Ads

30 March 2020

महारत्न , नवरत्न , मिनीरत्न

◆भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून

◆उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून

◆ भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता.

◆ भारतातील महारत्न उद्योग
एकूण - 10

1. BHEL

2. कोल इंडिया लिमिटेड

3. गेल (इंडिया) लिमिटेड

4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

5. एनटीपीसी लिमिटेड

6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड

7. SAIL

8. BPCL

9. HPCL

10. PGCIL
(Power Grid Corporation of India Limited)

◆नवरत्न उद्योग - 14

---------------------------------------------------

चालू घडामोडी प्रश्न

विकसित केलेले गहूचे ‘MACS 4028’ हे नवीन वाण कोणत्या पौष्टिक घटकाने समृद्ध आहे?

(A) प्रथिने✅✅
(B) कार्बोहायड्रेट
(C) जीवनसत्त्वे
(D) सोडियम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

निधन झालेले अब्दुल लतीफ यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?

(A) फुटबॉल✅✅
(B) हॉकी
(C) क्रिकेट
(D) धावपटू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात “मो जीबन” कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला?

(A) गोवा
(B) उत्तरप्रदेश
(C) पश्चिम बंगाल
(D) ओडिशा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत कोणत्या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम✅✅
(D) अरुणाचल प्रदेश


©
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

​जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश

टाइम्स हायर एज्युकेशनच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यावर्षी ११ भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले असून, २०१५ पासून भारताला हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. २०१५ पासून पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये ११ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे.

टाइम्स हायर एज्युकेशनच्या माहितीनुसार पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये चीनच्या सर्वात जास्त ३० विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. या रँकिंगसाठी ४७ देश आणि विभागांचा समावेश होता. एकूण ५३३ विद्यापीठांत एकूण ५६ भारतीय विद्यापीठांनी फूल रँकिंग मिळवले होते. टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सने (बंगळुरू) पहिले स्थान मिळवले होते, तरी दोन पायऱ्या खाली येऊन १६ क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिस्ट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे ३२ व ३४ वे स्थान मिळवले.

ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांपैकी एक अमृत विश्व विद्यापीठमने प्रथमच पहिल्या १०० संस्थांच्या यादीत ५१ वे स्थान मिळवले.

२०१९ मध्ये हे विद्यापीठ १४१ व्या स्थानी होते. २०१९ च्या तुलनेत अमृत विद्यापीठमने रँकिंगच्या सगळ्या मानात (मेट्रिक्स) सुधारणा केल्याचे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले. इन्स्टिट्यूटस् आॅफ इमिनन्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या व पहिल्या १०० संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठांनी रँकिंगमध्ये फार मोठी सुधारणा केली आहे.

या विद्यापीठांनी अनेक बदल स्वीकारून पहिल्या १०० च्या यादीत स्थान मिळवावे, अशी सरकारची इच्छा असते. त्यात विदेशी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, आॅनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आणि जगातील उत्कृष्ट विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आदीचा समावेश आहे.

आयआयटी खरगपूर, दिल्लीने मिळविले स्थान च्आयआयटीने (खरगपूर) २३ पायºया चढून ३२ वे स्थान मिळवले, तर आयआयटी दिल्लीने २८ पायºया चढून ३८ वे स्थान मिळवले. आयआयटीने (मद्रास) १२ पायºयांची प्रगती करून ६३ वे स्थान मिळवले. आयआयटी (रोपार) आणि इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीने (मुंबई) टॉप १०० रँकिंगमध्ये आपापल्या पहिल्याच प्रयत्नात अनुक्रमे ६३ व ७३ वे स्थान मिळवले.

च्इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीम सहभागी होणाºया विद्यापीठांना जगातील पहिल्या १०० संस्थांच्या यादीत (टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगसह) स्थान मिळवण्यासाठी शासकीय अनुदान तेही जास्त स्वायतत्तेसह उपलब्ध करून देते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आजचे प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला उत्कृष्टतेसाठी मुप्पावरपू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला?
(A) अभिजित विनायक बॅनर्जी
(B) एम. एस. स्वामीनाथन.   √
(C) कैलास सत्यार्थी
(D) सोनम वांगचुक

2)_______ येथे ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली.   √
(C) कोलकाता
(D) हैदराबाद

3)भारत सरकारच्यावतीने इंधन बचतीविषयीची कोणती मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे?
(A) सक्षम.   √
(B) संचय
(C) अमुल्य
(D) उज्ज्वल

4)ताज्या ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2020’ याच्या संदर्भातली विधाने विचारात घ्या.

I. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

II. पहिले पाच जागतिक धोके हे पर्यावरण आणि हवामानाशी संबंधित आहेत ज्यांचा परिणाम यावर्षी जगावर होण्याची शक्यता आहे.

III. बोर्जे ब्रेंडे हे UNDPचे  अध्यक्ष आहेत.

वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

(A) I आणि II
(B) I आणि III   √
(C) केवळ III
(D) दिलेल्यापैकी एकही नाही

5)कोणती व्यक्ती यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी पुरुषांच्या पथकाची पहिली महिला पथसंचलन सहाय्यक ठरणार?
(A) तानिया शेरगिल.  √
(B) भावना कस्तुरी
(C) अंजली गुप्ता
(D) भावना कांत

6)कोणाची ICCच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी ‘टिम ऑफ द इयर’ या संघांचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे?
(A) स्टीव्ह स्मिथ
(B) विराट कोहली.  √
(C) केन विल्यमसन
(D) इओन मॉर्गन

7)‘ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाईल रिपोर्ट 2020’ याच्यानुसार कोणते शहर जगातले सर्वात महागडे शहर आहे?
(A) हाँगकाँग.   √
(B) न्युयॉर्क
(C) टोकियो
(D) लंडन

8)कोणत्या कंपनीने भारतात लघू व मध्यम व्यवसायांचे डिजिटलीकरण करण्यासाठी 1 अब्ज डॉलर एवढ्या रकमेची गुंतवणूक करण्याची घोषणा केली?
(A) अॅमेझॉन.  √
(B) वॉलमार्ट
(C) मायक्रोसॉफ्ट
(D) इन्फोसिस

9)‘रायसीना संवाद 2020’ या बैठकीदरम्यान संरक्षण क्षेत्रात भारताने कोणत्या देशासोबत एक सामंजस्य करार केला?
(A) रशिया
(B) ऑस्ट्रेलिया
(C) फिनलँड.  √
(D) इराण

10)कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबतीने राज्य पातळीवर ‘रेड लिस्ट’ तयार करण्यास प्रारंभ केला आहे?
(A) अरुणाचल प्रदेश.  √
(B) सिक्किम
(C) मेघालय
(D) आसाम

ग्रीसने टोकियो 2020 च्या आयोजकांना ऑलिम्पिकची ज्योत दिली.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🥏ग्रीसने टोकियो 2020 च्या संयोजकांना ऑलिम्पिकच्या आगीच्या स्वाधीन केले जे कोरोनोव्हायरस साथीच्या आजारामुळे 'मोठ्या प्रमाणात कमी झाले'.

🥏अथेन्समधील प्रतिष्ठित पॅनाथेनिक स्टेडियममध्ये झालेल्या समारंभात ग्रीस किंवा जपानमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश नव्हता.

🥏 हेलेनिक ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष स्पायसर कॅप्रॅलॉस यांनी टॉन्को आयोजित नाओको इमोटो यांच्या प्रतिनिधी समितीकडे मशाल दिली, त्यांनी कंदील पेटविला आणि तेथून निघून गेले.

🥏24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत.

पोलीस भरती प्रश्नसंच


♻️♻️ *'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन' हे कोणी म्हंटले ?*

A) सुभाष चंद्र बोस ✅✅
B) नारायण गुरु
C) सुखदेव
D) भगत सिंग

♻️♻️ *सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?*

A) सुधाकर 
B) केसरी
C) दीनबंधु ✅✅
D) प्रभाकर

♻️♻️ *महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?*
A) गुलामगिरी
B) जातीचा उच्छेद ✅✅
C)  शेतक-यांचा आसूड
D) ब्राह्मणांचे कसब

♻️♻️ *कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?*

A) तापी ✅✅
B) कावेरी
C) महानदी
D) कृष्णा

*महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?*

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

♻️♻️ *पुण्याचे प्लेग कमिश्नर रैंड यांची 1893 मध्ये _________ याने हत्या केली. *

A) दामोदर हरि चाफेकर ✅✅
B) वासुदेव बळवंत फडके
C) उस्ताद लहुजी मांग
D) अनंत कान्हेरे 

♻️♻️ *मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?*

A) ढाका ✅✅
B) कोलकाता
C) चितगांव
D) मुर्शिदाबाद

♻️♻️ *बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?*

A) लॉर्ड रिपन
B) लॉर्ड डफरीन
C) लॉर्ड डलहौसी
D) लॉर्ड कर्झन ✅✅

♻️♻️ *बार्डोलीचा सत्याग्रह ___________ यांच्या नेतृत्त्वाखाली झाला. *

A) सरदार पटेल ✅✅
B) म. गांधी 
C) विनोबा भावे
D) महादेव देसाई

♻️♻️ महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?

A) राजाराम मोहन रॉय
B) दादाभाई नौरोजी
C) वि. दा. सावरकर
D) वासुदेव बळवंत फडके ✅✅

29 March 2020

तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

📍महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली आहे.

📍कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दहा रुपयात मिळणारी थाळी 5 रुपयात मिळणार आहे.

📍महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.

*⏰शिवभेजन मिळण्याची वेळ*

✅रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

♻️ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे.

🍽️ रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल असं भुजबळ म्हणाले.
🍽️ पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे.
🍽️ कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार असल्याचे ते म्हणाले.

*📣महत्वाचे*

💠या दरम्यान शिवभोजन थाळी केंद्रात रोज निर्जंतुकीकरण केले जाईल.

💠केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे. मास्क आणि सॅनेटायझर आता अत्यावश्यक सेवेत आणले आहेत.

💠त्यांनी सांगितलं की, स्वस्त धान्य दुकानात 2 महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध आहे. 6 महीने पुरेल एवढे अन्न धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे.

ट्रेनमध्येच उभारणार ‘ICU’ सह इतर सेवा


🔰भारतात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालाला आहे. देशात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर सातशे पेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

🔰तसेच केंद्र सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 दिवसांसाठी भारत लॉकडाउन केला आहे. त्याशिवाय सरकारकडून प्रदुर्भाव रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.

🔰देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रदुर्भाव ग्रामिण भागात झाल्यास मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. ते पाहाता मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी सुरू केली आहे.

🔰तर रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून या हलाकीच्या परिस्थितीत ग्रामीण भांगामध्ये स्वास्थ्य स्वेवा वेळेवर
पोहचेल.

शास्त्रज्ञ आणि शोध किंवा सिद्धांत

● झकॅरीस जॅन्सन
1590 मध्ये सूक्ष्मदरर्शकाचा सर्वप्रथम शोध लावला.

● राॅबर्ट हूक
1665 मध्ये बुचाच्या पातळ कापातील मृत पेशींचा शोध लावला.

● ल्युवेन्हाॅक
1674 मध्ये जीवाणू, आदीजीव, शुक्राणू इ. जीवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले.

● राॅबर्ट ब्राऊन
1831 मध्ये पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविल.

● जोहॅनिस पुरकिंजे
पेशीतील तरंगत्या द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले.

