Monday 19 August 2019

राज्यात नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले

▪️राज्यातील रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याचे झरे असण्याची शक्‍यता अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे.

▪️ मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पर्यटनासाठी उपयुक्त असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांबाबत अनभिज्ञतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या योग्य संवर्धनाची गरज शास्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

▪️अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या वनस्पतींबाबत पुण्यातील भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या अभ्यासकांकडून संशोधन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा अभ्यास सुरू असून या अभ्यासांतर्गत या गरम पाण्याच्या झऱ्यांचा शोध लागला आहे.

▪️भूगर्भातील खालच्या थरात असलेल्या लाव्हामधून बाहेर पडणारी उष्णता ज्यावेळी भूगर्भातील पाण्याला मिळते, त्यावेळी पाण्याचे तापमान वाढते. लाव्हामुळे मिळणाऱ्या उषणतेमुळे तापलेले हे पाण्याचे स्रोत म्हणजेच गरम पाण्याचा झरा (हॉट वॉटर स्प्रिंग)असतो. काही ठिकाणी या झऱ्याचे तापमान सामान्य असते. अशावेळी या झऱ्यामध्ये नागरिक अंघोळदेखील करू शकतात. मात्र, काही ठिकाणी हे तापमान अतिशय घातक असते.

या पाण्यात असणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मजीवांमुळे त्वचेचे रोग नष्ट होण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...