02 April 2022

2 एप्रिल 2022 चालू घडामोडी

प्र. दुबईतील इंडियन ज्वेलरी एक्झिबिशन सेंटर इमारतीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले?
उत्तर :- पियुष गोयल

प्र. अलीकडेच, एस जयशंकर यांनी 18 व्या BIMSTEC मंत्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला होता, ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर :- काठमांडू

प्र. अलीकडेच कोणत्या अभिनेत्रीला ब्युटी चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- यामी गौतम

प्र. अलीकडेच FedEx ने नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर :- राज सुब्रमण्यम

प्र. श्याम प्रसाद लिखित 'पूर्ती प्रदात श्री सोमय्या' हे पुस्तक अलीकडेच कोणी प्रकाशित केले आहे?
उत्तर :- श्री एम. व्यंकय्या नायडू

प्र. अलीकडेच पेमेंट सिस्टम टच पॉइंट्सच्या जिओ-टॅगिंगसाठी फ्रेमवर्क कोणाद्वारे जारी करण्यात आले आहे?
उत्तर :- भारतीय रिझर्व्ह बँक

प्र. अलीकडेच कोणत्या राज्यात 11 व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2022 चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्र. अलीकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दरवर्षी कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय डॉल्फिन डे' साजरा करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- ०५ ऑक्टोबर

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी


🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

ब-जीवनसत्त्वांची यादी आणि क्रांती व पीक

🔰 ब १ जीवनसत्त्व (थायमिन)

🔰 ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)

🔰 ब ३ जीवनसत्त्व (नायासिन)

🔰 ब ५ जीवनसत्त्व (पँटोथिनिक ॲसिड)

🔰 ब ६ जीवनसत्त्व(पायरिडॉक्सिन)

🔰 ब ७ जीवनसत्त्व (बायोटिन)

🔰 ब ९ जीवनसत्त्व (फॉलिक ॲसिड/फोलेट)

🔰 ब १२ जीवनसत्त्व (सायनोकोबलामाईन)



✅✅.   क्रांती व पीक  🔴

🔳पिवळी क्रांती:-तेलबिया

🔳निळी क्रांती:-मत्स्य उत्पादन

🔳शवेत क्रांती:-दुग्ध उत्पादन

🔳हरित क्रांती:-अन्नधान्य उत्पादन

🔳सोनेरी तंतू क्रांती:-ताग उत्पादन

🔳सोनेरी क्रांती:-फल उत्पादन

🔳गलाबी क्रांती:-कांदा उत्पादन

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

लक्षात ठेवा आणि घटना समितीतील महत्वाच्या समित्या आणि भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

🔸१) कठीण पाणी मृदू करण्यासाठी .... चा वापर करतात.
- सोडिअम कार्बोनेट

🔹२) लाकडात ..... हा प्रमुख घटक असतो.
- सेल्युलोज

🔸३) गॉज व लिंट ही वैद्यकीय उपचाराची साधने तयार करताना .... हा धागा प्रामुख्याने वापरला जातो.
- रेयॉन

🔹४) ..... या प्रक्रियेद्वारा अमोनिया वायू तयार केला जातो.
- हेबर प्रक्रिया

🔸५) खनिज लोखंडापासून शुद्ध लोखंड तयार करताना ..... हा क्षपणक वापरतात.
- कोक 

घटना समितीतील महत्वाच्या समित्या

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी


भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारिता

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ वर टीका झाली, तरी त्यास ते उत्तर देत. दीनबंधू पत्रात ही टीका प्रसिद्ध होत असे. याच पत्रात गोपाळबाबाही स्वतंत्र लेखन करीत. गोपाळबाबांची पद्यरचना-जिचा उल्लेख ते ‘अखंडरचना’ असा करीत-दीनबंधूने प्रकाशित केली. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे संपादक-संस्थापक म्हणून बनसोडे यांना श्रेय देणे श्रेयस्कर ठरणार नाही, असे दलित पत्रकारितेच्या अभ्यासकांना वाटते. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. सोमवंशीय मित्रमध्ये लेख, अग्रलेख, स्फुटे, बातम्या, वाचकांची पत्रे असा मजकूर प्रसिद्ध होई. समाजसुधारणा, शिक्षण, विवाहसंस्था यांविषयी कांबळे यांनी गांभीर्याने लेखन केले.राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली.  

किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली, ते ‘कर्ते सुधारक’ होते. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

आजचे प्रश्नसंच


[प्र.१] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

१] पंजाब ✅
२] जम्मू काश्मीर
३] हिमाचल प्रदेश
४] उत्तराखंड

------------------------------------------------------------

[प्र.२] कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?

१] सिंधू
२] सतलज ✅
३] चिनाब
४] रावी

----------------------------------------------------------

[प्र.३] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

१] कावेरी ✅
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

------------------------------------------------------------

[प्र.४] जारवा हि जमात कोठे आढळते?

१] निकोबार
२] छोटे अंदमान ✅
३] अरुणाचल प्रदेश
४] लक्षद्वीप

------------------------------------------------------------

[प्र.५] खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड ✅
३] अ-क-ड-
४] ड-ब-क-अ

-------------------------------------------------------------

[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ✅
४] दोन्ही अयोग्य

------------------------------------------------------

[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य ✅

----------------------------------------------------------

[प्र.८] खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत?
अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

१] फक्त अ
२] फक्त ब ✅
३] फक्त क
४] वरील सर्व

-----------------------------------------------------------

[प्र.९] कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे?
१] उष्णकटिबंधीय आर्द्र वने
२] उष्ण निम वाळवंटी वने
३] उष्णकटिबंधीय शुष्क वने
४] उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने ✅

----------------------------------------------------------

[प्र.१०] उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

१] अ अयोग्य
२] ब अयोग्य
३] अ, ब आणि क अयोग्य
४] वरीलपैकी एकही नाही ✅

------------------------------------------------------------

11). *पी. वि.सिंधू हीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व काश्य अशी 3 पदके मिळवनारी कितवी बॅडमिंटनपटू ठरली आहे.

11). पहिली

12). दुसरी 📚📚🏆💐

13). तिसरी

14). चोथी

12). *P. V. सिंधू ला खालील पैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही*??

22) पदमश्री -2015

23.पदमविभुषन -2018📚📚🏆🏆

24). राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

25) वरीलपैकी सर्व मिळाले.

13). *P. V. सिंधूच्या मिळालेल्या पदकाबद्दल अयोग्य जोडी ओळखा??*

33) काश्यपदक 2013

34). काश्यपदक 2014

35). रोप्यपदक 2016📚📚🏆🏆

36). रोप्यपदक 2018

14) **कोणत्या वर्षी भारत सरकारने हीमा दास ला अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले??*

44).2017

45).2016

46).2018📚📚🏆🏆

47).2019

15). *हीमा दास च्या प्रशिक्षक चे नाव काय आहे??*

55). सुशील दास

56). तरसेम राणा

57). निपोन दास 📚📚🏆🏆

58). सुधीर सिंह

16). *किती दिवसात हीमा दासने 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत??*

66). 30 दिवसात

67). 15 दिवसात

68). 20 दिवसात

69). 19 दिवसात🏆🏆💐

17). *अरुण जेटली यांनी 2014 मध्ये कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविली होती??*

77) पंजाब

78). अमृतसर 🏆🏆💐💐

79). बडोदा

80). यापैकी नाही.

18). *कोणत्या साली अरुण जेटली भाजपचे सदस्य झाले*??

11) 1975

12).1995

13).1980🏆🏆📚📚

14).1978

19) *कोणत्या साली अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली??*

22). 1974🏆🏆📚📚

33). 1957

44). 1970

55). 1968

20). *सुषमा स्वराज हा दिल्ली च्या कितव्या मुख्यमंत्री होत्या??*

10). पहिल्या

20). चोथा

30). पाचव्या 🏆🏆📚📚

40). दुसऱ्या

11). *सुषमा स्वराज कोणत्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलात??*

1). 1992

2). 1995

3). 1984

4). 1990📚📚🏆🏆

12). *जम्मू काश्मीर वर जेव्हा पाकिस्तानने घूसखोरी /हल्ला  केला होता तेव्हा पाकिस्तान कडून कोणत्या वरिष्ठ सैन्य अधिकारी ने नेतृत्व केले होते?* ?

1). शेख अब्दुल्ला

2). जावेद खान

3). मोहंमद शेख

4). अकबर खान 🏆🏆

*13* ). *जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट किती वेळ लागू झाली होती*

1). 10 वेळा

2). 7 वेळा

3). 9 वेळा

4). 8 वेळा 🏆🏆.