● एम. जे. शिल्डेन
पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे असा सिद्धांत 1838 मध्ये मांडला.

● थिओडाॅर शाॅन
वनस्पती वा प्राणी सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात, असा सिद्धांत 1839 मध्ये मांडला.

● राॅफल्ड विरशाॅ
सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होतो, असा सिद्धांत 1855 मध्ये मांडला.

जबाबदारी टाळण्यासाठी चीनने UNSC मध्ये रोखली करोना व्हायरसवरील बैठक.

✍सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. युरोपातील इस्तोनिया या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करोना व्हायसरवर चर्चेची मागणी केली होती. तसा रितसर प्रस्तावही त्यांनी दिला होता. पण चीनने UNSC मध्ये आपल्या विशेषधिकाराचा वापर करुन करोना व्हायरसच्या विषयावर चर्चा होऊ दिली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

✍इस्तोनिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य आहे. मागच्या आठवडयात त्यांनी करोना व्हायरसवर चर्चेची मागणी केली होती. करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे इस्तोनियाने म्हटले होते. इस्तोनियाने आपल्या प्रस्तावात करोना व्हायरससंबंधी सर्व माहिती पारदर्शकतेने मांडावी अशी मागणी केली होती. पण चीन त्यासाठी तयार नव्हता असे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

✍करोना व्हायरस या आजाराचे मूळ चीनमध्ये आहे. चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. तिथूनच संपूर्ण जगभरात या आजाराचा फैलाव झाला. करोना व्हायरससंबंधीची माहिती लपवल्याचा चीनवर आरोप होत आहे. चीनने वेळीच माहिती दिली असती तर या व्हायरसचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर रोखणे शक्य झाले असते असे तज्ञांचे मत आहे.

भारत: ‘हिंद महासागर आयोग’ याचा पाचवा निरीक्षक


📌 6 मार्च 2020 रोजी भारत हिंद महासागर आयोगाचा पाचवा निरीक्षक झाला. माल्टा, चीन, युरोपीय संघ आणि फ्रेंच लोकांचा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रान्कोफोनी हे आयोगाचे इतर चार निरीक्षक आहेत.

▪️ मुख्य बाबी

📌 या आयोगाचा निरीक्षक बनल्यामुळे भारताला पश्चिम हिंद महासागरातल्या आफ्रिका खंडाच्या आग्नेय किनाऱ्यास जोडणार्‍या आपल्या योजनांचा विस्तार करण्यात मदत होणार.

📌 हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या पश्चिम भागासोबत भारताच्या हितसंबंधांचे समर्थन करणे हा या निवडी मागचा हेतू आहे. तसेच हिंद क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी सुरक्षा आणि वृद्धी धोरणाचा देखील भारताला फायदा होणार.

▪️ हिंद महासागर आयोग

📌 1982 साली मॉरीशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरात हिंद महासागर आयोग (Indian Ocean Commission -IOC) याची स्थापना झाली. या समूहात मॉरीशस, मेडागास्कर, कोमोरोस, फ्रान्स आणि सेशल्स अश्या पाच आफ्रिकी हिंद महासागर राष्ट्रांचा समावेश आहे.

औरंगाबाद विमानतळाचं नामांतर

📌औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी माहिती दिली आहे.

📌त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

📌यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

📌दरम्यान, मार्च २०१९मध्ये तत्कालिन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी केली होती. त्या आधी २०११मध्येही विधानसभेत या नामकरणाचा अशासकीय ठराव आला होता. या नामांतरासाठी वायकरांनी पाठपुरावाही केला होता.

​​​​Coronavirus: करोना विषाणूचा फोटो घेण्यात यश; ‘एनआयव्ही’च्या वैज्ञानिकांची कामगिरी

भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.

भारतातील करोना विषाणू (कोविड १९) प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही) वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. या प्रतिमा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध होणार असून भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.

