19 December 2021

छत्रपती शाहू महाराजांनी महिलां संबंधी आपल्या कोल्हापूर संस्थानात केलेले महत्वाचे कायदे...

1) विधवांच्या पुनर्विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा  -1917

2) आंतरजातीय विवाह संमती कायदा 1919

3) स्त्रियांवरील अत्याचारांचा प्रतिबंध करणारा कायदा 1919

4) स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क देणारा कायदा 1920

5) देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा 1920

▪️"स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा" हा त्याकाळातील देशातील अशा प्रकारचा पहिला कायदा होता.

▪️स्वतंत्र भारताने हा कायदा 2006 साली अंमलात आणला

▪️ देवदासी प्रथा प्रतिबंध करणारा कायदा हे देशातील पहिलाच कायदा होय

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (सहगल)


🔸भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला,सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन...
🔸जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्यापोटी चेन्नई येथे...
🔸वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील तर आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या...
🔸लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (1928)...
🔸या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले.त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मींवर प्रभाव...

🔸लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग व अटक.पण शाळा,महाविद्यालयांवर बहिष्काराची कृती त्यांना अमान्य होती.स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे,असे त्यांचे मत...
🔸महाविद्यालयात BKN राव या विमानचालकाशी परिचय व विवाह.माञ पुढे मतभेद व विभक्त...
🔸मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBS (1938) तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण(1939)...
🔸चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला (1940).तिथे भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना...

🔸नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (1943).२ जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर...
🔸त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी,अशी इच्छा व्यक्त केली..
🔸या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या,शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले...
🔸सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले.21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले...
🔸1944 पर्यंत 1000 महिला जवान व 500 परिचारिका जवान अशी 1500 ची पलटण झाली...
🔸जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले...
🔸‘चलो दिल्ली‘ हे त्यांचे लक्ष्य.मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली (1945).तेव्हा आझाद हिंद सेनेची माघार..
🔸युद्धविरामापर्यंत कॅ.लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल...
🔸त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या.1 वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या (1946).भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर सुटका...

🔸भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाह (1947).कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला...
🔸भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले...
🔸त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या.पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली (1971)...
🔸बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या,वैद्यकीय मदत...
🔸भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा (1984)..

🔸दैदीप्यमान कर्तृत्वाबद्दल पद्मविभूषण (1998)...
🔸अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपती निवडणूकीत पराभूत (2002)...
🔸2012-कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन...
🔸प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) या त्यांच्या धाकट्या भगिनी होत...

व्यवसायावर आधारित जाती


◾️आजीवक - भिक्षूक

◾️किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात

◾️कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा

◾️ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

◾️खोत - कोकणातील एक वतनदार

◾️गुरव - शंकराचे पुजारी

◾️धोबी - परीट, रजक

◾️धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

◾️नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

◾️भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

◾️पाथरवट - दगडफोड करणारा

◾️मशालजी - मशाल धरणारा

◾️मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

◾️माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

◾️मोदी - धान्य दुकानदार

◾️मलंग - फकिराचा एक पंथ

◾️माहूत - हत्ती हाकणारा

◾️सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

◾️वडार - दगड फोडणारी एक जात

◾️बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

भारताला लागून असलेले स्थलीय देश


👁‍🗨बांग्लादेश :-4096 किमी

👁‍🗨चीन:-3488 किमी

👁‍🗨पाकिस्तान:-3323 किमी

👁‍🗨नेपाळ:-1751 किमी

👁‍🗨म्यानमार:-1643 किमी

👁‍🗨भूतान:-699 किमी

👁‍🗨अफगाणिस्तान:-106 किमी

🔴एकूण सिमा:-15106 किमी

👉भारतातील एकूण 17 राज्य ची सिमा इतर देशांना लागून आहे.

महाराष्ट्राच्या प्राकृतीक विभाग

महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात

पश्चिम किनारपट्टी (कोकण) :-

भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशांपैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.

निर्मिती :-

महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच सारखा कोकण म्हणून तयार झाला आहे.

विस्तार:-

उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून (दमणगंगा नदी खोरे) –  दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत, दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.

लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :-

पश्चिम किनारपट्टी ची दक्षिणोत्तर लांबी 560 किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी (सरासरी 44.7 किमी) असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत (वसई ते हरिश्चंद्रगड) ती विस्तारलेली आहे.

कोकण किनारपट्टी ची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कुडाळ येथील रांगणा किल्ला जवळ 40 किलोमीटर आहे. तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी ते 100 किलो एवढी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टी ची उंची 5 मीटरपासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी-कमी होत गेलेली आहे त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.

कोकण किनारपट्टीची रचना :-

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

उपभाग :-

कुंडलिका नदीखोरे यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागांत विभागली जाते.

उत्तर कोकण:- समाविष्ट जिल्हे:- दक्षिण कोकण:- समाविष्ट जिल्हे:-
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर रत्नागिरी व सिंधुदुर्ग

खलाटी:-

पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे,  खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.

वलाटी :-

कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.


भूरूपे :-

कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या अरबी समुद्रातील सागरी लाटांचे कार्य सतत चालू असते. त्यामुळे या भागात समुद्रकडे, सागरी गुंफा, चौपाटी, वाळूचे दांडे, चबुतरे अशी अनेक भूरूपे तयार झाली आहेत.  विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अशी तयार झालेली भूरूपे मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात.

वातावरण

पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

हवेतील घटक घटकाचे प्रमाण

नायट्रोजन 78.03%

ऑक्सीजन 20.99%

कार्बडायक्साईड 00.03%

ऑरगॉनवायु 00.94%

हैड्रोजनवायु 00.01%

पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

एकूण हवा 100.00%.

2. तपस्तब्धी

भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.
इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.
एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर

आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

विमुद्रीकरण (Demonetization)

पहिले 1946
- 12 जानेवारी 1946 मध्यरात्रीपासून 500, 1000 आणि 10,000 च्या नोटा बाद
- RBI Governor: सर सी. डी. देशमुख
- Governor General: वेव्हेल

दुसरे 1978
- 19 जानेवारी 1978 मध्यरात्रीपासून  1000, 5000 आणि 10,000 च्या नोटा बाद
- RBI Governor: आय. जी. पटेल
- Finance Minister: हिरूभाई पटेल
- Prime Minister: मोरारजी देसाई

तिसरे 2016
- 8 नोव्हेंबर 2016 मध्यरात्रीपासून 500, 1000 च्या नोटा बाद
- RBI Governor: डाॅ. उर्जित पटेल
- Finance Minister: अरूण जेटली
- Prime Minister: नरेंद्र मोदी

केंद्रीय पीक संशोधन केंद्र

१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)

२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)

३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)

४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)

५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)

६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      = सोलापूर

७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)

८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)

९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला

१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर

११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)

१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)

१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे

१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर

१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)

१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)

१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर

१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)

१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर

२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन

२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)

२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)

२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)

२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)

२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ

२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

सर्व स्पर्धा परीक्षा करीता महत्वाचे दिनविशेष

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०१ जानेवारी = वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी = शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी = जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी = जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी = मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी = राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी = प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी = जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

१४ फेब्रुवारी = टायगर डे
१९ फेब्रुवारी = छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी = जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी = जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी = राष्ट्रीय विज्ञान दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०१ मार्च = नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च = आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च = आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च = राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च = पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च = जागतिक जल दिन
२३ मार्च = जागतिक हवामान दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०५ एप्रिल = राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल = जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल = जलसंधारण दिन
११ एप्रिल = राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
१४ एप्रिल = भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल = जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल = जागतिक पुस्तक दिन
२४ एप्रिल = पंचायत राज दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०१ मे = महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे = जागतिक उर्जा दिन
०८ मे = जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे = राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे = राष्ट्रीय एकता दिन
१५ मे = जागतिक कुटुंब दिवस
१७ मे = जागतिक संचार दिवस
२१ मे = राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे = राष्ट्रकुल दिन
३१ मे = जागतिक तंबाखू विरोधी दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०५ जून = जागतिक पर्यावरण दिन
१० जून = जागतिक नेत्रदान दिन
१२ जून = जागतिक बालकामगार विरोधी दिन
१४ जून = जागतिक रक्तदान दिन
१५ जून = जागतिक विकलांग दिन
२१ जून = जागतिक योग दिन
२६ जून = जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून = जागतिक मधुमेह दिन
२९ जून = जागतिक सांखिकी दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०१ जुलै = राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै = जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै = राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै = कारगिल विजय दिन
२८ जुलै = सामाजिक आरोग्य दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०३ ऑगस्ट = आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट = जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट = भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट = अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट = राष्ट्रीय क्रीडा दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०२ सप्टेंबर = जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर = जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर = जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर = हिंदी दिन
१६ सप्टेंबर = जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर = मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर = जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर = जागतिक पर्यटन दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०२ ऑक्टोबर = म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर = जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर = भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर = जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर = जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर = जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर = हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर = जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर = राष्ट्रीय एकता दिवस

