14 December 2019

पोलीस भरती भूगोल प्रश्नसंच 14/12/2019

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

आधुनिक भारताच्या इतिहासातील व्यक्तिमत्व ....

1) अजित सिंग
- क्रांतिकारक
- लाला लजपात राय यांच्या बरोबर काम केले
- 'पेशवा' नावाचे नियतकालिक प्रसिध्द करत
- संस्थापक 'भारत माता सोसायटी'
- 1907 ला अटक झाली , मंडाले च्या तुरुंगात कैद
- 1908 ला फरार होऊन गदर पार्टी मध्ये शामिल झाले

2) डेविड हेर
- स्कॉट्स्मन
- यंग बंगाल मूव्मेंट शी निगडीत
- भारता मध्ये पाशिमत्य शिक्षणाची सुरूवात करणार्या आद्यप्रवर्तकांपैकी एक
- हिंदू कॉलेज ची स्थापना केली
- कलकत्ता येथे मेडिकल कॉलेज स्थापन केले
- 'स्कूल बुक सोसायटी' शी निगडीत (ही संस्था इंग्रजी आणि बंगाली भाषेतील पुस्तकांशी
संबंधित )

3) मौलाना मोहम्मद अली
- खिलाफत चळवळी मध्ये सहभाग
- साइमन कमिशन विरोधी आंदोलनात सहभाग
- पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित
- 1923 ला 38 व्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष (स्थळ - काकिनाडा)
- 'कॉमरेड' साप्ताहिक
- 'HUMDARD' उर्दू दैनिक
- 1924 च्या 'यूनिटी कान्फरेन्स' चे निमंत्रक (ऐक्य परिषद)

4) बीर सिंग
- मूळचे पंजाब चे परंतु कॅनडा मधून कार्यरत
- गदर मध्ये कार्यरत
- 1914 ला भारतात परतले, त्यांना कैद केले गेले आणि नंतर फाशी देण्यात आली

5) केशवराव बळीराम हेडगेवार
- सुरुवातीला कॉंग्रेस मधून कार्यरत
- खास करून टिळकांच्या होम रुळ चळवळी मध्ये सक्रिय होते
- 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केले

6) जयप्रकाश नारायण
- लोकनायक अशी ओळख
- @ सीताबाडीयरा (पटना) येथे जन्म
- तात्पुरते शिक्षण सोडून असहकार चळवळी मध्ये सहभाग
- नंतर OHIO विद्यापीठ (US) येथून मास्टर्स डिग्री घेतली
- त्यांच्यावर मार्क्स च्या तत्वांचा प्रभाव होता
- जमीनदारी रद्द करा असे सुचवले
- आवजड उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे असे सुचवले
- जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये येण्यास व कामगार विभागाचे प्रमुख होण्यास
सांगितले, जे पी यांनी नेहरूंचे म्हणणे ऐकले. यानंतर ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले.
- सविनय कायदे भंग चळवळी मध्ये कैद झाली.
- कैदेतून सुटका झाल्यावर ऑल इंडिया सोशियालिस्ट पार्टी स्थापन केली
- चले जाव चळवळी मध्ये सहभाग असल्याने पुन्हा कैद झाली
- स्वातंत्र्यानंतर विनोबांच्या भूदान चळवळी मध्ये सक्रिय
- 1975 ला आणीबाणी विरोधी भूमिका. पुन्हा कैद झाली. जनता पार्टी ची स्थापना केली.

7) लक्ष्मीणाथ बेझबरुआ
- आसामी लेखक
- आसामी साहित्या मध्ये भर घातली
- 'जानकी' नावाचे नियतकालिक चालवत
- ओ,मोर अपोनर देश (आसामी राज्य गीत) त्यांनी लिहले

8) लाला हरदयाल
- 1884 @ दिल्ली मध्ये जन्म
- संत जॉन कॉलेज ऑक्स्फर्ड येथील शिष्यवृत्ती प्राप्त
- लंडन विद्यापीठा मधून पीएचडी प्राप्त केली
- लाला लजपात राय यांच्या निष्क्रिय प्रतिकार तत्वावर विश्वास
- गदर पार्टी चे पहिले अध्यक्ष 1913 @ सॅन फ्रॅनसिसको
- जिनीवा येथून क्रांतिकारक कार्य केले. येथे त्यांनी 'इंडियन इनडेपिडेन्स कमिटी' स्थापन
केली. तसेच ओरिएंटल ब्योरो टू ट्रॅनस्लेट राइटिंग मधून काम केले.
- स्टॉकहोम आणि स्विडन मधून ही काम केले
- भारतीयांनी होम रुळ चळवळीवर लक्ष द्यावे असे सुचवले होते
- अमेरिके मध्ये विध्यपीठा मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले
- पुस्तक : 1) WEALTH FOR NATIONS 2) HINTS FOR SELF CULTURE

देशातील आतापर्यंतचे 48 'भारतरत्न'

◾️ : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांनंतर 'भारतरत्न' पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

याआधी 2015 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न बहाल करण्यात आला होता. त्याचवेळी मदन मोहन मालवीय यांनाही मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.

त्यापूर्वी 2014 मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा, तर 2008 मध्ये पं. भीमसेन जोशी यांचा भारतरत्नने सन्मान करण्यात आला होता. आतापर्यंत 48 जणांना भारतरत्नने गौरवण्यात आलं आहे.

🔵 'भारतरत्न'चे सन्मानार्थी 🔵

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. #प्रणव_मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. #नानाजी_देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. #भूपेन_हजारिका - प्रसिद्ध गायक

पोलीस भरती प्रश्नसंच

१)  *कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते*

*A. निलगिरी*✔
B. सागवान
C. देवदार
D. साल

2)  *महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला*

A. सातारा
B. भिंवडी
*C. इचलकरंजी*✔
D. मुंबई

३)  *महाराष्ट्र अभियंात्रिकी संशोधन संस्था मेरी कोठे आहे.*

A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
*D. नाशिक*✔

४)  *कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात.*

A. हिमक्षेत्रे
B. हिमटोपी
C. हिमनदी
*D. वरीलपौकी नाही*✔

५)  *खालीलपौकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते*

*A. गुजरात आणि आंध्र प्रदेश*✔
B. महाराष्ट्र आणि कर्नाटक
C. तामिळनाडू आणि ओरिसा
D. राजस्थान आणि बिहार

६)  *खालीलपौकी कोणते शहर कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे*

A. कराड
B. कोल्हापूर
*C. नरसोबाची वाडी*✔
D. सातारा

७)  *महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण . . . . आहे.*

*A. 0.21*✔
B. 0.25
C. 0.27
D. 0.1

८)  *खालील पौकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली*

A. कोळंब
*B. माडिया गोंड*✔
C. परधान
D. वरील सर्व

९)  *खालीलपौकी लोकसख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता.*

A. मोन्ॉको
B. सन म्ॉरिनो
C. चीन
*D. व्हॅटिकन सिटी*✔

१०)  *. . .. हा ऊसाचा सुधारित वाण क्षारयुक्त जमिनीसाठी शिफारस करण्यात आला आहे*

A. को, 76032
B. को. एम 88121
*C. को. एम. 0265*✔
D. को. एम. 7125

११)  *महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे . . . .येथे आहेत*

A. उमरखेड
B. बल्लारपूर
*C. कामटी*✔
D. सावनेर

१२)  *खालीलपौकी कोण्ेती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही*

A. बेरड
B. रामोशी
C. कैकाडी
*D. गारुडी*✔

१३)  *पृथ्वीचा केद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो*

*A. सियाल*✔
B. सायमा
C. निफे
D. शिलावरण

१४)  *कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.*

*A. तापी*✔
B. कावेरी
C. महानदी
D. कृष्णा

१५)  *महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नौऋत्य मान्सून वा·यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो*

A. मराठवाडा
B. कोकण
C. खानदेश
*D. विदर्भ*✔

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी ‘दंतौष्ठय’ वर्ण कोणता?

   1) ओ      2) औ      3) व      4) च

उत्तर :- 3

2) पुढील चुकीचा संधीविग्रह कोणता, ते सांगा.

   1) गुरु + ओघ – गुर्वेध    2) रमा + इच्छा – रमेच्छा
   3) स्व + ईर – स्वैर    4) प्रीति + अर्थ – प्रीत्यर्थ

उत्तर :- 1

3) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

     आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
   1) भाववाचक नाम    2) सामान्य नाम
   3) विशेषण      4) सर्वनाम

उत्तर :- 2

4) चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, तो मुलगा चांगला आहे.

