Tuesday 12 March 2024

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो.


प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 


स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय 


उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.


यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?


खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.


मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.


* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.


* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. 

🔶 प्रचिन भारताचा इतिहास- र स शर्मा 

🔶 मध्यकालीन भारत- सतीश चंद्र 

🔶 जागाच इतिहास- जान माधुर के सागर आनुवाद मराठी 

🔶 सामाजिक समस्या- राम आहूजा हिंदी में 

🔶 Ethics GS- माधवी कवि, Unique Academy 

🔶 आंतरिक सुरक्षा- Tata magro हिंदी में 

🔶 आंतराठिय संबंध- डाँ शोलौद देवळणकर 

🔷 NCERT Geography, 6,7,9,11 

🔷 NCERT History- 6.7,12

🔷 आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, 

🔷 स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, 

🔷 भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, 

🔷 भारताचा भूगोल- माजिद हुसन, 

🔷 जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, 

🔷 विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच 


अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.


* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.


नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?


नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 


👉 योग्य मार्गदर्शकाची आवश्यक आहे,

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...