Saturday 14 December 2019

९३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ना. धों. महानोर यांच्या हस्ते

◾️उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते  होईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी  शुक्रवारी दिली.

◾️उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे.

◾️ त्यांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इतर भाषांतील प्रतिभावंत लेखकांना  निमंत्रित करण्याची मागच्या काही वर्षांतील परंपरा नाकारून यंदा मराठी लेखकाच्याच हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल व हा मान  ना.धों. महानोर यांना मिळेल, असे वृत्त लोकसत्ताने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

◾️ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११, १२ जानेवारी २०२०  रोजी उस्मानाबाद येथे होत आहे.

◾️या संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

◾️ संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...