Saturday 17 August 2019

*चालू घडामोडी (17/08/2019)*

📕 *इस्रोच्या प्रमुखांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान*

◆ इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी त्यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

◆ विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

◆ के सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता.

◆ त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं. हलाकीच्या परिस्थितीमुळे लहानपणी त्यांना पायात कधीही चपला किंवा बूट घालता आले नव्हते. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण धोतर घालूनच जात होतो, असंही त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एमआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पँट परिधान केली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अटल काव्यांजली - कवी संमेलन*

◆ अटल काव्यांजली - कवी संमेलन
◆ ठिकाण- नवी दिल्ली
◆ माजी PM- अटल बिहारी वाजपेयी प्रथम पुण्यतिथी निमित्त 16 ऑगस्ट 2019 रोजी.

◆ अटलबिहारी वाजपेयी (जन्म: २५ डिसेंबर १९२४; मृत्यू : १६ आॅगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते.

● अटल बिहारी वाजपेयी:
---------------------------------------------------
● राजकीय कारकीर्द

◆- भारत छोडो आंदोलन (1942) 23 दिवसांचा करावास
◆- 1968 मध्ये जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
◆- 1977 भारताचे परराष्ट्रमंत्री
◆- 1977 संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारे पहिले व्यक्ती
--------------------------------------------
● पुरस्कार

◆- 1992 पद्म विभूषण
◆- 1994 Outstanding Parliamentarian Award
◆- 2015 Bangladesh Liberation War Honour
◆- 2015 भारतरत्न
--------------------------------------------------
● उल्लेखनीय कामगिरी

◆- मे 1998 पोखरण (राजस्थान) अणू चाचणी
◆- 1998-99 Lahore Summit, दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली
◆- जून 1999 कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अतनू चक्रवर्ती रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक*

◆ केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे. चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली

◆ अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जस्टिस एसएन शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यमान न्यायमूर्तींची सीबीआय चौकशी होणार आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला फायदा होईल असे आदेश दिल्याचा जस्टिस शुक्ला यांच्यावर आरोप आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...