25 November 2019

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०

महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई

महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५

महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६

महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २७

महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २३४

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 १२४

महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४

महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८

महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५१

महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३

स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००

महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%

महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )

सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )

सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी

सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर

क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर

जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे

कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%

महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु

महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇

सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )

सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश

सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )

सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा

सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद

सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा

सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट

सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )

सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल

सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी

सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड

सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा

सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती

सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा

सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ

लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे

सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )

सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड

सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन

क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया

सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया

सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना

सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग

सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन

सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन

सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी

सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर

सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला

सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया

सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर

सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड

सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर

सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल

सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )

सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड

सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पोलीस भरती प्रश्नसंच

*🔹 कोकण रेल्वेमधील सर्वात मोठा बोगदा कुठे आहे?*
Ans : कुरबुडे
 
*🔹 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला?*
Ans : डॉ. बि. आर. आंबेडकर

*🔹 आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- होमगार्ड-*
Ans : 1946

*🔹 भारतातील सर्वात मोठे पदक?*
Ans : परमवीरचक्र

*🔹 राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता?*
Ans : ११ मे

*🔹 48, 60 आणि 72 या संख्याचा म.सा.वी. किती?*
Ans : 12

*🔹 संविधान दिन ................ या दिवसी साजरा केला जातो?*
Ans : 26 नोव्हेंबर

*🔹 ज्याची किंमत होऊ शकत नाही असे-*
Ans : अनमोल

*🔹 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा:*
Ans : मुंबई शहर

*🔹 मुंबईचा गवळीवाडा:*
Ans : नाशिक

अनिता आनंद: कॅनडामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त पहिल्या हिंदू


1) कॅनडा मंत्रिमंडळ :-

🚦कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडून नवीन मंत्रिमंडळाचे अनावरण

2) मंत्रिमंडळ रचना :-

🚦तीन इतर इंडो-कॅनेडियन (Indo-Canadian) मंत्री

🚦शीख सहभाग

🚦त्यातील प्रत्येकजण मागील सरकारचे सदस्य

3) अनिता आनंद यांचा प्रवास :-

🚦ऑक्टोबरच्या फेडरल निवडणुकीत आनंद यांची पहिल्यांदा सार्वजनिक सेवा व खरेदी मंत्री म्हणून निवड

🚦नवीन ट्रूडो सरकार (Trudeau overnment) साठी मंत्रिमंडळात येणाऱ्या ७ नवीन लोकांपैकी आनंद एक

4) मंत्रिमंडळाबाबत काही महत्वाचे मुद्दे :-

🚦२०१५ पासूनचे चौथे भारत-कॅनडियन मंत्री अमरजित सोही होते

🚦२०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते मंत्रिमंडळात परतले नाहीत

🚦मंत्रिमंडळात इतरही महत्वपूर्ण बदल

🚦मावळते परराष्ट्र व्यवहार मंत्री क्रिस्टिया फ्रीलँड (Chrystia Freeland) यांना उपपंतप्रधान पदी बढती

🚦तसेच आंतर सरकारी कामकाज (intergovernmental affairs) मंत्री म्हणून पदोन्नती

गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण

🌞पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाकडून (Petroleum and Natural Gas Regulatory board - PNGRB) एक उच्चस्तरीय समिती स्थापन

🎯हेतू :-

🌞पाइप केलेल्या नैसर्गिक वायूच्या पायाभूत सुविधांच्या विकासास गती देणे

🎯महत्वाचे मुद्दे :-

1) समिती कार्ये -

🌞शहर गॅस वितरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्यासाठी कार्य

🌞पाईप गॅस नेटवर्कच्या विकासाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा

🌞धोरण राज्य स्तरावर मान्यता मिळण्यास महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष

🌞इतर क्षेत्रांच्या तुलनेत महत्त्वपूर्ण प्रगती पाहण्यास अडचणी येणारी भौगोलिक क्षेत्रे ओळखणे

🎯राज्य सरकार भूमिका :-

🌞राज्य सरकारद्वारे नोडल ऑफिसरची नेमणूक

🌞जमीन, पर्यावरण, वाहतूक इ.चा समावेशास वेळोवेळी मंजूरी

🌞सवलतीच्या दरात वेळेवर शासकीय वाटप करण्याच्या प्रक्रियेत शहर गॅस वितरण पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी समावेश

🎯आतापर्यंत प्रगती :-

🌞पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या शहर गॅस वितरणासह भौगोलिक क्षेत्रा संख्येत २०१७ च्या अखेरीस ७८ वरून २०१९ मध्ये २२९ पर्यंत वाढ

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे खासगी विधेयक लोकसभेत सादर

📌नवी दिल्ली : गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपचे खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारे खासगी विधेयक शुक्रवारी लोकसभेला सादर केले. लोकसभेतील खासगी विधेयकांच्या यादीत खासदार अशोक नेते यांचे स्वतंत्र विदर्भाचे विधेयकही होते. मात्र, ते सभागृहात उपस्थित नसल्याने हे विधेयक लोकसभेत मांडले गेले नाही.

📌स्वतंत्र विदर्भाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भाजपशी मैत्री तोडून शिवसेना दोन काँग्रेससह राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच हे विधेयक सादर केले गेल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. लोकसभेचे पीठासीन अधिकारी प्रेमचंद्रन यांनी नेते यांचे नाव पुकारले होते. मात्र, नेते सभागृहात गैरहजर होते.

📌डिसेंबर २०१४ मध्ये हिवाळी अधिवेशनातही नेते यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत खासगी विधेयक मांडले होते. त्यानंतर २०१६मध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनीही स्वतंत्र विदर्भाचे खासगी विधेयक लोकसभेत मांडले होते. त्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते. विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या विधेयकाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला होता.

चीनच्या ‘ओबीओआर’ प्रकल्पाला भारताचा विरोध

भारताच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा

वॉशिंग्टन : चीनच्या वन बेल्ट, वन रोड (ओबीओआर) प्रकल्पाला भारताने विरोध केला असून भारताच्या या भूमिकेला अमेरिकेने पाठिंबा दर्शविला आहे.

अब्जावधी डॉलरच्या या प्रकल्पामागील आर्थिक गणिताच्या तर्कसंगतीवर प्रश्न उपस्थित करताना भारताने व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि त्यामधून चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प जाणार असल्याने प्रांतीय सार्वभौमत्वाच्या मुद्दय़ावर ओबीओआर प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे.

ओबीओआर हा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा आवडता प्रकल्प असून त्याद्वारे आशियाई देश, आफ्रिका, चीन आणि युरोप यांच्यातील संपर्कता आणि सहकार्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

*‘सीपीईसी’बाबत पाकिस्तानने चीनला प्रश्न विचारावेत; ट्रम्प प्रशासनाची सूचना*

वॉशिंग्टन : चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेबाबत (सीपीईसी) पाकिस्तानने चीनला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारावे, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला केली आहे.

सीपीईसी ही रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांची योजना असून त्याद्वारे चीनमधील नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला झिनजिआंग उघ्यूर स्वायत्त प्रांत आणि पाकिस्तानमधील गदर बंदर जोडले जाणार आहे.

‘‘कर्ज, विश्वासार्हता, पारदर्शकता याबाबत पाकिस्तान चीनवर अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती करील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पाकिस्तानमध्ये चीनच्या विकासाच्या नमुन्याचा पाठपुरावा का केला जात आहे, सीपीईसी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा किती आहे याची पाकिस्तानातील जनतेला माहिती का नाही’’, असा सवाल दक्षिण आणि मध्य आशियाच्या प्रधान उपसाहाय्यक परराष्ट्रमंत्री एलीस वेल्स यांनी केला आहे.

भारताचा नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) प्रकल्प

🔰दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी गृह मंत्रालयाने भारत सरकारचा नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) नावाचा प्रकल्प 31 डिसेंबर 2020 पर्यंत कार्यरत होणार असल्याचे जाहीर केले.

🔴NATGRID बाबत...

🔰नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) या प्रकल्पाची सुरूवात 2009 साली करण्यात आली. डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेस म्हणजेच नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) याच्याशी जोडण्याची भारत सरकारची योजना आहे.

🔰नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) यावर खात्यांची संपूर्ण माहिती इमिग्रेशन एंट्री, बँकिंग आणि फोन क्रमांक अश्या विविध बाबींविषयीची माहिती संकलित केली जाणार, ज्यामुळे आजच्या सायबर जगात पोलीस तपासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आहे.

🔰दूरसंचार, करासंबंधी अहवाल, बँक, इमिग्रेशन यासारख्या 21 संघांच्या 11 कार्यालयांकडून या व्यासपीठावर माहिती गोळा केली जाते. गुप्तचर विभाग (IB), रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (R&AW) यासारख्या सुमारे 10 केंद्रीय संस्था त्यामधली साठविलेली माहिती सुरक्षित मार्गाने प्राप्त करतात.

अश्वारोहणमध्ये फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

🔰आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र  होण्याचा मान मिळवला आहे.

🔰27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.
आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.

🔰याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.

मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये केवळ चार्टड विमानांसाठी खर्च झाले २५५ कोटी

✍पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी केवळ चार्टड विमानाचा एकूण खर्च २५५ कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेमध्ये दिली. पराराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.

✍मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी चार्टड विमानप्रवासाचा खर्च किती झाला यासंदर्भात केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नाला मुलरीधरन यांनी लेखी उत्तर दिले. यामध्ये २०१६-१७ साली मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान वापरण्यात आलेल्या चार्टड विमानांसाठी ७६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाल्याचे मुलरीधनरन यांनी सांगितलं.

✍तसेच २०१७-१८ साली हाच खर्च वाढून ९९ कोटी ३२ लाख रुपयापर्यंत गेल्याचे या उत्तरात म्हटलं आहे. २०१८-१९ साली चार्टड विमानांसाठी भारत सरकारने ७९ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे मुलरीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.

✍चार्टड विमाने ही छोट्या अंतरासाठी वापरली जातात. एखाद्या देशात गेल्यानंतर तेथे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी या विमानांचा वापर जगभरातील नेते करतात.

दूरसंचार क्षेत्राला केंद्र सरकारकडून दिलासा...

🔶वाढत्या कर्जभाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांना दिलासा देताना केंद्र सरकारने ध्वनिलहरींसाठी त्यांनी भरावयाचे उर्वरित हप्ते पुढील दोन वर्षांसाठी न भरण्याची मुभा दिली आहे.

🔶सरकारच्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या दूरसंचार कंपन्यांना द्यावा लागणाऱ्या रकमेपासून पुढील दोन वर्षांसाठी मोकळीक मिळाली आहे. मात्र या कंपन्यांना याच ध्वनिलहरींसाठी देय असलेल्या रकमेवरील व्याज मात्र भरावे लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

🔶केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या निर्णयानुसार, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओला आता 2020-21 व 2021-22 करिता एकूण 42,000 कोटी रुपये लगेच चुकते करण्याची गरज राहिलेली नाही. निरंतर तोटा नोंदवत असलेल्या आणि भांडवलाची चणचण असलेल्या या कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

24 November 2019

मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) खालीलपैकी किती हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहेत.

      वा, वावा, आहा, ओहो, अहाहा
   1) तीन    2) चार      3) सर्व      4) दोन

उत्तर :- 3

2) ‘मी निबंध लिहितो’ या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा.

   1) मी निबंध लिहीत असे      2) मी निबंध लिहिला होता
   3) मी निबंध लिहित होतो      4) मी निबंध लिहिला

उत्तर :- 1

3) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.

   1) पुल्लिंग    2) स्त्रिलिंग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

4) खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा.

   1) खेळणे    2) तळे      3) डबे      4) पातेले

उत्तर :- 3

5) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?

   1) मी नदीच्या काठाने गेलो    2) तो घरातून बाहेर पडला
   3) तू रामाला पुस्तक दे      4) तो दिवसाचा चालतो

उत्तर :- 3

6) ‘ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश्य व एकच विधेय असते’ अशा वाक्यास काय म्हणतात ?

   1) संयुक्त वाक्य    2) केवल वाक्य   
   3) मिश्र वाक्य    4) नकारार्थी वाक्य

उत्तर :- 2

7) ‘अलिकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला काय म्हणता येईल ते सांगा.

   1) उद्देश्य    2) विधेयविस्तार    3) कर्म      4) क्रियापद

उत्तर :- 2

8) सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) ललिता पाणी आणते      2) ललिताने पाणी आणले
   3) ललिताने पाणी आणावे      4) ललिताने जायचे होते

उत्तर :- 1

9) खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ? – ‘प्रतिवर्षी’

   1) तत्पुरुष समास    2) व्दंव्द समास   
   3) अव्ययीभाव समास    4) व्दिगू समास

उत्तर :- 3

10) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

   1) बघ ! एक रेकॉर्ड, गेली सुध्दा लाव ना    2) “बघ, एक रेकॉर्ड गेली सुध्दा ! लाव ना”
   3) “बघ ! एक रेकॉर्ड गेली सुध्दा – लाव ना”    4) “सोड मला, “तो जोराने ओरडला”

उत्तर :- 3

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) 45 व्या जी-7 शिखर परिषद 2019 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?

*उत्तर* : बिआरिट्झ, फ्रान्स

2) महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला?

*उत्तर* : दिल्ली

3) "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?

*उत्तर* : तामिळनाडू

4) नुकतीच नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” ची चाचणी कोणत्या देशाने घेतली?

*उत्तर* : उत्तर कोरिया

5) अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली?

*उत्तर* : 1,159

6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने बहाल केला?

*उत्तर* : संयुक्त अरब अमिरात (UAE)

अश्वारोहणमध्ये फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

🔰 आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.

🔰 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.

🔰 आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.

🔰 याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

🔰 ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.

पहिल्या ‘AIBA क्रिडापटू आयोग’वर एल. सरिता देवी ह्यांची सदस्य म्हणून निवड झाली

🔰आशियाई विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाने (AIBA) प्रथमच क्रिडापटू आयोगावर पाच खंडांमधून सहा लोकांची निवड केली आहे.

🔰त्यात, भारतीय महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवी ह्यांची ‘AIBA क्रिडापटू आयोग’ (AIBA अॅथलीट्स कमिशन) याचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

🔰AIBA क्रिडापटू आयोगामध्ये आशिया, ओशिनिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अश्या दोघांचा समावेश केला जात आहे.

🔰2020 ऑलम्पिक स्पर्धेत मुष्टियुद्ध खेळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवस्थेसंबंधी त्रुटींना टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (IOC) हे आयोग तयार करण्याची शिफारस केली होती. निवड झालेले सदस्य क्रिडा संघ आणि खेळाडूंच्या दरम्यान एक दुवा म्हणून कार्य करणार आहेत.

विज्ञान प्रश्नसंच 24/11/2019

que.1 : पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ……. म्हणतात.

1⃣. प्रकाशाचे अपस्करण✅✅✅

2⃣. प्रकाशाचे विकिरण

3⃣. प्रकाशाचे अपवर्तन

4⃣. पूर्ण अंतर्गत परावर्तन

que.2 : खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.

1⃣. केवळ अ

2⃣. केवळ ब✅✅✅

3⃣. अ आणि ब दोन्ही

4⃣. अ आणि ब दोन्ही नाही

que.3 : खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?

अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ

1⃣. अ आणि ब

2⃣. फक्त ड

3⃣. अ,ब आणि क✅✅✅

4⃣. वरील सर्व

que.4 : चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?

1⃣. दृष्टिभ्रम✅✅✅

2⃣. प्रकाशाचे विकिरण

3⃣. प्रकाशाचे अपस्करण

4⃣. प्रकाशाचे अपवर्तन

que.5 :  जोड्या जुळवा.

कॅमेऱ्याचे भाग डोळ्याचे भाग

अ) शटर.      १) पापणी(eye-Lid)

ब) डायफ्रॅम.    २) परीतारिका(Iris)

क) अॅपेरचर     ३) बाहुली(Pupil)

ड) फिल्म.       ४) दृष्टीपटल(retina)

   
       अ ब क ड

1⃣. १ २ ३ ४✅✅✅

2⃣. २ ३ ४ १

3⃣. १ २ ४ ३

4⃣. २ १ ३

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44
- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)

2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27
- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)

3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48
- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)

4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52
- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)

5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30
- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)

6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06
- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)

7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53
- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)

8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16
- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)

9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66
- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)

10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19
- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)