषण

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार एकूण महानगरपालिका


✳️ एकूण प्रशासकीय विभाग = 6 ✳️
✳️ एकूण प्रादेशिक विभाग = 5 ✳️
✳️ एकूण प्राकृतिक विभाग = 3 ✳️

📌 कोकण प्रशासकीय विभाग
एकूण 9 महानगरपालिका

📌 पुणे प्रशासकीय विभाग
एकूण 6 महानगरपालिका

📌 नाशिक प्रशासकीय विभाग
एकूण 5 महानगरपालिका

📌 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग
एकूण 5 महानगरपालिका

📌 अमरावती प्रशासकीय विभाग
एकूण 2 महानगरपालिका

📌 नागपूर प्रशासकीय विभाग
एकूण 2 महानगरपालिका

✳️ कोकण प्रशासकीय विभाग
1) बृहन्मुंबई महानगरपालिका
2) नवी मुंबई महानगरपालिका
3) ठाणे महानगरपालिका
4) भिवंडी महानगरपालिका
5) कल्याण - डोंबिवली महानगरपालिका
6) उल्हासनगर महानगरपालिका
7) पनवेल महानगरपालिका
8)  वसई - विरार हानगरपालिका
9) मीरा - भयंदर महानगरपालिका

✳️ पुणे प्रशासकीय विभाग
1) पुणे महानगरपालिका
2) पिंपरी - चिंचवड महानगरपालिका
3) सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका
4) सोलापूर महानगरपालिका
5) कोल्हापूर महानगरपालिका
6) इचलकरंजी महानगरपालिका

✳️ नाशिक प्रशासकीय विभाग
1) नाशिक महानगरपालिका
2) मालेगाव महानगरपालिका
3) अहमदनगर महानगरपालिका
4) धुळे महानगरपालिका
5) जळगाव महानगरपालिका

✳️ संभाजीनगर प्रशासकीय विभाग
1) संभाजीनगर महानगरपालिका
2) नांदेड - वाघेला महानगरपालिका
3) परभणी महानगरपालिका
4) लातूर महानगरपालिका
5) जालना महानगरपालिका

✳️ अमरावती प्रशासकीय विभाग
1) अमरावती महानगरपालिका
2) अकोला महानगरपालिका

✳️ नागपूर प्रशासकीय विभाग
1) नागपूर महानगरपालिका
2) चंद्रपूर महानगरपालिका

🖌 सर्वाधिक महानगरपालिका असलेला एकमेव प्रशासकीय विभाग
कोकण विभाग = 9 महानगरपालिका

🖌 सर्वाधिक महानगरपालिका असलेला एकमेव जिल्हा
ठाणे जिल्हा..

20 February 2025

महत्वाचे इतिहास प्रश्न



१. इबादत खाना का बांधण्यात आला?
 अ. धर्मांवर चर्चा करणे
ब. राज्याच्या चर्चेसाठी
C. लोकांशी संवाद साधण्यासाठी
D. यापैकी काहीही नाही
 उत्तर: अ

 २. खालीलपैकी कोणी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला?
 अ. दयाराम साहनी
बी. राखलदास बॅनर्जी
सी. एम. एम. व्हॅट्स
D. काहीही नाही
 उत्तर: अ

 ३. कोणत्या शासकाने खऱ्या जैन भिक्षूप्रमाणे उपवास करत आपले शरीर सोडले?
 अ. बिंदुसार
बी. अशोक
सी. चंद्रगुप्त मौर्य
D. इतर
 उत्तर: क

 ४. तराईनची पहिली लढाई (इ.स. ११९१) कोणामध्ये लढली गेली?
 अ. मुहम्मद घोरी आणि भीम
बी. मुहम्मद घोरी आणि पृथ्वीराज तिसरा
सी. मुहम्मद घोरी आणि जयसिंग
डी. मुहम्मद घोरी आणि अजयपाल
 उत्तर: ब

 ५. मुघलांच्या काळात शेतीच्या स्थितीबद्दल माहितीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता आहे?
 अ. ऐन-ए-अकबरी
बी. अकबरनामा
क. मुंतखब-उल-लुबाब
डी. तारिख-ए-फरिश्ता
 उत्तर: अ

 ६. बंगालला मुघल साम्राज्यापासून वेगळे करून कोणी मुक्त केले?
 ए. मुर्शिद कुली खान
बी. सआदत खान
सी. सरफराज खान
D. इतर
 उत्तर: अ