     अधोरेखित शब्दांचे विशेषण ओळखा.
   अ) पहिल्या वाक्यात अधि विशेषण       ब) दुस-या वाक्यात विधी विशेषण
   क) पहिल्या वाक्यात विधी विशेषण      ड) दुस-या वाक्यात अधि विशेषण
   1) अ आणि ड बरोबर    2) अ आणि ब बरोबर
   3) क आणि ड बरोबर    4) ब आणि ड बरोबर

उत्तर :- 2

5) वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

     ‘चेंडू’ सीमा रेषेबाहेर जाऊन स्थिरावला.

   1) संयुक्त क्रियापद    2) साधित क्रियापद
   3) प्रायोजक क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

6) शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य    2) नाम वाक्य
   3) कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य    4) विशेषण वाक्य

उत्तर :- 3

7) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘समीप’

   1) करणवाचक    2) स्थलवाचक   
   3) संग्रहवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

8) परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

   1) म्हणून, सबब    2) अथवा, किंवा   
   3) परी, पण    4) व, आणि
उत्तर :- 1

9) ‘हुडु !’ या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.

   1) तिरस्कार    2) विरोध     
   3) संबोधन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

10) ‘तो निजत असेल’ – या विधानातील काळ ओळखा.

   1) भूतभविष्य काळ    2) वर्तमानभविष्य काळ 
   3) भविष्यभविष्य काळ    4) यापैकी एकही नाही

उत्तर :- 2

भूगोल प्रश्नसंच 14/12/2019

1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?
   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम
उत्तर :- 1

2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?
   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन
उत्तर :- 1

3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही
     कारण –
   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.
   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.
   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.
   4) यापैकी काहीही नाही.
उत्तर :- 3

4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :
   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.
   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.
   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक
         संस्थेने खर्च करावी लागते.
   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क
उत्तर :- 2

5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत
     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात. 
   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान
   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान
उत्तर :- 1

1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?
   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार   
   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण
   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड
उत्तर :- 2

2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?
   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.
   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.
   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड
उत्तर :- 1

3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.
   1) खार    2) उथळ व उताराच्या 
   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी
उत्तर :- 2

4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.
   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन
उत्तर :- 3

5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :
   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.
   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.
   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत
   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत
उत्तर :- 3

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम
(B) 10 वा
(C) 30 वा
(D) 9 वा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.

(A) 10 नोव्हेंबर
(B) 11 डिसेंबर✅✅
(C) 11 ऑक्टोबर
(D) 12 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?

(A) आसाम
(B) मणीपूर✅✅
(C) त्रिपुरा
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी ___ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर
(B) 11 डिसेंबर✅✅
(C) 9 ऑक्टोबर
(D) 11 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम ____ येथे आयोजित केला जाणार आहे.

(A) नवी दिल्ली
(B) लखनऊ✅✅
(C) मुंबई
(D) चेन्नई

© संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ना. धों. महानोर यांच्या हस्ते

◾️उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते  होईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी  शुक्रवारी दिली.

◾️उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे.

◾️ त्यांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इतर भाषांतील प्रतिभावंत लेखकांना  निमंत्रित करण्याची मागच्या काही वर्षांतील परंपरा नाकारून यंदा मराठी लेखकाच्याच हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल व हा मान  ना.धों. महानोर यांना मिळेल, असे वृत्त लोकसत्ताने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

◾️ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११, १२ जानेवारी २०२०  रोजी उस्मानाबाद येथे होत आहे.

◾️या संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

◾️ संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातील १०० प्रभावी महिलांत सीतारामन

✍ फोर्ब्सच्या यादीत अँगेला मर्केल प्रथम स्थानावर

◾️फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांचा समावेश करण्यात आला आहे. 

◾️या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.

◾️यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक
📌रोशनी नादर मल्होत्रा व

◾️बायोकॉनच्या संस्थापक
📌किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.

◾️फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत.

◾️युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर

◾️ अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

◾️बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.

◾️सीतारामन  ३४ व्या क्रमांकावर असून📌 त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

◾️यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.

◾️फोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या  शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना विल्यम्स, हवामान कार्यकर्ती  ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.