वुहानमधून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांमधील एका मुलीला परत आल्यानंतर करोनाची लागण दिसून आली होती. ही मुलगी केरळातील असून तिच्या घशातील नमुन्यात सापडलेल्या या विषाणूंच्या प्रतिमा मध्यपूर्व श्वासन रोगाशी साधर्म्य असलेल्या आहेत. ज्याला मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतात. तो विषाणू करोनाचाच प्रकार होता व २०१२ मध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आताचा विषाणू हा २००२ मधील सार्स-करोना विषाणूशीही साधर्म्य दाखवणारा आहे.

विषाणूच्या प्रवासाचा उलगडा होऊ शकतो

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. निर्मल गांगुली यांनी सांगितले की, “करोना विषाणूवर काट्यांसारखी रचना असते त्यामुळे त्यांना करोना म्हणतात. त्यावर शर्करा व प्रथिन संग्राहकांचा समावेश असतो. ते काटे पेशीत रुतले जातात व नंतर यजमान पेशीला चिकटून विषाणू आत घुसतो. विषाणूचे जे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे त्यावरून त्याचे जनुकीय मूळ व उत्क्रांती समजते व त्यातून हा विषाणू प्राण्यातून माणसात व नंतर माणसातून माणसात कसा पसरला याचा उलगडा होऊ शकतो.”

विषाणूंचा आकार गोल

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत केरळातील नमुने तपासण्यात आले. त्यानुसार भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, “विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा ७५ नॅनोमीटरचा दिसतो, त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो. केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील ५०० मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला व त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला. त्यानंतर सोडियम फॉस्फोट्युनिस्टिक आम्लाचा वापर करण्यात आला. नंतर १०० केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.”

महाराष्ट्राबद्दल सर्व माहिती


♻️💐महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर

♻️💐महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

♻️💐विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

♻️💐महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

♻️💐महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

♻️💐महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

♻️💐महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

♻️💐महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

♻️💐महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

♻️💐महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

♻️💐महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

♻️💐महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

♻️💐भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक


भारताच्या घटनेत भाग पाच मधील कलम 148 ते 151 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.
महालेखा परीक्षक यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याप्रमाणे अधिकार असतात.
कलम 148 नुसार राष्ट्रपती पंतप्रधान सल्ल्यानुसार महा लेखापरीक्षकाची नियुक्ती करतात.
महालेखापरीक्षकांच्या कार्यकाळ घटनेत निश्चित केलेला नाही.
संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेला आहे .
6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे अधि काळ तोपर्यंत कार्य सांभाळू शकतात.
त्यांना राष्ट्रपती शपथ देतात तिसरा अनुसूची नुसार.
आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात.
त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याप्रमाणे पदावरून दूर केले जातील (गैरवर्तणूक किंवा अक्षमता या कारणावरुन).
त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने पारित झाला पाहिजे.
त्यांना संसदेत कायद्यानुसार भारताच्या संचित निधीतून वेतन व भत्ते दिले जातील.
पदावधी दरम्यान किंवा पदावधी संपल्यानंतर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कोणते पद धारण करू शकत नाहीत. कोणताही मंत्री संसदीय महालेखापरीक्षकांच्या प्रतिनिधित्व करू शकत नाही.
कलम 149 नुसार महालेखापरीक्षकांच्या कर्तव्य अधिकार दिलेले आहे.
नियंत्रक व महालेखा कायदा 1971  आहे, त्यात एकूण 1976 मध्ये सुधारणा केल्या.
ते राष्ट्रपतीना तीन अहवाल सादर करतात.
1) विनियोजन लेखांची लेखापरिक्षण
2) सार्वजनिक उपक्रमांचे लेखापरीक्षण
3) वित्तीय लेखांचे लेखापरिक्षण.
कलम 151 नुसार आपला अहवाल केंद्राचा राष्ट्रपतींकडे तर राज्याचा राज्यपालांकडे सादर करतात.