Saturday 14 December 2019

ब्राझील सोबतच्या  सामाजिक सुरक्षा करारास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

👉11 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताला ब्राझील सोबत सामाजिक सुरक्षा विषयक करारावर स्वाक्षरी करण्यास मंजूरी दिली आहे.

✅कराराविषयी

👉अल्प कालावधीसाठी परदेशात काम करणाऱ्या भारतीय व्यवसायिक / कुशल कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी भारत इतर देशांसोबत द्विपक्षीय सामाजिक सुरक्षा करार करीत आहे.

✅या प्रकाराच्या कराराचे तीन फायदे असतात, ते म्हणजे -

1.कामगारांद्वारे (असंबद्धता) दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान देण्याचे टाळले जाते.

2.फायद्याचे सुलभ विप्रेषण (निर्यातक्षमता) होते.

3.लाभांमधली तुट टाळण्यासाठी (दोन देशांमध्ये) योगदानाचा कालावधी एकत्रित केला जातो म्हणजेच संपूर्ण केला जातो.

👉या कराराद्वारे परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना अपंगत्व विमा लाभदेखील देण्यात येणार आहे. आजपर्यंत भारताने 18 देशांसोबत असे करार केले आहेत.

✅ब्राझील देश

👉ब्राझील हा दक्षिण अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर; उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना; वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू; नैर्ऋत्येस अर्जेन्टिना व पेराग्वे; तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

👉ब्राझीलिया हे ब्राझीलचे राजधानी शहर आहे. ब्राझीलियाई रिआल हे राष्ट्रीय चलन आहे. पोर्तुगीज ही इथली अधिकृत भाषा आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...