*14* ). *2014 मध्ये कोणत्या संस्थेने 370 विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली होती??*

1). द  सिटीझन

2). द  सिटीझन ऑफ इंडिया

3). वूई द  सिटीझन 🏆🏆

4). यापैकी नाही

15). *35 A  व 370 कलम संविधानात कधी जोडले गेले??*

1). 1954,   1949🏆🏆🏆

2). 1949, 1954

3). 1952, 1949

4). 1947,  1954

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

◾️उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. 

📚फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदा📚

📌 आनंदाचे तरंग : मदर टेरेसा

📌 ओअसिसच्या शोधात

📌 तेजाची पाऊले

📌 नाही मी एकला

📌 संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची

📌 सुबोध बायबल

📌. सृजनाचा मळा

📌 परिवर्तनासाठी धर्म

📌 ख्रिस्ताची गोष्ट

📌 मुलांचे बायबल

📌. ख्रिस्ती सण आणि उत्सव

📌 पोप जॉन पॉल दुसरे

📌. गोतावळा

📌 गिदीअन

📌. सृजनाचा मोहोर

सराव प्रश्नोत्तरे

1) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.
 
1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून

2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून

3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून ✅

4) महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
_____________________________

2) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.
 
1) डॉ. भांडारकर

2) गो. रा. आगरकर ✅

3) न्या. रानडे

4) गो. कृ. गोखले
_____________________________

3)  बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.

1) 1852

2) 1853 ✅

3) 1854

4) 1855
_____________________________

4) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले

1) अनंत कान्होरे

2) खुदीराम बोस

3) मदनलाल धिंग्रा ✅

4) दामोधर चाफेकर
_____________________________

5)  राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते
 
1) मिस क्लार्क बोर्डिग

2) मुस्लीम बोर्डिग

3) लिंगायत बोर्डिग

4) मराठा बोर्डिग ✅         



💕 विषय = मानव संसाधन विकास & मानवी हक्क प्रश्नसंच💕

प्रश्न = 1) अयोग्य कथन ओळखा. (२०१८)
१) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना १९९३ मध्ये झाली       
२) NHRC च्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात.
३) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा NHRC चे पदसिद्ध सदस्य असतात.     
४) ममता शर्मा ह्या २०१२ मध्ये NHRC च्या अध्यक्ष होत्या.

प्रश्न = 2)) खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख हे भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात?(२०१७)
अ) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
क) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
ड) राष्ट्रीय महिला आयोग
पर्यायी उत्तरे:-
१) वरीलपैकी नाही       २) अ,  ड
३) ब, क                      ४)  वरील सर्व

प्रश्न = 3) राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंबधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहे/त?(२०१७)
अ) आयोग मानवाधिकारांच्या उपभोगामध्ये अडथळे ठरवणाऱ्या घटकांचा आढावा घेते. ज्यात दहशतवादविरोधी कायद्यांचाही समावेश होतो.   
ब) आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकारी आहेत.
क) आयोग पूर्णतः संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे राष्ट्रीय मानवाधिकार संस्था संबंधित विकृत केलेल्या पॅरिस तत्वाशी सुसंगत आहे.
पर्यायी उत्तरे:-
१) अ, ब              २) ब, क
३) अ, क             ४) वरील सर्व विधाने

प्रश्न = 4) भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग?(२०१७)
अ) मानवी हक्कांचा उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांताची किंवा अहवालाची स्वतः हुन दाखल घेऊ शकतो.(कोणतीही औपचारीक तक्रार नसतात)     
ब) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ट कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करू शकतो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त?
१) अ, ब                 २) कोणतेही नाही
३) फक्त अ.             ४) फक्त ब

प्रश्न = 5) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणाऱ्या तक्रारी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (२०१८)
१) तक्रारी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच असाव्यात 
२) फोनवरून तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही
३) आयोगाकडे स्वतःचे तपास कर्मचारी नाही      ४) आयोगाकडे सशस्त्र सेना विरोधी तक्रारीही सादर करता येतात.

=============================
उत्तरे :- प्रश्न ७०६ - ४, प्रश्न ७०७ - ४, प्रश्न ७०८ -४, प्रश्न ७०९ - १, प्रश्न ७१०- ४.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा


♻️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे  ♻

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना*

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग*

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे*

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू*

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर*

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्*

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज*

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी*

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद*

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल*

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग*

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी*

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर*

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली*

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी*

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू*