25 May 2025

गोलमेज परिषद बद्दल माहिती

गोलमेज परिषद बद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

साबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.
6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पोलीस भरती विशेष.... परश्न मंजुषा



Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖

संयुक्त पूर्व परीक्षा

◾️गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

A)  1992

B) 1993

C) 1994✅

D) 1995


◾️कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?

A) भारत-चीन

B) भारत-बांगलादेश

C) भारत-पाकीस्तान✅

D) भारत-नेपाळ


◾️अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

A) 11 सप्टेंबर 2001✅

B) 12 सप्टेंबर 2001

C) 25 सप्टेंबर 2001

D) 26 सप्टेंबर 2001


◾️भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे केली ?

A) महाराष्ट्र

B) गुजरात

C) मध्यप्रदेश

D) राजस्थान✅


◾️संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?

A) 10 जून

B) 5 जून✅

C) 15 जून

D) 20 जून


◾️1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?

A) ब्राझील ✅

B)  जपान

C) न्यूझीलँड

D) चीन


◾️भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारल्या गेली ?

A)  26 नोंव्हें. 1949✅

B) 26 डिसें. 1949

C)  26 जाने. 1949

D) 26 जाने. 1950


◾️__________ हे महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.

A) सातारा

B) कोल्हापूर✅

C)  पूणे

D) अमरावती


◾️_________ मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

A) दूध

B) अंडी

C) हिरव्या पालेभाज्या✅

D) द्विदल धान्ये


◾️खालीलपैकी “हिंदू' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A) आनंद यादव

B) नरेंद्र जाधव

C) मोहन धारीया

D) भालचंद्र नेमाडे✅


◾️“आगाखान कप ______ खेळाशी संबंधीत आहे.

A) हॉकी✅

B) फुटबॉल

C) क्रिकेट

D)  गोल्फ


◾️कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते ?

A)  समाजवादी

B) भांडवलशाही

C)  साम्यवादी

D) मिश्र✅


◾️भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

A)  भारताचे राष्ट्रपती

B) पंतप्रधान✅

C)  भारताचे उपराष्ट्रपती

D) वित्त मंत्री


◾️घाउक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतींचा विचार केला जातो ?

अ]  प्राथमिक वस्तू

ब]  इंधन

क] उत्पादित वस्तू

पर्यायी उत्तरे

A) फक्त अ आणि क

B)  फक्त अ आणि ब

C) फक्त ब

D)  वरील सर्व✅


◾️पी.डी. ओझा (1960-61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता ?

A) प्रति व्यक्ती, प्रति महिना, मिळणारे उत्पन्न

B)  प्रति व्यक्ती, प्रति महिना, उपभोग खर्च✅

C)  वरील दोन्ही

D)  यापैकी नाही


◾️सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ?

A) महसूल-स्थुल देशांतर्गत उत्पादन प्रमाण

B)  सार्वजनिक गुंतवणूक-स्थुल देशांतर्गत उत्पादन प्रमाण

C)  वरील दोन्ही✅

D)  यापैकी नाही


◾️योजना काळतील, 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ]  देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले.

ब]  आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान, तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला.

क] दारिद्रय व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले.

ड] उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :

A)  ब, क आणि ड

B) ब आणि क

C) अ आणि ब✅

D)  क आणि ड


◾️खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही ?

A) अतिगरिबी आणि भूख यांचे उच्चाटन

B) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता

C)  बालमृत्यूदर कमी करणे

D) कृषी शाश्वतता साध्य करणे✅

Basic Concepts of Economics :

🛑दारिद्र्य 🛑

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



🔶कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




🛑बेरोजगारी🛑

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



🔶बेरोजगारीचे प्रकार

१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


दारिद्र्य

 दारिद्र्य पाहता येते मात्र  दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही.  गरिबीची व्याख्या ही तत्कालीन परिस्थिती व देशाचा विकास यावर आधारित प्रत्येक देशानुसार किंवा अर्थ व्यवस्थेनुसार वेगवेगळी असू शकते. म्हणून भारतातील दारिद्र्य  आणि दारिद्र्य विषयक समित्या यामध्ये विविधता आढळून येते. या सर्व समितीचा अभ्यास आपण पाहणार आहोत.


दारिद्र्य संकल्पना सविस्तर पाहणार आहोत. मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य असे म्हणता येईल. 


मानवी गरजा या सतत वाढणाऱ्या व अमर्यादित असतात. मात्र काही गरजा या मानवी जीवनासाठी आवश्यक ठरतात. त्या मूलभूत गरजा शिवाय मानवी जीवन अशक्य ठरते. अशा मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते.  अशा मानवी मूलभूत व अत्यावश्यक गरजा भागवणे देखील या लोक समूहाला अशक्य ठरते. अशा लोकांना आपण दारिद्र्य या संकल्पने अंतर्गत घेऊ शकतो.दारिद्र्याची संकल्पना सापेक्ष व निरपेक्ष अशा पद्धतीने मांडता येते –

1)  सापेक्ष दारिद्र्य –   देशातील उच्चतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्याची संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात.


2) निरपेक्ष दारिद्र्य –  दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला दारिद्र्या खालील जनता असे समजले जाते. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्यरेषा असे म्हणतात.


दारिद्र्य रेषा –    

दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्यरेषा(Poverty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो. दारिद्र्य रेषा उपभोग खर्चाच्या आधारावरती ठरवली जाते. दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्ती मागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यूनस्तर निश्चित केला जातो. त्याला मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च (Monthly Per Capita Consumption Expenditure) म्हणून संबोधले जाते.

                या खर्चापेक्षा कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हटले जाते. तर त्या पेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीला किंवा कुटुंबांना दारिद्र्यरेषेवरील म्हणून संबोधले जाते.               


मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या घरगुती उपभोग सर्वेक्षण आकडेवारी चा वापर केला जातो. एन. एस. एस. ओ. मात्र अशी आकडेवारी काढण्यासाठी रिकॉल पिरीयड चा वापर करते. 1. यूआरपी  2. एमआरपी आणि

3. एम एम आर पी.


युनिफॉर्म रिकॉल पिरीयड (Uniform Recall Period: URP) – सर्व उपभोग्य वस्तूंचा काहीच दिवसांच्या कालावधीतील रिकॉल रेफरन्स या ठिकाणी घेतला जातो.


मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Mixed Recall Period: MRP) – पाच प्रकारच्या अधून-मधून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी एका वर्षाच्या कालावधीतील रिकॉल लक्षात घेतला जातो.


मॉडिफाइड मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Modified Mixed Recall Period: MMRP) – यामध्ये सात दिवसाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू , 30 दिवसांच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू आणि एका वर्षाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू अशा सर्व वस्तूंचा विचार या प्रकारात केला जातो.


दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील प्रक्रिया आवश्यक ठरते


1) अत्यावश्यक वस्तू सेवांचा एक गट  निश्चित करणे.

2) अशा वस्तू व सेवांच्या उपभोगासाठी एक महिन्यासाठी आवश्यक असलेला एमपीसीइ(Monthly Per Capita Consumption Expenditure) निश्चित करणे. 

3) MPCE म्हणजे दारीद्र्य रेषा होय. अशा तीन दारिद्र्य रेषा केल्या जातात. अखिल भारतीय दारिद्र्य रेषा, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य  रेषा आणि राष्ट्रीय शहरी दारिद्र्य  रेषा यावरून दारिद्र्याचे प्रमाण ठरवले जाते.

4) राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून राज्यासाठी ग्रामीण व शहरी असा विभक्त दारिद्र्य रेषा प्रमाण ठरवणे.

दारिद्र्य समित्या

भारतातील दारिद्र्याच्या संदर्भात विविध समित्यांनी आपले विविध पद्धतींनी आणि आपल्या विविध प्रकारे त्यांनी दारिद्र्याचे मोजमाप केले आहे.  याचा आढावा आपल्याला पुढील प्रकारे घेता येईल.


1)   पी. डी. ओझा समिती – 

                    या समितीने 2250 कॅलरी प्रतिदिन प्रतिव्यक्ती हा निकष वापरून दारिद्र्याचे प्रमाण मोजले. 1960 – 61 मध्ये ग्रामीण भागात दहा ते अकरा रुपये व शहरी भागात 15 ते 18 रुपये मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवून दारिद्र्याचे प्रमाण मोजले आणि ते ग्रामीण भागात 51.6 टक्के तर शहरी भागात 7.6 टक्के आढळले. एकूण दारिद्र हे 44 टक्के होते.


2) अलघ समिती –

                          सर्वप्रथम नियोजन आयोगाने जुलै 1977 मध्ये वाय के अलघ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यांनी आपला अहवाल 1979 मध्ये सादर केला. या कृती दलाने दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली. या टोपलीत अन्नघटक बसवला. किमान दोन वेळचे अन्न मिळवू न शकणारा म्हणजे ही टोपली भरू न शकणारा गरीब समजावा. 

                            ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागातील व्यक्तींसाठी 2100 कॅलरी देईल इतके अन्न या समितीने गृहीत धरले. 2400 कॅलरी रोज मिळवण्यासाठी 1.64 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे महिन्याला 49.09 रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च करू शकणार गट म्हणजे दारिद्र्यरेषेवरील आणि हा खर्च करू न शकणारे घटक म्हणजे दारिद्र्यरेषेखालील असे या समितीने सुचवले.


3) डी टी लकडावाला समिती –

                                      1990 मध्ये डी टी लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेली. यांनी 1993 मध्ये आपला अहवाल मांडला. या अहवालाचा स्वीकार भारत सरकारने 1997 पासून केला. या समितीने प्रत्येक राज्यासाठी शहरी व ग्रामीण दारिद्र्य रेषा निश्चित केली. लाकडावाला समितीने एम पी सी इ ने मोजमाप यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरीयड चा वापर करून केला होता.


4) सुरेश तेंडुलकर समिती –

                            दारिद्र्य मोजणीची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी नियोजन आयोगाने 2009 मध्ये सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना केली.या समितीने दारिद्र्याची रेषा मोजण्यासाठी कॅलरी या निकषाचा वापर बंद करण्याची शिफारस केली. कारण समितीच्या मते कॅलरी, उपभोग व पोषण यांच्यामध्ये कमी परस्परसंबंध आहे.                       


या गटाने एम आर पी उपभोगा वर आधारित दारिद्र्य रेषा चा वापर केला. तेंडुलकर समितीने ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा मांडण्याच्या प्रकाराचा त्याग केला व एकच राष्ट्रीय दारिद्र्यरेषा मांडली. या गटाने 2009 – 10 साठी दारिद्र्य रेषा दारिद्र्याच्या प्रमाणाचे मोजमाप केले. तेंडुलकर गटाने 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 466.68 रुपये तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली.


                           याच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.5 टक्के तर शहरी भागात 25.7 टक्के इतके असल्याचे निश्चित केले.

              तेंडुलकर समितीने 2009 – 10 साठी ग्रामीण भागासाठी 673 रुपये तर शहरी भागासाठी 860 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली या दारिद्र्यरेषेच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे व्यक्त केले. एकूण दारिद्र्य 29.7 टक्के तर ग्रामीण भागात 33.8 टक्के आणि शहरी भागात 20.9 टक्के इतके दारिद्र्य असल्याचे सांगितले.


5) सी रंगराजन समिती चे मोजमाप –

                                          2012 मध्ये रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गटाची स्थापना केली या गटामध्ये महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता हे अर्थतज्ञ सदस्य होते. रंगराजन समितीने तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून लकडावाला पद्धतीचाच स्वीकार करण्याची शिफारस केली. म्हणजे अन्न व इतर वस्तू व सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस त्यांनी केली.                                 


रंगराजन समितीने कॅलरी उपभोगाचा निकष ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी प्रति व्यक्ती प्रति दिन इतका तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन इतका गृहीत धरला. रंगराजन समितीच्या मोजमापानुसार 2011 – 12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5 टक्के ग्रामीण भागातील दारिद्रयाचे प्रमाण 30.9 टक्के तर शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण 26.4 टक्के असे व्यक्त केले.


              रंगराजन समितीने गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असणारी पाच राज्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत –

उत्तर प्रदेश (809 लाख), बिहार (438 लाख), मध्य प्रदेश (328 लाख), पश्चिम बंगाल (275 लाख),महाराष्ट्र (228 लाख)             


दारिद्र्याच्या प्रमाणानुसार सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण असलेली पाच राज्य पुढीलप्रमाणे सांगितली –

छत्तीसगड(48%), मणिपूर (47.7%), ओडिशा (46%), मध्य प्रदेश (44%) आणि झारखंड (42%)

रंगराजन समितीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण 20 टक्के होते.

परश्न मंजुषा


Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3  २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1  २००७
2  २००४
3  २००५√√√√√√
4  २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1  कामगारांची वाढती संख्या
2  अयोग्य तंत्रज्ञान
3  प्रभावी मागणीची     
कमतरता
4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1  १९४८-४९
2  १९३१-३२√√√√
3  १९११-१२
4  १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1   चलन निश्चलीकरन
2   रुपयाचे अवमूल्यन√√√√
3   १ व २  दोन्ही घडले
4  १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1   बँकदर
2  रोख राखीव प्रमाण
3  वैधानिक रोखता प्रमाण
4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1  "से" चा बाजार विषयक नियम
2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3  एंजल चा नियम√√√√√
4  फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  दरडोई उत्पन्न
4  किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1   अ आणि ब  √√√√√
2   ब आणि क
3   क आणि ड
4  अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1  चीन -भारत युध्द
2  भारत पाकिस्तान संघर्ष
3  आर्थिक मंदी
4  राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1  मुद्रा अवपात
2  मुद्रा संस्फीती√√√√√
3  स्टगफ्लेशन
4  स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1  यु एस ए √√√√√√ 
2  यु के 
3  चीन 
4  सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब  मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड  रिझर्व्ह बँक
1  अ आणि क
2  ब आणि  ड√√√√√√
3  ब आणि  क
4  क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  परकीय चलन साठा
4  किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1   हिल्टन यंग आयोग
2   चेंबर्लिन आयोग
3   फौलर समिती
4   मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2  मद्रास फर्टिलायझर ली.
3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4  वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1  १९४६
2  १९३८√√√√√
3  १९२९
4  १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2  नवीन चलन निर्मिती
3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4  जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1  रोख
2  बहुआयामी
3  शून्याधारीत√√√√√
4  यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1  पुरोगामी
2  न्याय्य
3  प्रतिगामी√√√√√√
4  प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.23 GST विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रहित (non NDA) पहिले राज्य..... हे होते.
1  बिहार√√√√
2  केरळ
3  तामिळनाडू
4  तेलंगणा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.24  रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भरतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असे?
1  इंपिरियल बँक
2  बँक ऑफ बंगाल
3  बँक ऑफ मद्रास
4  ब्रिटिश भारत सरकार√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.25  ....... हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी आहेत.
1  CAG
2. CGA√√√√√
3.  वित्त सचिव
4   अर्थमंत्री

राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत.


🎯 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत

🎯 बाजारभावला मोजले जाते

🎯 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर

🎯 परत्यक्ष पद्धत आहे


❄️ उत्पन्न पद्धत

🎯 घटक किंमती ला मोजले जाते

🎯 सवा क्षेत्र साठी वापर

🎯 अप्रत्यक्ष पद्धत आहे


❄️खर्च पद्धत

🎯 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी

🎯 गरामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते

इंग्रजीतील 100 समानार्थी शब्द (Synonyms) आणि त्यांचे मराठीत अर्थ खाली दिले आहेत:

1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior)

 1. Brave – Courageous (शूर)

 2. Honest – Truthful (प्रामाणिक)

 3. Happy – Joyful (आनंदी)

 4. Sad – Unhappy (दु:खी)

 5. Angry – Furious (रागीट)

 6. Lazy – Idle (आळशी)

 7. Smart – Intelligent (हुशार)

 8. Kind – Generous (दयाळू)

 9. Rude – Impolite (उद्धट)

 10. Funny – Humorous (विनोदी)


2️⃣ शरीर आणि आरोग्य (Body & Health)

 11. Weak – Feeble (अशक्त)

 12. Strong – Powerful (शक्तिशाली)

 13. Fat – Obese (लठ्ठ)

 14. Thin – Slim (बारीक)

 15. Healthy – Fit (तंदुरुस्त)

 16. Sick – Ill (आजारी)

 17. Tired – Exhausted (थकल्यासारखा)

 18. Energetic – Active (ऊर्जावान)

 19. Beautiful – Attractive (सुंदर)

 20. Ugly – Unattractive (कुरूप)


3️⃣ ज्ञान आणि शिक्षण (Knowledge & Learning)

 21. Wise – Knowledgeable (ज्ञानी)

 22. Dumb – Stupid (मूर्ख)

 23. Fast learner – Quick-witted (चटकन शिकणारा)

 24. Slow – Dull (मंदबुद्धी)

 25. Hardworking – Diligent (कष्टाळू)

 26. Careless – Reckless (निष्काळजी)

 27. Genius – Brilliant (प्रतिभाशाली)

 28. Confused – Puzzled (गोंधळलेला)

 29. Focused – Attentive (लक्ष केंद्रीत)

 30. Forgetful – Absent-minded (विसराळू)


4️⃣ वेळ व गती (Time & Speed)

 31. Fast – Quick (वेगवान)

 32. Slow – Sluggish (हळू)

 33. Early – Prompt (लवकर)

 34. Late – Delayed (उशिरा)

 35. Sudden – Abrupt (अचानक)

 36. Temporary – Short-term (तात्पुरता)

 37. Permanent – Everlasting (शाश्वत)

 38. Ancient – Old (प्राचीन)

 39. Modern – Contemporary (आधुनिक)

 40. Frequent – Repeated (वारंवार)


5️⃣ निसर्ग आणि वातावरण (Nature & Environment)

 41. Hot – Warm (गरम)

 42. Cold – Chilly (थंड)

 43. Rainy – Wet (पावसाळी)

 44. Dry – Arid (कोरडे)

 45. Stormy – Windy (वादळी)

 46. Sunny – Bright (सूर्यप्रकाशी)

 47. Foggy – Misty (धुकट)

 48. Greenery – Verdure (हिरवाई)

 49. Polluted – Contaminated (प्रदूषित)

 50. Pure – Clean (स्वच्छ)


6️⃣ पदार्थ आणि अन्न (Food & Substances)