 ७. विधवा पुनर्विवाह कायदा कधी बनवण्यात आला?
 अ. १८५३ मध्ये
१८५६ मध्ये
१८६३ मध्ये सी.
१८६५ मध्ये
 उत्तर: ब

 ८. ब्रिटिशांनी 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण कधी स्वीकारले?
 अ. १८७७ नंतर इ.स.
ब. १८३३ नंतर इ.स.
C. १८५८ नंतर
डी. १७९९ नंतर इ.स.
 उत्तर: क

 ९. खानवाची लढाई कोणत्या वर्षी झाली?
 अ. १५२५
बी. १५२६
सी.१५२७
डी. १५२८
 उत्तर: क

 १०. इंग्लंडमध्ये यादवी युद्ध किती वर्षे चालू राहिले?
 अ. चार वर्षे
ब. सात वर्षे
क. दोन वर्षे
D. दहा वर्षे
 उत्तर: ब

 ११. आर्य कोणत्या आशियातून भारतात आले?
 अ. पश्चिम आशियातून
पूर्व आशियातील बी.
मध्य आशियातील बी.
दक्षिण आशियातील डी.
 उत्तर: क

 १२. रामायण आणि महाभारत कोणत्या काळात रचले गेले?
 अ. सिंधू खोऱ्याचा काळ
द्रविड काळात बी.
C. वैदिक काळ
आर्य काळात डी.
 उत्तर: डी

 १३.दिल्ली सल्तनतच्या कोणत्या शासकाने इक्ता रद्द केला?
 अ. अलाउद्दीन खिलजी
बी. मुहम्मद तुघलक
C. फिरोजशाह तुघलक
डी. बलबन
 उत्तर: अ

 १४. गुप्त सोसायटीची स्थापना कोणी केली?
 अ. हर्षवर्धन
बी. चंद्रगुप्त
सी. समुद्रगुप्त
डी. ब्रह्मगुप्त
 उत्तर: ब

 १५. पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले?
 ए. वैगम खान आणि हेमू
बी. अकबर आणि मिर्झा हकीम
सी. अकबर आणि वैगम खान
डी. अकबर आणि राणा प्रताप
 उत्तर: अ

 १६. मुहम्मद घोरी कोणत्या ठिकाणाचा शासक होता?
 अफगाणिस्तान
ब. इराक
C. पर्शिया
डी. तुर्किए
 उत्तर: अ

 १७. मस्तानी कोणत्या शासकाची प्रेयसी होती?
 अ. वाजिराव पेशवे
बी. नाना साहेब
सी. शाहू महाराज
डी. शेरशाह
 उत्तर: अ

 १८. कोणत्या मुस्लिम शासकाने प्रथम बिहार जिंकला?
 अ. वावर
बी. खिलजी
सी. तुघलक
डी. चंगेज खान
 उत्तर: ब

 १९. मुघल काळात इंग्रजांनी प्रथम कोणत्या शहरात त्यांचे कारखाने स्थापन केले?
 अ. मद्रास
B. कलकत्ता
C. मुंबई
डी. सुरत
 उत्तर: डी

२०. ज्यानंतर मुघल युगाचा नाश झाला?
 अ. जहांगीर
बी. शाहजहान
सी. औरंगजेब
D. यापैकी काहीही नाही
 उत्तर: क

18 February 2025

चालू घडामोडी :- 16 & 17 फेब्रुवारी 2025

◆ नागपूर या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

◆ नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथुन देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

◆ यानिक सिन्नर(इटली) या जागतिक टेनिस पटू वर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेनी बंदी घातली आहे.

◆ 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर यथे होणार आहे.

◆ ब्रिक्स परिषद 2025 ब्राझील देशात होणार आहे.

◆ आयकर विधेयक 2025 चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने 31 संसदीय समितीची स्थापना केली आहे.

◆ आयकर विधेयक 2025 चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने बैजयंत जय पांडा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे.

◆ 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा हरियाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ ब्लुमबर्ग रँकिंग 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार अंबानी परिवार आहे.

◆ अंतर्राष्ट्रीय ऊर्जा एजेंसी (IEA) ने "इंडिया गैस मार्केट रिपोर्ट: आउटलुक टू 2030" प्रकाशित केला आहे.

◆ NTPC कंपनीला Forword Sustainability Award 2025 प्रदान करण्यात आला आहे.