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०५ नोव्हेंबर = रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर = बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर = राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर = बालदिन
१९ नोव्हेंबर = राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर = राष्ट्रीय कायदा दिन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

०१ डिसेंबर = जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर = आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर = आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर = नॊदल दिन
०६ डिसेंबर = डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर = ध्वज दिन
०८ डिसेंबर = जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर = मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर = राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर = किसान दिन
२४ डिसेंबर = राष्ट्रीय उपभोक्ता दिन

अर्थव्यवस्था प्रश्नपत्रिका

1) गॅट कराराची पहिली फेरी 23 जून 1947 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली
होती ?

1) जिनिव्हा

2) न्यूयॉर्क

3) वाशिंग्टन डी.सी

4) उरुग्वे

2) WTO मंत्रीस्तरिय परिषद आणि उपस्थित  भारतीय सदस्य याबाबत योग्य पर्याय निवडा.

अ) 1996- श्री. रामय्या

ब) 1998-  श्री. रामकृष्ण हेगडे

क) 2001- श्री. एम. मारण

ड) 2003-  श्री. अरुण जेटली

1) अ आणि क।                 2) अ,ब,क
3) ब,क,ड                         4) वरील सर्व

3)भारत सरकारने  custom tarrif act
केव्हा पारित केला गेला आहे ?

1)1970

2)1974

3)1975

4)1976

4) जय करार ( jay treaty ) 1794 पुढीलपैकी कसा संबंधित आहे ?

1) द्विपक्षीय भागीदारी करार

2) सर्वाधिक उपकृत राष्ट्र दर्जा (MFN)

3) गुंतवणूक करार

4) परराष्ट्रधोरण विषयक

5) जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने  कोणत्या देशाला " सर्वाधिक उपकृत राष्ट्र " असा दर्जा दिला होता ?

1) अमेरिकाने ब्रिटन

2) ब्रिटनने अमेरिका

3) जपानने रशिया

4) फ्रान्सने ब्रिटनला

6)बौद्धिक संपत्ती कायदा 2016 मधील प्रमुख लक्ष्य कोणते आहेत?

अ)अधिकाराविषयी जागृती

ब) अधिकाराविषयी निर्मिती

क) वैधानिक,कायदेशीर आधार देणे

ड) प्रशासन व व्यवस्थापन करणे

1) फक्त ब,क.                 2) अ,ब,क
3) ब,क,ड                      4) वरील सर्व

7) बौद्धिक संपत्ती कायदा ( TRIPS) अंतर्गत या कायद्याचे उद्देश अंमलबजावणी आणि संरक्षण तसेच तांत्रिक नावीन्य शोध यास प्राधान्य देऊन
सामाजिक व आर्थिक विकास यासाठी प्राधान्य देणे इ.बाबत या कायद्याच्या कोणत्या कलमात तरतूद आहे ?

1) कलम 5

2) कलम 7

3) कलम 13

4) कलम 15

8) भारतात भारतीय लेखकांना copyright act  नुसार जिवंतपणाचा कालावधी आणि मृत्यूनंतर किती वर्षासाठी कॉपीराईट हक्क प्राप्त होतात ?

1) 35 वर्ष

2) 50 वर्ष

3) 60 वर्ष

4) 70 वर्ष

9) 1967 मध्ये कोठे भरलेल्या WB  आणि IMF च्या मेळाव्यात IMF  ने " आंतरराष्ट्रीय चलन स्थापित करण्याची " योजना पुरस्कृत केली होती ?

1) जिनिव्हा

2) टोकियो

3) रिओ-दी- जेनेरो

4) न्यूयॉर्क

10) IMF  च्या चलन बास्केट मध्ये पुढीलपैकी कोणत्या चलनाचा समावेश होतो ?

अ) डॉलर
ब) पौंड
क) युरो
ड) येन
इ) युवान

1) अ,ब,क                  2) अ,ब,क,ड
3) ब,क,ड,इ.              4) वरील सर्व

आजचा पेपर पूर्ण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थावर आधारित आहे..पूर्व सोबतच मुख्य परिक्षासाठी ही खूप महत्त्वाचा आहे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

✅  अर्थव्यवस्था उत्तरे  ✅

1)- 1

2)- 4

3)- 3

4)- 2

5)- 1

6)- 4

7)- 2

8)- 3

9)- 3

10)-4

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