 51. Tasty – Delicious (चवदार)

 52. Bland – Tasteless (चव नसलेला)

 53. Sweet – Sugary (गोड)

 54. Sour – Tangy (आंबट)

 55. Spicy – Hot (तिखट)

 56. Fresh – New (ताजे)

 57. Stale – Spoiled (शिळे)

 58. Hard – Solid (कठीण)

 59. Soft – Tender (मऊ)

 60. Cold drink – Chilled beverage (थंड पेय)


7️⃣ समाज आणि लोक (Society & People)

 61. Leader – Chief (नेता)

 62. Follower – Disciple (अनुयायी)

 63. Rich – Wealthy (श्रीमंत)

 64. Poor – Needy (गरीब)

 65. Honest – Trustworthy (प्रामाणिक)

 66. Liar – Deceiver (खोटारडा)

 67. Friendly – Sociable (मैत्रीपूर्ण)

 68. Selfish – Greedy (स्वार्थी)

 69. Generous – Benevolent (उदार)

 70. Cruel – Harsh (निर्दयी)


8️⃣ भावना आणि अनुभव (Emotions & Feelings)

 71. Excited – Thrilled (उत्साही)

 72. Nervous – Anxious (घाबरलेला)

 73. Fear – Terror (भीती)

 74. Love – Affection (प्रेम)

 75. Hate – Dislike (द्वेष)

 76. Surprised – Amazed (आश्चर्यचकित)

 77. Bored – Uninterested (कंटाळलेला)

 78. Satisfied – Content (समाधानी)

 79. Jealous – Envious (मत्सरी)

 80. Proud – Dignified (गर्विष्ठ)


9️⃣ हालचाल आणि कृती (Movement & Action)

 81. Run – Sprint (धावणे)

 82. Walk – Stroll (चालणे)

 83. Jump – Leap (उडी मारणे)

 84. Sit – Rest (बसणे)

 85. Stand – Rise (उभे राहणे)

 86. Throw – Toss (फेकणे)

 87. Catch – Grab (पकडणे)

 88. Push – Shove (ढकलणे)

 89. Pull – Drag (ओढणे)

 90. Lift – Raise (उचलणे)


🔟 विविध (Miscellaneous)

 91. Happy – Cheerful (आनंदी)

 92. Dangerous – Risky (धोकादायक)

 93. Expensive – Costly (महाग)

 94. Cheap – Affordable (स्वस्त)

 95. Strong – Mighty (बलवान)

 96. Weak – Fragile (अशक्त)

 97. Neat – Tidy (स्वच्छ)

 98. Messy – Cluttered (अस्वच्छ)

 99. Deep – Profound (गहिरे)

 100. Shallow – Superficial (उथळ)

राज्यसेवा पुर्व मधील Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?


राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.


🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.


❇️ गरिबी व बेरोजगारी -


यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.


❇️ लोकसंख्या-


यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.


❇️ 3.शाश्वत विकास -


या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.


❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -


यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या  लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.


❇️ 5. समावेशन -


यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना  चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.


❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -


यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.


🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.


एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.


येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेकरिता अर्थव्यवस्था महत्वाचे मुद्दे

⚠️ 👇👇👇 हे करा 10-12 मार्क्स हमखास येतील.


♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणी :-

♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पध्दती :-

➡️ उत्पाद पद्धत ,उत्पन्न पद्धत  खर्च पद्धत 


♦️राष्ट्रीय उत्पन्न मोजणीशी संबंधित संकल्पना :-

➡️ GDP GNP NNP NDP


♦️GDP मोजमाप पद्धती :-

➡️स्थिर ,चालू किंमत, घटक किंमत, बाजारमूल्य


♦️आधारभूत वर्ष (समिती) :- 

➡️2011-12

➡️2017-18


♦️GREEN GDP ,GNH, PCI ,PPP


♦️CURRENT:-

➡️GDP GROWTH RATE, GDP मधील क्षेत्रनिहाय वाटा 

➡️PRIMARY SECOnDARY TERTIARY


⭕️✔️चलनवाढ :-

➡️ संकल्पना .

➡️ तेजीचे चक्र व मंदीचे चक्र.


♦️इतर संकल्पना :- 

➡️ delation disinflation ,reflation stagflation .


♦️चलनवाढीचे प्रकार :-

➡️ दरानुसार ,कारणांनुसार 


♦️चलनवाढीचे मोजमापसाठी निर्देशांक :-

➡️WPI ,CPI, GDP DEFLECTOR, NHB


♦️चलनवाढीचे परिणाम:- 

चांगले , वाईट ,शुन्य


♦️चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याचे उपाय(3-5%) :- 

➡️ मौद्रीक उपाय .

➡️ राजकोशीय उपाय .

➡️ प्रत्यक्ष उपाय.

➡️ Angels law

➡️ Say चा नियम

➡️ जिफेन वस्तू

➡️ व्यापरचक्र

➡️ फिलिप्स curve

➡️ पैशाचे प्रकार :-m0,m1 m2,m3

➡️ पैसा गुणक 

पैशाचा संख्यात्मक सिद्धांत



⭕️✔️पैसा व चलन:-

➡️ पैसे व चलन मधील फरक

➡️ पैशाची कार्य :-SUMS

➡️ नोटा व नाणी उत्क्रांती :-कायदे

➡️SPMCIL .


♦️कागदी चलनाचे प्रकार :- 

➡️ परिवर्तनीय अपरिवर्तनीय


⭕️✔️Rbi व मौद्रीक धोरण :-

➡️ RBI ची उत्क्रांती .

➡️RBI ची रचना.

➡️पतनियंत्रण ची साधने :- 

➡️संख्यात्मक .

➡️गुणात्मक.

➡️अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा :-


♦️ बँकांचे वर्गीकरणलक्ष्य :-40%.


♦️उत्क्रांती.


♦️भांडवल पर्याप्तता.


♦️✔️सार्वजनिक वित्त :

➡️ अर्थसंकल्प ची सुरुवात आणी उत्क्रांती.

➡️ राजकोष धोरण :- उद्दिष्ट

➡️ अर्थसंकल्प रचना

➡️ भारत शासनाचे निधी :- 3 

➡️ वित्तमंत्रालाय रचना

➡️ अर्थसंकल्प निर्मिती ची प्रक्रिया

➡️ अनुदानाचे प्रकार 

➡️ तुटीचे प्रकार

➡️ अर्थसंकल्प प्रकार

➡️ प्रारूपे :-GENDER BUDGET

➡️ संसदीय समित्या

➡️ CAG ,CGA



⭕️✔️कररचना:-

➡️ करकसोट्या.

➡️ करांचे प्रकार

➡️लाफर CURVe

➡️भारतातील महत्वाचे प्रकार


♦️वित्त आयोग :-

➡️ 13,14,15

➡️ बाकी अध्यक्ष


⭕️ उद्योग:-

♦️ IIP

♦️गाभा उद्योग :- 8

♦️ओद्योगिक धोरण:- 1948 ,1956,1969,1973,1977,1991

♦️राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011

♦️Make in india


⭕️✔️ आर्थिक सुधारणा:-

➡️Lpg  fullform

➡️IMF ,WTO, WORLD BANK (BASIC ONLY)


⭕️✔️परकीय व्यापार:-

♦️अनुकूल व प्रतिकूल वर्ष

♦️भारतीय आयात निर्यातपरिवर्तनीय व अवमूल्यन 

♦️EPZ, SEZ

♦️परकीय गुंतवणूक:-

FDI 


⭕️✔️ दारिद्र्य व बेरोजगार:-

♦️समित्या व आकडेवारी

♦️पंचवार्षिक योजना

♦️योजना आयोग

♦️NDC 

♦️NITI आयोग


♦️⭕️ चालू घडामोडी


⭕️✔️पायाभूत सुविधा


➡️ कृषिशी संबंधित :-

➡️ आकडेवारी व योजना 

➡️ सामाजिक योजना



👆👆👆👆वरील दिलेले सर्व मुद्दे जरी cover केले तरी येणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षा मध्ये 10-12 मार्क्स हमखास 100% शाश्वती ने मिळतील नसतील केले तर नुसते बघू नका करून घ्या😍😍



राज्यसेवा परीक्षा नियोजनअभ्यासासाठी टिप्स-

-- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- चालू घडामोडी या विषयासाठी मागील जानेवारी 2023 पासून चालू घडामोडी चा अभ्यास करा

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 
पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2023 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो.


प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 


स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय 


उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.


यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?


खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.


मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.


* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.


* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. 

🔶 प्रचिन भारताचा इतिहास- र स शर्मा 

🔶 मध्यकालीन भारत- सतीश चंद्र 

🔶 जागाच इतिहास- जान माधुर के सागर आनुवाद मराठी 

🔶 सामाजिक समस्या- राम आहूजा हिंदी में 

🔶 Ethics GS- माधवी कवि, Unique Academy 

🔶 आंतरिक सुरक्षा- Tata magro हिंदी में 

🔶 आंतराठिय संबंध- डाँ शोलौद देवळणकर 

🔷 NCERT Geography, 6,7,9,11 

🔷 NCERT History- 6.7,12

🔷 आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, 

🔷 स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, 

🔷 भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, 

🔷 भारताचा भूगोल- माजिद हुसन, 

🔷 जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, 

🔷 विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच 


अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.


* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.


नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?


नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 


👉 योग्य मार्गदर्शकाची आवश्यक आहे,

राज्यसेवा पूर्व परीक्षा : विस्तृत अभ्यासक्रम

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी (सी-सॅट) असे 2 पेपर असतात. त्यांचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरूपात पाहुयात.

पेपर 1 : सामान्य अध्ययन ( गुण: 200, वेळ : 2 तास )

▪️ इतिहास : यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास अवगत असणे गरजेचे आहे.

▪️ भगोल : भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाबरोबरच जगाच्या भूगोलाचा अभ्यास. त्यातही प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर, लोकसंख्या इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहे.

▪️ भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया : यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांचे हक्क इ. मुद्दे, भारतीय तसेच महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करावा लागणार आहे.

▪️ आर्थिक आणि सामाजिक विकास : शाश्वत विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, समावेशक विकास इ. मुद्दे यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भातही हा घटक अभ्यासावा लागणार.

▪️ पर्यावरण : पर्यावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण मुद्दे

▪️ सामान्य विज्ञान : सामान्य विज्ञानासाठी आठवी ते बारावी विज्ञानाची पुस्तके वाचावीत.

👉 पपर 2 :  नागरी सेवा कल चाचणी (सी-सॅट) ( गुण: 200, वेळ: 2 तास )

▪️ इटरपर्सनल स्किल्स : सरकारमध्ये उच्चपदावर काम करताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी इत्यादींशी नेहमी संपर्क येत असतो. त्यामुळे इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्सविषयी माहिती असणे आवश्यक असते

▪️ तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा / पृथ:करण क्षमता : तर्कशुद्ध विचार किंवा युक्तिवाद तसेच एखाद्या गोष्टींची मीमांसा व अनुमान काढण्याची क्षमता यामध्ये तपासली जाते.

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल : प्रशासकीय अधिकारी म्हणून योग्य निर्णयक्षमता तसेच विविध प्रश्नांना हाताळण्याची क्षमता या घटकांमधून पडताळली जाते.

▪️ सामान्य बुद्धिमापन क्षमता : यामध्ये काळ, काम, वेग, गुणोत्तर, कोडिंग, डिकोडिंग, प्रोबॅबिलिटी, घड्याळ, कॅलेंडर, दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.

▪️ बसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन : यामध्ये आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं, लसावि / मसाविवर आधारित प्रश्न, सरासरी, वयांचे गुणोत्तर नफा-तोटा, क्षेत्रफळ, आकारमान, प्रोबॅबिलिटी, आकृती, ग्राफ, टेबल्स यांवर आधारित प्रश्न असतात.

▪️ इग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता : उताऱ्यावर प्रश्न, पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं, वाक्यरचना ओळखणं, योग्य शब्दाची निवड करणं, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.

पर्यावरण विषयक महत्वाच्या परिषदा

🌀 रामसर परिषद = 1971रामसर-इराण 

 👉खारफुटीचे  संवर्धन व व्यवस्थापण करण्यासाठी. Effective1975


🌀 सटोकहोम डिक्लेरेशन = 1972 पर्यावरण संवर्धनासाठी 

👉याद्वारे UNEP ची स्थापना करण्यात आली


🌀मॉट्रीयल प्रोटोकॉल=1987 मॉन्ट्रीयल-कॅनडा

👉ओजोन च्या संवर्धनासाठी. Effective 1989


🌀बसल करार= 1989 बेसल-स्वित्झर्लंड

👉 घातक कचरा संबंधी. Effective1992


🌀 CBD जैवविविधता करार= 1992 रिओ

👉 जवविविधता संवर्धन, याअंतर्गत दोन प्रोटोकॉल आहेत 1)कर्ताजिना 2000 2) नागोया 2010. Effective 1993


🌀 कयोटो प्रोटोकॉल = 1997 क्योटो-जपान

👉 जागतिक तापमानवाढ रोखणे त्यासाठी ग्रीनहाऊस कमी करणे. Effective 2005


🌀रॉटरडॅम परिषद= 1998 रॉटरडॅम-नेदरलँड

👉हानिकारक रसायनांबाबत. Effective 2004


🌀कार्टजिना प्रोटोकॉल = 2000 मोन्ट्रीयल-कॅनडा 

👉GM बायोसेफ्टी च्या नियमनासाठी. Effective 2003


🌀सटॉकहोम परिषद = 2001 स्तोमहोम -स्वीडन

👉दिर्घस्तायी जैविक प्रदूषक नियमन बाबत. Effective 2004


🌀 मीनामाटा करार=2013 कुमोमाटा-जपान

👉 मानवी पर्यावरणास मर्क्युरी पासून संरक्षणासाठी. Effective 2017

 

🌀 परिस करार= 2015 पॅरिस- फ्रान्स

👉 जागतिक तापमानवाढ कमी करणे. Effective 04 नोव्हेंबर 2016

भारतातील जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन विषयक कायदे व नियम

1) जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन -: 1974

2) पर्यावरण संरक्षण अर्धीनियम -: 1986

3)हवा प्रदूषण प्रतिबंध व नियम -: 1981

4) जैवविविधता अध्धीनियम -: 2002

5)भारतीय वन कायदा -: 1927

6.)वन संवर्धन अधिनियम :- 1980

7)आदिवासी जमाती आणि इत वनरहिवासी अधिनियम -: 2006

8.)वन्य जीवन संरक्षण अधिनियम - :1972

9.) सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम -: 1991

10) राष्ट्रीय पर्यांवरण अपील प्राधिकरण अधिनियम -: 1997

11) राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम -: 2010

12) आयात आणि निर्यात नियंत्रण अधिनियम -: 1947

13) खनन आणि खनिज द्रव्य विकास अधिनियम -: 1957

14) सीमाशुल्क अधिनियम -: 1962

15 ) महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम -: 2000

16) पर्यावरण स्नैही उत्पादनावरून खून पट्टी कायदा -: 1991

17) जैविक कचरा नियोजन -: 1998

18) पुन्हा वापरण्यासाठी प्लैस्टिकचे उत्पादन व वापर नियम -: 1999

24 May 2025

महत्त्वाचे संमेलन आणि परिषदा २०२४


Group C Imp.

IIFA पुरस्कार २०२५: जयपूर

पहिली जॉइंट कमांडर्स परिषद लखनौ

१९ वी पूर्व आशिया शिखर परिषद :- लाओस

INDUS-X समिट २०२४ कॅलिफोर्निया

२७ वी राष्ट्रीय परिषद ई-गव्हर्नन्स-२०२४ :- मुंबई

पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवः नवी दिल्ली

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :- दिल्ली

ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट-२०२४: हैदराबाद

अखिल भारतीय राजभाषा परिषद २०२४ :- नवी दिल्ली

इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्स्पो २०२४ :- दिल्ली

क्वाड लीडर्स समिट २०२४ अमेरिका, QUAD समिट २०२५ :- भारत

QUAD परिषद २०२४ : अमेरिका

९ वा रायसीना डायलॉग २०२४ नवी दिल्ली

NATO शिखर संम्मेलन २०२४: अमेरिका

५० वी G७ समिती २०२४- इटली

AI फॉर गुड ग्लोबल समिट २०२४: स्वित्झर्लंड

G२० कृषि मंत्रिस्तरीय बैठक २०२४ कुइआबा (ब्राजील)

२६ वी विश्व ऊर्जा काँग्रेस गोलमेज परिषद २०२४: नेदरलँड

ग्लोबल इंडिया AI समिट २०२४: नवी दिल्ली भारत

७७ वी जागतिक आरोग्य सभा २०२४: जीनेव्हा (स्वित्झर्लंड)

७ वी हिंद महासागर परिषद २०२४: पर्थ (ऑस्ट्रेलिया)

पाहिले विश्व ऑडियो विजुअल आणि मनोरंजन शिखर परिषद २०२४ गोवा (भारत)

३rd व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ परिषद २०२४: भारत

जागतिक हाइड्रोजन शिखर सम्मेलन २०२४: नेदरलँड

४ थे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरम २०२४ : नवी दिल्ली

जागतिक सरकार शिखर परिषद २०२४: UAE

४६ वी जागतिक वारसा समितीची बैठक २०२४: नवी दिल्ली भारत (पहिल्यांदा)

२४ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन २०२४: अस्ताना कझाकिस्तान

23 May 2025

23 मे टाॅप महत्त्वपूर्ण चालु घडामोडी


(Q१) खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) बानू मुस्ताक

(B) डेझी रॉकवेल

(C) दीपा भास्ती

(D) अनुराधा पाटील

Ans-(A) बानू मुस्ताक


(Q२) बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) रेड कॅम्प

(B) ट्रेन टू पाकिस्तान

(C) हार्ट लॅम्प

(D) The God of small things

Ans-(C) हार्ट लॅम्प                  

                                                                                                                                                                             (Q३) हार्ट लॅम्प हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळणारे कोणत्या भाषेतील पहिलेच पुस्तक आहे?

(A) मराठी

(B) कन्नड

(C) बंगाली

(D) तेलगू

Ans-(B) कन्नड


(Q४) कोणत्या राज्यात कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI अँप चे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) गोवा

(D) महाराष्ट्रमुंबईत नोकऱ्या

Ans-(D) महाराष्ट्र


(Q५) भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी कोणते ॲप लाँच केले आहे?

(A) My train

(B) उमंग

(C) स्वरेल

(D) स्वदेश

Ans-(C) स्वरेल            

                                                                                                                                                                                       (Q६) भारताने चहा निर्यातीत जागतिक क्रमवारी कितवे स्थान मिळवले आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(B) ३


(Q७) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २२ मे

(B) २३ मे

(C) २० मे

(D) २१ मे

Ans-(A) २२ मे


(Q८) जागतिक जैवविविधता दिन २०२५ ची थीम काय आहे?

(A) Save The Nature

(B) निसर्ग आणि उद्योग

(C) निसर्ग आणि जागतिक तापमान

(D) निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास

Ans-(D) निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास


(Q९) कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) अमेरिका


(Q१०) सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(D) ५

17 May 2025

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947

- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.

- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.

- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.

- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.

- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले 

- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले. 

- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले. 

- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.

- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.

- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.

- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले


अॅनी बेझंट यांची होमरुल लीग

(स्थापना सप्टेंबर १९१६)

> कार्यक्षेत्र - मुंबईसहित मद्रास व उर्वरीत महाराष्ट्र,
उत्तर व दक्षिण भारत.

> ही संघटना टिळकांच्या संघटनेपेक्षा ढीली होती.

कोणतेही तीन सभासद लीगची शाखा सुरू करू शकत.

> सदस्यांना व्यक्तिगत सूचना दिल्या जायच्या किवा न्यू इंडियातील 'अरुंडेल' यांच्या होमरुल सदरातून
द्यायचे.
> मार्च १९१७ मध्ये या लीगचे ७००० सभासद होते.
> होमरुल लीगमध्ये प्रवेश केलेले नेते -

मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदनमोहन मालवीय, महंमद अली जीना, तेजबहादूर सप्रू आणि लाला लजपतराय.

> सरकारने चळवळ दडपून टाकण्यासाठी एका
भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला. तेव्हा उच्च न्यायालयातील अपिलवर टिळक निर्दोष सुटले.

बेझंटबाईवर ऑगस्ट १९१७ ला खटला भरला.
> १९१५ ला मुंबईत होमरुल लीगची स्थापना झाली.

गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे


1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 



1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 



1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष 



1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष



1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष



1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले. 



1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले. 



1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. 



1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली. 



1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला. 



1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला. 



1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.



1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. 



1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 



1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले. 



1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 



1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. 



1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

02 May 2025

टॉप १० चालू घडामोडी 2 मे 2025


१. 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?
अ) १५ ऑगस्ट
ब) २६ जानेवारी
क) १ मे
ड) ५ जून
उत्तर: क) १ मे
स्पष्टीकरण: १ मे १९६० रोजी मुंबई राज्यापासून वेगळे होऊन महाराष्ट्र स्थापना झाली.

२. भारताने अलीकडेच कोणत्या देशाकडून २६ राफेल सागरी विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे?
अ) रशिया
ब) फ्रान्स
क) अमेरिका
ड) इस्रायल
उत्तर: ब) फ्रान्स
स्पष्टीकरण: फ्रान्ससोबतचा हा संरक्षण करार नौदलाची ताकद वाढवण्यासाठी करण्यात आला आहे.

३. २०२५ च्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले?
अ) जपान
ब) भारत
क) नेपाळ
ड) थायलंड
उत्तर: ब) भारत
स्पष्टीकरण: योगामध्ये पारंपारिक श्रेष्ठता दाखवून भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

४. 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' साजरा करण्याचा उद्देश काय आहे?
अ) क्रीडा दिन साजरा करा
ब) कामगारांचे हक्क ओळखा
क) पर्यावरणाचे रक्षण करा
ड) विज्ञानाचा सन्मान करा
उत्तर: ब) कामगारांचे हक्क ओळखणे
स्पष्टीकरण: कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

५. २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान उष्णतेच्या लाटेत राजस्थानमधील कोणते शहर सर्वात उष्ण होते?
अ) जयपूर
ब) उदयपूर
क) बारमेर
ड) जोधपूर
उत्तर: क) बारमेर
स्पष्टीकरण: बाडमेरमधील तापमान ४६.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

६. अलीकडेच फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात आला?
अ) मधुसूदन साई
b) नरेंद्र मोदी
क) अजय बंगा
ड) सतीश धवन
उत्तर: अ) मधुसूदन साई
स्पष्टीकरण: सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.

७. 'महुआदानर लांडगा अभयारण्य' कुठे आहे?
अ) बिहार
ब) झारखंड
क) ओडिशा
ड) आसाम
उत्तर: ब) झारखंड
स्पष्टीकरण: लांडग्यांच्या संवर्धनासाठी हे भारतातील एकमेव संरक्षित ठिकाण आहे.

८. रिअल माद्रिदने अलीकडे कोणती स्पर्धा जिंकली?
अ) युईएफए कप
ब) कोपा डेल रे
क) ला लीगा
चॅम्पियन्स लीग
उत्तर: ब) कोपा डेल रे
स्पष्टीकरण: रिअल माद्रिदने स्पेनची प्रतिष्ठित कप स्पर्धा जिंकली.

९. 'कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन' कधी साजरा केला जातो?
अ) १ मे
ब) ३० एप्रिल
क) २८ एप्रिल
ड) ५ मे
उत्तर: क) २८ एप्रिल
स्पष्टीकरण: कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आयएलओ द्वारे हा दिवस साजरा केला जातो.

१०. एटीएम व्यवहारांसाठी नवीन मर्यादा आणि शुल्क कोणती संस्था ठरवते?
एसबीआय
ब) अर्थ मंत्रालय
क) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
ड) धोरण आयोग
उत्तर: c) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
स्पष्टीकरण: एटीएमशी संबंधित धोरणे आणि शुल्क आरबीआयद्वारे नियंत्रित केले जातात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

प्रश्न.1) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

👉 उत्तर - देवेन भारती

प्रश्न.2) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत ?

👉 उत्तर - नर्मदेश्वर तिवारी

प्रश्न.3) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

👉 उत्तर - आलोक जोशी

प्रश्न.4) कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालय मध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे ?

👉 उत्तर - सिंधुदुर्ग

प्रश्न.5) कोणत्या राज्यातील अमलसाडी चिकू ला GI टॅग प्राप्त झाला आहे ?

👉 उत्तर - गुजरात

प्रश्न.6) दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताने पदकतालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे ?

👉 उत्तर - पहिला 

प्रश्न.7) SIPRI रिपोर्ट नुसार भारत २०२४ मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

 👉 उत्तर - क्रमांक 5 

प्रश्न.8) SIPRI रिपोर्ट नुसार २०२४ मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

👉 उत्तर - अमेरीका 

प्रश्न.9) हार्वर्ड च्या AI फॉर Good Hackathon मध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्ट ने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे ?

👉 उत्तर - मेघा प्रोजेक्ट

प्रश्न.10) भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे ?

👉 उत्तर - दुसऱ्या


29 April 2025

28 एप्रिल TOP १० चालू घडामोडी MCQ


१. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची व्यापार तूट कोणत्या देशासोबत वाढली आहे?
अ. अमेरिका
B. फ्रान्स
सी. चीन
D. रशिया
उत्तर: C. चीन

२. 'जागतिक पशुवैद्यकीय दिन' कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला?
अ. २३ एप्रिल
ब. २४ एप्रिल
क. २५ एप्रिल
D. २६ एप्रिल
उत्तर: दि. २६ एप्रिल

३. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत?
ए. आकाश अंबानी
बी. नीता अंबानी
सी. अनिल अंबानी
डी. मुकेश अंबानी
उत्तर: ए. आकाश अंबानी

४. भारतातील अणुऊर्जा क्षेत्रात परदेशी कंपन्यांना किती टक्के हिस्सा परवानगी आहे?
अ.२५%
बी.३७%
सी.४९%
डी.५१%
उत्तर: क. ४९%

५. २०२५ च्या आशियाई क्रमवारीत कोणते भारतीय विद्यापीठ अव्वल स्थानावर होते?
ए.आयआयटी
बी.आयआयएससी
सी. अण्णा विद्यापीठ
डी. बनारस हिंदू विद्यापीठ / बनारस हिंदू विद्यापीठ
उत्तर: बी.आयआयएससी

६. अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान अणु चर्चेची दुसरी फेरी इटलीमध्ये झाली?
अ. इराण
ब. सुदान
सी. चीन
D. म्यानमार
उत्तर: अ. इराण

७. भारताचे १०७ वे राष्ट्रीय उद्यान कोणते घोषित करण्यात आले?
अ. १०२ वा
बी. १०५ वा
सी.१०७ वा
दि.११० वा
उत्तर: क. १०७ वा

८. कोणत्या राज्य सरकारने 'ग्लोबल इंडिया समिट २०२५' आयोजित केले होते?
अ. बिहार
ब. केरळ
C. तेलंगणा
D. गुजरात
उत्तर: C. तेलंगणा

९. 'कोस्टल स्टेट्स मीटिंग २०२५' कुठे आयोजित केली जाईल?
A. आंध्र प्रदेश
B. ओडिशा
C. गुजरात
डी. मुंबई
उत्तर: डी. मुंबई

१०. २०२५ मध्ये भारतात कोणता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाईल?
अ. राष्ट्रकुल खेळ
ब. आशियाई खेळ
C. आयसीसी क्रिकेट विश्वचषक
D. फिफा विश्वचषक
उत्तर: C. आयसीसी क्रिकेट विश्वचषक

27 April 2025

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५


१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे?
अ. ३०००
बी.५०००
सी.७०००
डी.१०,०००
उत्तर: डी. १०,०००
स्पष्टीकरण: पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी, १०,००० नवीन आयुष केंद्रांना मान्यता देण्यात आली.

२. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच शाळांमध्ये एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घातली आहे?
अ. पंजाब
ब. राजस्थान
C. आसाम
D. केरळ
उत्तर: अ. पंजाब
स्पष्टीकरण: मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, पंजाबने ही बंदी घातली.

३. भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
अ. जपान
बी. अमेरिका / यूएसए
C. जर्मनी
D. फ्रान्स
उत्तर: अ. जपान
स्पष्टीकरण: विज्ञान-तंत्रज्ञान भागीदारीला चालना देण्यासाठी भारत आणि जपानने करारावर स्वाक्षरी केली.

४. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा कोणता वर्धापन दिन अलिकडेच साजरा करण्यात आला?
अ. १५० वा
ब. १४५ वा
क. १५५ वा
डी. १६० वा
उत्तर: अ. १५० वा
स्पष्टीकरण: १८७५ मध्ये स्थापन झालेल्या बीएसईला १५० वर्षे पूर्ण झाली.

५. देशातील पहिले जैवविविधता विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होत आहे?
अ. केरळ
बी. कर्नाटक
C. उत्तराखंड
डी. ओडिशा
उत्तर: अ. केरळ
स्पष्टीकरण: भारतातील पहिले जैवविविधता विद्यापीठ स्थापन करण्यात केरळ आघाडीवर आहे.

६. 'डिजिटल इंडिया फ्युचर स्किल्स प्रोग्राम' अलीकडेच कोणाकडून सुरू करण्यात आला ?
अ. नीती आयोग
ब. शिक्षण मंत्रालय
C. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय
ड. कौशल्य विकास मंत्रालय
उत्तर: C. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय
स्पष्टीकरण: याचा उद्देश तरुणांना एआय, सायबर सुरक्षा इत्यादींमध्ये प्रशिक्षित करणे आहे.

७. कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे?
अ. हिमाचल प्रदेश
B. उत्तर प्रदेश
सी. तामिळनाडू
D. गुजरात
उत्तर: अ. हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण: महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

८. कोणत्या वर्षापर्यंत फायलेरियासिसचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य WHO ने ठेवले आहे?
अ. २०३०
बी.२०२८
सी.२०३५
डी.२०४७
उत्तर: अ) २०३०
स्पष्टीकरण: WHO ने २०३० पर्यंत जागतिक स्तरावरील निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

९. 'प्रोजेक्ट इंडिया' चे उद्दिष्ट काय आहे?
'प्रोजेक्ट इंडिया' चे उद्दिष्ट काय आहे?
अ. १० लाख उद्योजक तयार करणे
ब. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे
क. सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणे
D. कृषी नवोपक्रम
उत्तर: अ. १० लाख उद्योजक निर्माण करणे
स्पष्टीकरण: प्रोजेक्ट इंडिया युवा उद्योजकतेला चालना देते.

१०. संयुक्त राष्ट्रांचा चिनी भाषा दिन कधी साजरा करण्यात आला?
अ. २० एप्रिल
ब. १८ एप्रिल
क. १९ एप्रिल
D. २१ एप्रिल
उत्तर: अ. २० एप्रिल
स्पष्टीकरण: चिनी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व साजरे करते.