◆ पश्चिम बंगाल सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे.

◆ जर्मनी मध्ये आयोजित चौथी मनी फॉर टेरर (NMFT) सम्मेलन मध्ये भारतातर्फे नित्यानंद राय उपस्थित होते.

◆ आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे.

◆ आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते करण्यात आले.

◆ 9व्या आशियाई शितकालीन स्पर्धा 2025 मध्ये चीन देश प्रथम स्थानावर आहे.

◆ आदि महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे.

◆ आयुष्मान भारत वय वंदन योजना पाँडिचेरी येथे सुरू करण्यात आली आहे.

◆ 24व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन जम्मू येथे झाले आहे.

◆ 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025 चे आयोजन ओमान येथे करण्यात आले आहे.

17 February 2025

ठळक बातम्या 17 फेब्रुवारी 2025.



1.आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा.

-चीनमधील हेइलोंगजियांग प्रांतातील हार्बिन येथे ९व्या आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात आले.

- 34 देशांतील खेळाडूंनी यात सहभाग घेतला.

- 64 स्पर्धांचा समावेश होता. अधिकृत शुभंकर, “बिनबिन” आणि “निनी” (वाघ), आणि “हिवाळ्याचे स्वप्न, आशियातील प्रेम” हे ब्रीदवाक्य हिवाळी खेळांसाठी एकता आणि उत्कटतेचे प्रतीक होते.

-नवीन सहभागी 
सौदी अरेबियाने अल्पाइन स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगमध्ये पदार्पण केले.
कंबोडियाने प्रथमच क्रॉस-कंट्री स्कीइंगमध्ये भाग घेतला.

- पहिल्यांदाच पदक विजेते 
तैवान, थायलंड आणि फिलीपिन्सने त्यांचे पहिलेच आशियाई हिवाळी क्रीडा पदके जिंकली.

- अव्वल चीन - ८५ पदके (३२ सुवर्ण, २७ रौप्य, २६ कांस्य)

- भारताची कामगिरी 
पदके नाहीत, पण जोरदार सहभाग (आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ: ५९ खेळाडू)

-पुढील होस्ट 
सौदी अरेबिया (NEOM २०२९) - पहिले पश्चिम आशियाई यजमान.

2. नवी दिल्लीत राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 'आदी महोत्सव' चे उद्घाटन.

-१६ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते.

3.  TRUST उपक्रम

- भारत आणि अमेरिकेने महत्त्वाच्या खनिजे, औषधे आणि प्रगत साहित्यांसाठी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी.

- ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी (TRUST) हा एक द्विपक्षीय करार आहे जो महत्वाच्या खनिजे, औषधनिर्माण आणि प्रगत साहित्यांमध्ये सहकार्य वाढवतो .

4. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी)


- संदर्भ: राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने ( NSDC ) भारतात कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ५० भविष्यातील कौशल्य केंद्रे (FSCs) आणि १० NSDC आंतरराष्ट्रीय अकादमी स्थापन करण्याची योजना जाहीर केली.

- कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) अंतर्गत काम करते .

- कंपनी कायदा, १९५६ च्या कलम २५ (आता २०१३ कायद्याअंतर्गत कलम ८) अंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल म्हणून ३१ जुलै २००८ रोजी स्थापना झाली .

- एनएसडीसीचे उद्दिष्ट:
उद्योग-संबंधित प्रशिक्षण देऊन आणि कामगारांची तयारी वाढवून कौशल्यातील तफावत भरून काढणे .
निधी आणि सवलतीच्या दरात कर्ज देऊन उद्योग, स्टार्ट-अप आणि प्रशिक्षण संस्थांना पाठिंबा देणे.


5. जेसी बोस ग्रँट (JBG)

अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ( ANRF ) ने अत्याधुनिक संशोधनात प्रगती करण्यासाठी वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना पाठिंबा देण्यासाठी जेसी बोस ग्रँट (JBG) सुरू केले आहे.

- स्थापन:
भारतातील वैज्ञानिक संशोधन आणि नवोपक्रमाचे मार्गदर्शन करणारी सर्वोच्च संस्था, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) द्वारे सुरू .

-ध्येय:
आघाडीच्या शास्त्रज्ञांना आणि अभियंत्यांना बाह्य निधी देऊन उच्च-गुणवत्तेच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे .